Sunday, 5 February 2017

[Video] उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपामध्ये बंड

वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणा-यांना उमेदवारी डावलून भाजपात आलेल्या आयारामांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली, एक प्रकारे निष्ठावंत कायकर्त्यांचा बळी घेतला आहे. या अन्यायाविरोधात बंड पुकारण्याचा निर्धार भाजपातील नाराजांच्या गटाने व्यक्त केला. 

पैसे घेऊन भाजपाने उमेदवारी विकल्या


‘सर्व्हे’त ज्यांचे नाव येईल अशांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आले होते; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या  व स्वार्थासाठी भाजपामध्ये आलेल्या नेत्यांनी पक्षाचे आचारविचार पायदळी तुडविले आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी ‘सर्व्हे’च्या नावाखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी करून पैसे देणार्‍यांनाच महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याचा खळबळजनक आरोप उमेदवारी डावललेल्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप आणि आ. महेश लांडगे यांचे नाव घेता केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ‘शहराध्यक्ष हटाव, भाजपा बचाव’ अशा घोषणा देऊन आता ‘माघार नाही,’ असा पवित्रा घेतल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

[Video] हेच का भाजपचं 'पार्टी विथ डिफरन्स' ?


[Video] निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांचा पिंपरी चिंचवड शहर भाजपा विरुद्ध उद्रेक


It’s BJP vs BJP in Pimpri Chinchwad


शहराध्यक्ष हटाव, भाजप बचाव; पिंपरीतील निष्ठावान भाजप कार्यकर्ते आक्रमक

एमपीसी न्यूज - ''शहराध्यक्ष हटाव, भाजपा बचाव'',  ''कार्यकर्त्यांना न्याय मिळालाच पाहिजे'' ''निष्ठावंताना लावलाय चुना आणि आता सगळीकडेच अपक्ष म्हणा'', ''भाजपच्या…

पिंपरी-चिंचवडमध्ये 143 उमेदवारी अर्ज बाद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 388 अर्ज आले असून त्यामधील एकूण 143 उमेदवारी अर्ज बाद…

पिंपरीत उमेदवारी न दिल्याने भाजपचे निष्ठावान आक्रमक; नव्या राजकीय पक्षाची करणार स्थापना

‘जुन्या-नव्यां’चा वाद पेटला    एमपीसी न्यूज - आयारामांना संधी देत भाजपाने निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्त्यांना डावलले आहे. तिकीट वाटप करताना…

प्रशांत शितोळे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने आश्चर्य

निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा व समर्थकांचा आग्रह सांगवीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता   एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ…