Monday, 31 March 2014

कासारवाडीत महापालिकेच्या ठेकेदाराकडून फुटली जलवाहिनी

कासारवाडी येथील जलकुंभ परिसरातील जलवाहिनी ठेकेदाराकडून आज (रविवारी) सकाळी फुटली. सार्वजनिक सुट्टीमुळे पाणीपुरवठा विभागातही सुट्टीचा महौल असल्याने पाणी गळती रोखण्यास विलंब झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वायाला गेले.

महामार्गावर खिळे टाकण्याचा उद्योग पुन्हा सुरू !

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यावर खिळे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्याची पद्धत ही जुनीच आहे. मागील वर्षी या प्रकाराने वाहनचालकांना जेरीस आणले होते. काही काळाच्या विश्रांतीनंतर आता खिळे टाकून वाहने पंक्चर करण्याच्या प्रकारास पुन्हा सुरूवात झाली आहे. या प्रकारामुळे अनेक वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पुणे- मुंबई महामार्गावर आकुर्डी ते निगडी या रस्त्यावर मागील दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी खिळे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करण्याचा गोरख धंदा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

सरकारने आश्वासने पाळली नाहीत - लक्ष्मण जगताप

पिंपरी-चिंचवड वासियांच्या प्रश्नांची विधानसभेत दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत, म्हणूनच आपण आमदारकीचा राजीनामा दिला. आता जनतेच्या पाठबळावरच मी खासदार होणार असल्याचा सार्थ विश्वास आमदार लक्ष्मण यांनी थेरगाव येथे व्यक्त केला.
शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) चे उमेदवार व मनसे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सोनाई मंगल कार्यालय थेरगांव येथे शनिवारी रात्री मनसेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते.

शिरुर मतदारसंघात 450 कोटींची कामे केली - शिवाजीराव आढळराव पाटील



शिरुर मतदारसंघात आत्तापर्यंत 450 कोटींची कामे केली असल्याचा दावा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (शनिवारी) केला. त्यांच्या प्रचारार्थ यमुनानगर, त्रिवेणीनगर, चिखली भागात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

मतदारांशी साधला संवाद

पिंपरी : उमेदवारीअर्ज छाननी आणि पक्षचिन्हांचे वाटप होताच विविध राजकीय पक्षांचे, तसेच अपक्ष उमेदवार, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. प्रचार साहित्य तयार करून घेण्याची लगबग सुरू होती, तर रविवारी सुटीच्या दिवशी काही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला. पदयात्रा, मेळावा, कोपरा, सभा, बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला. ‘..यांनाच विजयी करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणला.
मावळ लोकसभा निवडणुकीची