Tuesday, 29 August 2017

पालिकेच्या प्रसिध्दीसाठी नेमली जाणार ठेकेदारी संस्था

सोशल मिडिया व प्रसारमाध्यमांमधून महापालिकेची चांगली प्रसिध्दी करून घेण्यासाठी एक खासगी ठेकेदारी संस्था नेमण्यात येणार आहे. तशी तयारी महापालिका प्रशासनाने चालविली असून हे काम करणा-या संस्थांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, पालिकेच्या पैशांची उधळपट्टी करण्यासाठी नवीन मार्ग प्रशासनाने शोधलाय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरातील विस्कळीत पाणी सुरळित करा – महापौर नितीन काळजे

शहरातील अनेक भागात विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत असल्याने हा पाणीपुरवठा सुरळित करा, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना दिल्या.

बीआरटीसाठी प्रकल्प सल्लागार, महापालिकेचा प्रस्ताव

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात बीआरटीएसचे प्रकल्प सुरू आहेत. औंध-रावेत आणि दापोडी-निगडी बीआरटीएस रस्त्यावर उड्डाणपूल, सब-वे, ग्रेडसेपरेटर, पादचारी पूल तसेच रस्ता रुंदीकरण अशी विविध कामे करण्यात येत आहेत. या वेगवेगळ्या कामांसाठी ...

सतरा नंबर फॉर्मचा गैरवापर

पिंपरी - दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी अध्ययनात कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांकडून १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी पालकांवर सक्ती केली जात आहे. मोरवाडीतील एका नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार उघडकीस आला. या निमित्ताने शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमधील १७ नंबरी ‘शाळा’ विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या विषयाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

मुलगी झाली, लक्ष्मी आली...

पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम
पिंपरी - अलीकडे ‘बेटी बचाओ’चा नारा प्रत्येक जण लगावतो..पण,
त्यातील किती जण त्याला कृतीची जोड देतात.. कसलेही शुल्क न आकारता मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा डॉ. गणेश राख यांच्यासारखा एखादाच असतो. मात्र, ज्या घरी मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबाला पाच हजार रुपये देण्याचा उपक्रम पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाने हाती घेऊन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. मंडळाचे अध्यक्ष उल्हास कोकणे यांनी तो मोठ्या नेटाने सुरू ठेवला असून, आतापर्यंत त्यांनी २० मुलींचे असे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे. 

निगडी-प्राधिकरणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव

महापालिका गणेश फेस्टिव्हल : महोत्सवावरून रूसवे फुगवे

पिंपरी : महापौरांनी पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलची घोषणा केल्यानंतर क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल दिवाळीपर्यंत राबविण्याची अजब योजना आखली आहे. 'पिंपरी-चिंचवड ...

पिंपरी शहरात प्रथमच जीएसबी गणेशोत्सव

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रंगास्वामी पेरूमल सभागृहात या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.जीएसबी समाज कोकण किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीलगत वसलेला समाज असून, त्यामध्ये व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. या समाजात विविध ...

जलपर्णीच्या नावाखाली ठेकेदारावर मेहेरनजर?

एकाच कंपनीला ठेका : सुमारे 40 लाखांचा खर्च
पिंपरी – पवना, मुळा व इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळा संपल्यानंतर जलपर्णी झपाट्याने वाढून नदी पात्रात जलपर्णीचा विळखा वाढत असतो. त्यामुळे जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने सन 2017-18 या एका वर्षांची वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबवून कामांचा ठेका एकाच कंपनीला दिला आहे. यावर सुमारे 40 लाख रुपये खर्च होणार आहे.

ताथवडे गावात जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत पाणीपुरवठ्याच्या कामासाठी 31 ऑगस्टपर्यंतची “डेडलाईन’

चौफेर न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील ताथवडे गावात जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू असून, 20 टक्के कामे अद्याप शिल्लक राहिली आहे. ही कामे 31 ऑगस्टपर्यंत मार्गी लावा, असे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

वाकड रस्ता चौकात पथदिव्यांची मागणी

चौफेर न्यूज – वाकड रस्ता चौकात विद्युत व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना रात्री अंधाराचा सामना करावा लागतो, अशी तक्रार मानवी हक्क संरक्षण संघटनचे शहराध्यक्ष अविनाश रानवडे यांनी ग क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.