पिंपरी – चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नुतनीकरमाचे काम महापालिकेने सुरु केले आहे. यासाठी तब्बल 18 कोटी रुपये खर्च केला जाणार असून प्रेक्षागृह 4 महिने बंद ठेवण्यात येणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 4 May 2018
तुमचा ट्विटरचा पासवर्ड लगेच बदला
नवी दिल्ली : ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाइटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. आत्तापर्यंत एकाही ट्विटर अकाऊंटचा मिस युज झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्या युजर्सला ट्विटरने पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.
Development near rivers: Maharashtra govt amends guidelines, allows ‘public’ construction between blue & red line
Under criticism over its failure to protect rivers, the Maharashtra Irrigation Department on Thursday amended its guidelines on development in the restrictive zone of rivers. The guidelines allow construction on land between the blue line and red line of rivers for public purposes, like roads, while putting the onus for the loss of life or property during floods on the authority giving permission for land use. Red lines and blue lines are artificial lines demarcating the river area on the floodline. The red line is decided on the maximum water level possibly once in 100 years and blue line is on maximum flood discharge in average 25 years. The prohibitive zone is the area between the two blue lines on the opposite side of the river, while the restrictive zone is the area between the blue line and red line. The guidelines for development in the restrictive zone as well as prohibitive zone of rivers were first issued on September 21, 1989, and had not been amended since then.
‘शास्तीकर रद्द’च्या विषयावर सेना-भाजपचे केवळ राजकारण
अनधिकृत बांधकामांना लावलेला शास्तीकर रद्द करण्याच्या विषयावरून शिवसेना भाजपचेे केवळ राजकारण चालले आहे. महिनाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून शास्तीकर माफीचा आदेश काढण्याचे आश्वासन घेऊन परतलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अन शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. दुसरीकडे शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे सांगणार्या व त्यासाठी राज्य शासनाला 15 दिवसांचा अल्टीमेटम देणार्या शिवसेनेला अद्याप आंदोलनासाठी मुहूर्त मिळालेला नाही.
पाणी फाऊंडेशनच्या महाश्रमदानात पिंपळे सौदागरमधील उन्नती सोशल फाऊंडेशन ‘प्रथम’
पिंपरी (Pclive7.com):- जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशने “चला गावाकडे” हा उपक्रम हाती घेतला आहे. या दिवशी महाश्रमदान दिन म्हणून साजरा करण्यात आला. या आवाहनाला साथ देत पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या सुमारे २०० सदस्यांनी पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात श्रमदान केले. या स्पर्धेत उन्नती सोशल फाऊंडेशनला प्रथम क्रमांक मिळाला.
आयुक्त, पक्षनेत्यांकडून शहरातील नाल्यांची पहाणी
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी अधिकाऱ्यांनसोबत आज गुरुवारी (दि. 3) पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांची पहाणी केली. लालटोपीनगर, मोहननगर, काळभोर नगर येथील मिल्क बेकरी, निगडीतील भक्ति शक्ती पेट्रोल पंप, कृष्ण मंदिर आणि निगडी चौक याठिकाणच्या नाल्यांची पाहणी केली.
थेरगावमधील १६ नंबर बसस्टॉपवर पीएमपीएमएल पास केंद्र सुरू
चौफेर न्यूज – ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध व अपंग व नागरिकांच्या मागणीनुसार स्थायी समितीच्या सभापती ममताताई विनायक गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीएमएलतर्फे थेरगावमधील १६ नंबर बस स्टॉप येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पास केंद्र सुरु करण्यात आले.
पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे अपंगांसाठी पेन्शन योजना – काळजे
चौफेर न्यूज – अपगांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पेन्शन योजना सुरु केली असून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ नि:समर्थ अपंग बांधवाना होणार आहे असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.
