काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात काही प्रश्न सुटले नाहीत म्हणून तीन वर्षांपूर्वी मोठ्या अपेक्षेने मतदारांनी भारतीय जनता पक्षाला झुकते माप दिले. आज शहरात तीन खासदार आहेत. त्यात शिवेसेनेचे दोन आणि भाजपचे एक (राज्यसभा सदस्य) आहे. तीन आमदारांपैकी दोन भाजपचे एक शिवसेनेचा आहे. १२८ नगरसेवकांमध्ये तब्बल ७७ भाजपचे आहेत. अशा प्रकारे गल्ली ते दिल्ली अगदी घसघशीत पाठबळ भाजपच्या मागे आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधिकारशाही होती. ती जवळपास संपली. याचे कारण लोकांना भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ, पारदर्शक, गतिशील कारभार हवा आहे. गुन्हेगारीपासून संपूर्ण मुक्ती हवी आहे. लोकसभा नंतर विधानसभा आणि वर्षापूर्वी महापालिका त्यासाठीच मतदारांनी भाजपकडे सोपविली. गेल्या तीन वर्षांतील ‘काय साधले, काय राहिले’ याचा लेखाजोखा मांडला तर, बऱ्यापैकी प्रश्न सुटले आणि आजही असंख्य मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत; हे मान्य करावे लागेल. पूर्वीपेक्षा विकासकामांचा वेग वाढला, पण निधीची चणचण आहेच. परंतु पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबरच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने शहराचे राजकीय वजन वाढले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 31 October 2017
आमदारांचे रिपोर्टकार्ड । महेश लांडगे (भोसरी): घोषणांचा सुकाळ अंमलबजावणीचा दुष्काळ
भोसरी मतदारसंघातील बफर झोनची हद्द कमी करणे, बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळविलेला भक्कम पाठिंबा, शास्तीकर माफी आणि अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या लढ्याला आलेले यश या लांडगे यांच्या जमेच्या बाजू आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नागपूर येथील अधिवेशनात त्यांनी लक्षवेधी सूचना मांडली. कुंटे समितीने दिलेल्या अहवालानुसार आता बांधकामे नियमित होणार आहेत.
आमदारांचे रिपोर्टकार्ड । लक्ष्मण जगताप (चिंचवड): मागण्या मंजूर, मात्र कार्यवाही कागदावरच
पिंपरी- चिंचवडमधील भाजपचा पहिला आमदार म्हणून लक्ष्मण जगताप यांनी इतिहास घडविला. शहरातील सर्वांत गाजलेला मोठा प्रश्न म्हणजे अनधिकृत बांधकामांचा. ही हजारो अनधिकृत घरे नियमित व्हावीत यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावली होती. भाजपचे सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्र्यांकडे व विधिमंडळात त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नही केले. परंतु, कोणते बांधकाम नियमित होणार आणि कोणते नाही याचा तपशील महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. शास्तीकराचा प्रश्नदेखील असाच प्रलंबित आहे.
आमदारांचे रिपोर्टकार्ड । गौतम चाबुकस्वार (पिंपरी): पुनर्वसनात उतीर्ण; ‘एसआरए’त ‘अनुत्तीर्ण’
‘एमआयडीसी’मधील सुमारे १०० एकरांवरील १८ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, १२.५ टक्के परतावा यावर सातत्याने पाठपुरावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विभागीय ‘आयटीआय’ आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृहाला शासन मान्यता आणि संभाजीनगर, शाहूनगर येथील ‘जी’ ब्लॉकमधील बंदिस्त बाल्कनी प्रश्न निकालात काढून आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी स्वतःच्या प्रगती पुस्तकात उत्तीर्ण झाल्याचे शेरे मिळविले आहेत. मात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याबाबत ते ‘अनुत्तीर्ण’ठरले आहेत.
पिंपरीत मेट्रोकामे; हिंजवडीत निविदा प्रक्रिया वेगात
पिंपरी-चिंचवड शहरात अतिशय वेगवान पद्धतीने मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र, महापालिका व महामेट्रो यांच्यात समन्वय आणि नियोजन नसल्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचे दररोज हाल सुरू आहेत.
महामेट्रोला मिळणार शासकीय गोदामाची जागा
पुणे- पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शिवाजीनगर शासकीय गोदामाच्या जागेचा आगाऊ ताबा महामेट्रोला मिळाला आहे. सदर जागा मेट्रोला सुपूर्द करण्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने नुकताच अध्यादेश जारी केला असून आता ही 2 हेक्टर 67 आर जागा महामेट्रोच्या ताब्यात मिळणार आहे.
पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेच्या महापौरांची पिंपरी महापालिकेस भेट
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजासह विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगाल येथील असनसोल महापालिकेचे महापौर जितेंद्र तिवारी यांचे स्वागत महापौर नितीन काळजे यांनी केले. महापौर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी नगरसदस्य सुरेश भोईर आदी उपस्थित होते.
पंधरा शाळांचा कोटा अपूर्णच
पिंपरी - ‘राइट टू एज्युकेशन’अंतर्गत (आरटीई) शहरातील सुमारे १५ शाळांनी प्रवेश कोटा पूर्ण भरला नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. या शाळांनी प्रवेश नाकारून सरकारचा आदेश डावलला आहे. तर शिक्षण विभाग याविषयी गप्प आहे.
वैद्यकीय खरेदीवर आयुक्तांचा “वॉच’
निविदा रद्द ः संबंधित अधिकाऱ्याने अपात्र ठेकेदारांला ठरविले पात्र?
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका आरोग्य वैद्यकीय भांडार विभागात गोळ्या औषधे व यंत्रसामुग्री खरेदीत सतत गोलमाल झाला आहे. अनेक प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. काही प्रकरणांची चौकशी लागून तात्कालीन डॉक्टरांवर दोषारोप दाखल केले आहे. त्यामुळे विद्यमान आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी वैद्यकीय खरेदीवर बारीक लक्ष ठेवले आहे. वैद्यकीय विभागाने राबवलेल्या एका निविदा प्रक्रियेत अपात्र ठेकेदारांला पात्र ठरविल्याने ती निविदा दक्षता व लेखाधिकाऱ्यांच्या आक्षेपानंतर आयुक्तांनी तात्काळ रद्द केली आहे.
41 स्वयंरोजगार संस्थांची नोंदणी रद्द! : महापालिका आयुक्तांचा आदेश
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 41 स्वयंरोजगार सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली. त्यामुळे त्यांना महानगर पालिकेकडून देण्यात येणारी कामे यापुढे बंद होतील. तसा आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिला आहे.
शहरातील कचरा समस्या जटिल
पिंपरी - शहराचे वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे कचरा निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. तुलनेत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा अलगीकरण योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र आहे. पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता यामुळे शहरातील सर्व भागात नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पर्यायाने शहरातील कचरा समस्या जटिल बनत चालली आहे.
औंध येथील मुळा नदी काठी कचऱ्याचे ढीग; प्रशासनाला निवेदन
पिंपरी- औंध येथील मुळा नदीच्या पिंपरी महापालिका हद्दीतील काठावर मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कचऱ्याचे ढिग लागले आहेत. याकडे ह-क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे नदीकाठी स्वच्छता करावी, अशी मागणी शिवशक्ती व्यायाम मंडळाने केली आहे. औंध येथील परिहार चौकातून श्रीमंत महादजी शिंदे पुलावरून पुढे आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द सुरू होते. हा पूल ओलांडल्यावर दोनही बाजूंना खोल नदीपात्र असून त्या ठिकाणी प्लास्टीक कचऱ्याचे ढीग साठले आहेत. नदीपात्रात घरातील भंगार व टाकाऊ वस्तूही टाकल्या आहेत. यामुळे मुळा नदीच्या नदी पात्रास धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागानेही कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्या ठिकाणचा कचरा साफ करून मुळा नदीपात्र कचरामुक्त ठेवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Pune: No water for cremation of kin of deputy collector, corporator
PCMC standing committee chairperson Seema Savale said, “The water tank might not have been filled as there was a technical problem at the water pumping ...
Hinjawadi traffic chaos: Some relief on the cards as PCMC unfolds plan to build two roads
TO ease the growing traffic chaos in Hinjewadi and Wakad areas, two new alternatives have been planned by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC). One will be from Wakad octroi post while other will be from close to Hotel Sayaji in Wakad on ...
‘आयटी सिटी’ची कोंडी सुटणार!
हिंजवडीसाठी दोन पर्यायी रस्ते: आमदार जगताप यांची माहिती
पिंपरी – वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील ‘आयटी सिटी’ म्हणून ओळख असलेल्या या भागातील कोंडी सोडवण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. वाकड येथील जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी असे अनुक्रमे 12 आणि 18 मीटर रुंदीचे दोन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
पिंपरी – वाकड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील ‘आयटी सिटी’ म्हणून ओळख असलेल्या या भागातील कोंडी सोडवण्यासाठी दोन पर्यायी रस्ते निर्माण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहे. वाकड येथील जकात नाका ते हिंजवडी आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ते हिंजवडी असे अनुक्रमे 12 आणि 18 मीटर रुंदीचे दोन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
Subscribe to:
Posts (Atom)