“बीआरटी’चे प्रवक्ते विजय भोजने यांची माहिती
चौफेर न्यूज – शहरातील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील पदपथ विकसित करणार आहे. “अर्बन स्ट्रीट डिझाईन’ अंतर्गत उपक्रम हाती घेतला असून, त्यासाठी आकुर्डी परिसराची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती उपअभियंता तथा “बीआरटी’चे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली. यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील आठवड्यात 52 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.