Thursday, 12 April 2018

Why crime in PCMC just took a major hit

Citizens, activists, civil society and elected representatives had been demanding an independent commissionerate for Pimpri-Chinchwad since a long time citing rapid urbanisation, rising crime rate, inadequate police patrolling on the streets, and deteriorating law and order situation in the area as the reasons behind the demand

Citizens, activists, civil society and elected representatives had been demanding an independent commissionerate for Pimpri-Chinchwad since a long time citing rapid urbanisation, rising crime rate, inadequate police patrolling on the streets, and deteriorating law and order situation in the area as the reasons behind the demand. 

PCMC to charge parking fee on key roads soon

PIMPRI CHINCHWAD: Very soon, owners of two-wheelers will have to pay Rs2, while owners of four-wheelers will have to pay Rs10 as charges to park their vehicles by the road in Pimpri Chindhwad, where the parking policy applies.

प्लॅस्टिक ड्रमने रोखली जलपर्णी

आळंदी पालिका कर्मचाऱ्यांचा प्रयोग; पिंपरीच्या सांडपाण्यामुळे समस्या
आळंदी (पुणे): पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीपात्रात गेले काही महिने जलपर्णीची बेसुमार वाढ झाली आहे. पाणी पुरवठ्याच्या बंधाऱ्यातून पाणी उपसणेही कठीण झाले होते. त्यावर नगरपालिकेने कमी खर्चाचा उपाय शोधला असून प्लॅस्टिकचे 135 ड्रम वायरच्या साहाय्याने एकमेकांना बांधून ते पाण्यात सोडले आहेत, त्यामुळे जलपर्णी आटोक्‍यात आणली आहे. त्यासाठी पालिकेला सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला आहे.

पिंपरी शहराचे पहिले पोलिस आयुक्‍त कोण?

पिंपरी - महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय सुरू होणार आहे. यासाठी अवघे वीस दिवस शिल्लक आहेत. मात्र, अद्याप पोलिस आयुक्‍तालयाची जागाच निश्‍चित झालेली नाही. यामुळे आयुक्‍तालयाच्या जागेबरोबर शहराचे पहिले पोलिस आयुक्‍त कोण असणार, याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

"पीएफ' न भरणाऱ्या शहरात 622 कंपन्या

पिंपरी  - कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये लहान मोठ्या सर्व कंपन्यांनी स्वतःचा हिस्सा भरणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनेक कंपन्या ही रक्‍कम भरतच नाहीत. पिंपरी-चिंचवड परिसरातील अशा 622 कंपन्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) कार्यालयाने शोधून काढल्या आहेत. या कंपन्यांची 800 बॅंक खाती सील करून त्यामधून एक कोटी 32 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पीएफ कार्यालयाचे विभागीय आयुक्‍त अमिताभ प्रकाश यांनी "सकाळ'ला दिली. गेल्या आर्थिक वर्षात ही कारवाई करण्यात आली आहे. 

कुदळवाडीत भंगाराची सात गोदामे खाक

चिखली - कुदळवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत भंगार मालाची सात गोदामे जळून खाक झाली. आग लागलेल्या गोदामाशेजारीच ऑइलची कंपनी होती. या कंपनीच्या मागच्या भागालाही आग लागली. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी जिवाची बाजी लावून प्रथम कंपनीला लागलेली आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी पाच बंब व स्थानिक नागरिकांचे पाण्याचे दहा टॅंकरच्या साह्याने भंगार मालाच्या गोदामाला लागलेली आग बुधवारी पहाटे आटोक्‍यात आणली. 

पिंपरी काळेवाडीतील भुमिपुत्रांनी तांबडया मातीचा वारसा जपला

पंचनाथ उत्सवातील कुस्तीच्या आखाडयात शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले
चौफेर न्यूज – महाराष्ट्र आजही आपल्या पराक्रमांची आणि संस्कृतीची गाथा सांगतो ती तांबड्या मातीतील कुस्तीमुळे. साडेतीनशे वर्षांपुर्वी शिवछत्रपतींच्या हाकेला ओ देताना हजारो पैलवान बाहेर पडले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. भगव्या झेंड्याचा धाक काश्मिर ते कन्याकुमारी, काबुल ते कंधारपर्यत बसवला. राजघराण्यातील मंडळीही कुस्त्या खेळत असत. छत्रपतीचे धाकटे बंधू चिमासाहेब महाराजही निष्णात कुस्तीगीर होते. तांबडया मातीतील कुस्तीला देशभर राजाश्रय मिळत होता. पवित्र इंद्रायणी आणि पवनेच्या कुशीत वसलेल्या परिसरात स्वातंत्र्य पुर्व काळात खडकी व देहूरोड येथे दारुगोळ्याचा कारखाना सुरु झाला. स्वातंत्र्यानंतर 1952 साली पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी पिंपरी मध्ये एचए कंपनीचे भूमीपुजन केले. यानंतर या पंचक्रोशीची औद्योगिकीकरणाकडे वाटचाल सुरु झाली. उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण आणि खासदार आण्णासाहेब मगर यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवड शहरात एमआयडीसीचा विस्तार झाला. देशभरातून रोजीरोटीसाठी आलेल्या कष्टक-यांमुळे पिंपरी चिंचवड नगरीने आंतरराष्ट्रीय पातळीने अनेक क्षेत्रात नाव कमविले. पाच गावांचे शहर ते मेट्रोसिटी आणि स्मार्टसिटीकडे वाटचाल सुरु असणा-या पिंपरी काळेवाडीतील भूमिपुत्रांनी 21 व्या शतकातही तांबडया मातीचा वारसा जपत भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविले.

पक्षी आणि प्राण्यांसाठी तयार केली पाणपोई

जुनी सांगवी - उन्हाळ्यात अन्न पाण्यावाचुन भटकी जनावरे, पक्षी यांचे हाल होतात. त्यामुळे असे पक्षी, प्राणी अन्नपाण्याच्या शोधात परिसर सोडुन स्थलांतर करतात. पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे परिसरातील चिवचिवाट उन्हाळ्यात कमी होवुन परिसरात एक उजाड शांतता पसरते. परंतु, शहरात सिमेंटची जंगले, वृक्षांचा अभाव, दाट लोकवस्तीमुळे एरव्ही मुबलक दिसणारे पक्षी दुर्मिळ झाले आहेत. माणसांसाठी उभारलेल्या पाणपोई आपण जागोजागी पहातो. मात्र पक्षी प्राण्यांची तहान भागवुन त्यांचा उन्हाळा सुखदायक होण्यासाठी कै.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठानच्या वतीने खआस प्राण्यांसाठी पाणपोई तयार करण्यात आली आहे. या पाणपोईत दुस-याच दिवशी रस्त्यावरून जाणा-या प्राण्यांनी आपली तहान भागवली.

महिलांना वाहन चालविण्याचे पालिकेतर्फे प्रशिक्षण

पिंपरी - ‘‘महिलांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा, यासाठी महापालिका हद्दीतील किमान आठवी उत्तीर्ण महिलांना हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गरजू महिलांना वाहन खरेदीसाठी महापालिकेमार्फत अनुदानाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोरवाडी आयटीआयमार्फत ऑनलाइन परीक्षेचा सराव करून घेण्यात येणार आहे,’’ अशी माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांनी दिली. 

बीआरटी सक्षमीकरणासाठी आराखडा

पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बीआरटी' सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याच्या अंमलबजावणीवर सध्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

‘पीएमपी’च्या 922 बसेसमध्ये अग्निरोधक यंत्रणा

पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या कंत्राटदारांच्या आणि प्रशासनाच्या बसेसमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्याचे काम सुरू झाले असून, आतापर्यत सुमारे 922 बसेसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून सीएनजीच्या बसेसना आगी लागण्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र ही  यंत्रणा यापूर्वीच बसविण्यास हवी होती अशी चर्चा प्रवाशी मंचाच्या सदस्यांनी केली आहे. मात्र उशीरा का होईना प्रशासनास जाग आल्यामुळे पुढील काळात बसेसना आगी लागण्याचा घटना घडल्यास त्या विझवणे सोपे जाणार आहे. उर्वरित बसेसमध्ये देखील अग्निरोधक यंत्रणा बसविण्याचे काम सुरू असून, पुढील काही महिन्यात ते पूर्ण होईल अशी माहिती प्रशासनाने दिली..

पगार रखडल्याने ‘एचए’ कामगारांना झळा

पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीतील कामगारांचा पगार तब्बल 13 महिन्यांपासून रखडला आहे. कंपनीचे उत्पादन सुरू असले तरी कामगारांना पगारापासून वंचितच रहावे लागत आहे. 25 टक्के पगार घेण्याबाबत व्यवस्थापनाकडून प्रस्ताव ठेवला जात आहे; मात्र कामगारांच्या हातामध्ये तुटपुंजा पगार मिळणार असल्याने ते याला विरोध दर्शवित आहेत. त्यामुळे 13 महिने कामगारांना पगार रखडण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

सत्ताधारी भाजपा का पालकमंत्री को ही झटका!

