बसस्थानकावर चालकांकडून घेतली जात नाही दक्षता
पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणे धोकादायक
पिंपरी : अगोदरच वादात सापडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावरील पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणे धोकादायक बनत चालले आहे. बसस्थानकावर चालकांकडून दक्षात घेतली जात नाही. दरवाजे उघडे असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत नाही. मार्गातच बंद बस पडतात. काही वेळा तर प्रवाशी बीआरटी थांब्यावर तर बस सेवा रस्त्याने धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना कोणत्या थांब्यावर थांबावे, असा प्रश्न पडतो. यामुळे दापोडी-निगडी हा बीआरटीएस मार्ग म्हणजे एक अडथळ्यांची शर्यत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिल्या जात आहेत.