पिंपरीत अपंग केंद्राच्या कामाचे महापौर काळजे यांच्या हस्ते भूमिपूजन
अपंगासाठी पेन्शन योजना सुरु केली असून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ नि:समर्थ अपंग बांधवाना होणार आहे असे, मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. मोरवाडी येथे नि:समर्थ (अपंग) साठी बांधण्यात येणा-या कल्याणकारी केंद्राचे भूमिपूजन आज (गुरुवारी) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
‘क’ क्षेत्रीय कार्यालयावर बहूजन रिपब्लिक सोसालिस्ट पार्टीचे आंदोलन
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मधील बालाजीनगर, खंडेवस्ती परिसरात ऐन उन्हाळात पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने पाणी टंचाई होवू लागली आहे. याकडे प्रभाग क्रमांक आठ मधील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करु लागले आहेत. त्यामुळे बहूजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टीच्या वतीने क क्षेत्रीय कार्यालयावर आज (गुरुवारी) महिला व नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासह विविध मागण्यांसाठी हंडा मोर्चा काढण्यात आला. तसेच येत्या आठ दिवसात सदरील मागण्यांवर कार्यवाही न केल्यास क क्षेत्रीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.
संविधान बचाव म्हणणा-यांनी अगोदर संविधान समजून घ्यावे – भाऊ तोरसेकर
भ्रष्टाचाराच्या आरोपातून ए. राजा, कनिमोळी निर्दोष सुटले की न्यायव्यवस्था सुरक्षित असते. कर्नल पुरोहित निर्दोष सुटल्यास न्याव्यवस्था धोक्यात कशी? येते. संविधानाने संसद, सरकार आणि न्यायवस्थेला एकत्रित बांधले आहे. लोकसभा चालू दिली जात नाही. न्याय पालिकेवर संशय व्यक्त करत सरन्यायधीशावर महाभियोग आणला जातो. संसद चालू देणार नाही, न्याय व्यवस्था चालू देणार नाही. याला माफिया म्हणतात. मग, आता संविधान कोणापासून वाचवायचे आहे, याचा सुजान जनतेने विचार करावा. संविधान बचाव म्हणणा-यांनी अगोदर संविधान समजून घ्यावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि ‘जागता पहारा’ या एकमेव ब्लॉगचे लेखक भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच राज्य घटनेत बदल करण्याची तरतूद ठेवली असल्याचेही, त्यांनी सांगितले.
स्वर्गीय लोकनेते प्रमोद महाजन यांना पिंपरी चिंचवड भाजपातर्फे अभिवादन
पिंपरी (Pclive7.com):- स्वर्गीय लोकनेते प्रमोद महाजन यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड शहर भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेचे पुजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आले.
नव्या मोबाईल कनेक्शनसाठी कुठलेही आयडी प्रुफ पुरेसे
नवी दिल्ली -आधार कार्ड अभावी कुठलाही ओळखीचा पुरावा (आयडी प्रुफ) नव्या मोबाईल कनेक्शनसाठी पुरेसा असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र किंवा वाहन परवाना यांसारख्या आयडी प्रुफच्या आधारे दूरसंचार कंपन्या नवे सिम कार्ड जारी करू शकणार आहेत. दूरसंचार सचिव अरूणा सुंदरराजन यांनी याबाबतची माहिती दिली.
खासगी माहितीला कोणताही धोका नाही – बिल गेटस
चौफेर न्यूज – आधार कार्डामुळे कोणाच्याही खासगी माहितीला कुठलाही धोका नाहीय असे मत मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक बिल गेटस यांनी व्यक्त केले आहे. उलट आधार कार्ड योजनेची दुसऱ्या देशात अंमलबजावणी व्हावी यासाठी बिल आणि मेलिंडा गेटस फाऊंडेशनकडून वर्ल्ड बँकेला निधी पुरवण्यात येत आहे. भारतातील आधार कार्ड योजनेचे शिल्पकार नंदन नीलकेणी या प्रकल्पासाठी वर्ल्ड बँकेला मदत करत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)