सोशल मीडिया के नाम पर जनसम्पर्क विभाग के निजीकरण का प्रस्ताव खारिज
पिंपरी चिंचवड मनपा की विभिन्न योजनाओं, जनहित के फैसलों, कल्याणकारी उपक्रमों, विकास परियोजनाओं को प्रभावी रूप से लोगों तक पहुंचाने के लिए सोशल मीडिया का इस्तेमाल और उसके लिए समन्वयक संस्था की नियुक्ति का विवादित प्रस्ताव आज आखिरकार स्थायी समिति ने खारिज कर दिया। यह प्रस्ताव मनपा के जनसम्पर्क विभाग के निजीकरण के समान बताकर विपक्षी दलों के साथ ही शहर के सामाजिक संस्था- संगठनों ने इसका पुरजोर विरोध किया था। खुद सत्ताधारी भाजपा के खेमे से भी इस प्रस्ताव के प्रति नाराजगी जताई गई। इसके चलते यह प्रस्ताव ख़ारिज कर दिया गया। सत्ताधारी दल का यह फैसला पालकमंत्री गिरीश बापट के लिए झटका माना जा रहा है क्योंकि जिस संस्था को समन्वयक के तौर पर नियुक्त किया जाना था वह उनके करीबी बताई जा रही है।

सांगवीत संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

जुनी सांगवी : येथील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व नगरसेवक संतोष कांबळे यांच्यावतीने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षा वाचनालयात विद्यार्थी संख्या जास्त, अपुरी व्यवस्था

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील महापालिकेच्या शहीद अशोक कामठे यांच्या नावाने सुरू केलेल्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्थेसाठी गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रारी वाढत आहेत .येथील आसन क्षमता १४४ इतकी असून तब्बल २३८ जणांना यात प्रवेश दिला आहे. जागा मर्यादेमुळे विद्यार्थ्यांमधेच जागेवरून वादावादी व कुरबुरीच्या तक्रारी वाढत अाहेत. विद्यार्थी सांगतात की,महापालिकेने येथील सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेश मार्च २०१९ पर्यंत निश्चित केलेला असूनही वरिष्ठांच्या आदेशाचेही पालन केले जात नसून नव्या जुन्या विद्यार्थ्यांचा वाद उफाळून येत आहे.

“जेएसपीएम’च्या स्वामी विवेकानंद शाळेचे भूमिपूजन

भोसरी – लातूर येथील जेएसपीएम संस्थेच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अराईज सीबीएसई शाळेचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले.

आयुक्‍तांविरोधात मनसेचे धरणे आंदोलन

– अधिकाऱ्यांना अभय देत असल्याचा आरोप
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय देत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

पिंपरी चिंचवडला वालीच उरला नाही – अजित पवार

चौफेर न्यूज –  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इंन्ट्रेस नागपूरात आहे, तर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचा पुण्यात आहे. पिंपरी चिंचवडकरांच्या प्रश्नांशी यांना काहीच देणंघेणं नाही.निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वानसे हे विसरलेत. निवडून दिलेल्या आमदारांचे शहरवासियांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे शहराला आता वालीच उरला नाही अशी टिका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल वारी

सांगवी – स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पिंपळे गुरव येथील तीन तरुणांनी वेगळा आणि थोडा खडतर मार्ग निवडला. माऊली जगताप, हेमंत पाडुळे आणि विशाल कदम या तीन तरुणांनी सायकलद्वारे पिंपळे गुरव ते गोवा प्रवास केला.

“खिळेमुक्‍त अभियाना’त नगरसेवक, अधिकारी!

पिंपरी – शहरात काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या खिळेमुक्‍त झाडे या अभियानात आता नगरसेवक आणि पालिकेचे अधिकारी ही हिरारीने सहभाग घेऊ लागले आहेत. मंगळवारी सकाळी या अभियानामध्ये शहराच्या उपमहापौर, नगरसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. तसेच काही तरुणांनी मिळून सुरु केलेल्या या अभियानात आता कित्येक संस्था जोडल्या गेल्या आहेत.

परवडणाऱ्या घरांसाठी "प्रीमिअम एफएसआय' मोफत

पुणे  - छोट्या आणि परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला चालना मिळावी, यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) "प्रीमिअम एफएसआय' मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. एक एकराच्या वरील क्षेत्रफळावर तीस आणि साठ चौरस मीटरच्या आकाराच्या सदनिकांचा गृहप्रकल्प राबविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना कोणतेही शुल्क न घेता मान्य "एफएसआय'पेक्षा वीस टक्के जादा एफएसआय मिळणार आहे. त्यामुळे घरांच्या किमतीदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.