Pimpri Chinchwad: Transfer stations — for segregation of dry ..
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 22 July 2018
PCMC starts 'no school bag day' twice a month for pupils
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will observe ‘no school bag day’ twice a month in its 105 municipal schools that have 38,000 students.
प्लास्टर पॅरीस गणेश मुर्त्यांवर बंदी आणावी - बजरंग दल
जुनी सांगवी (पुणे) : पर्यावरण वाचविण्यासाठी प्लास्टीक पिशवी बंदी सारखीच गणेश उत्सवासाठी पर्यावरणपुरक उत्सव साजरा करण्यासाठी प्लास्टर पॅरीसच्या मुर्त्यांवर बंदी आणावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर बजरंग दलाच्या वतीने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.
नवीन नागरी सुविधा केंद्रे नकोत : केंद्रचालकांची मागणी
जुनी सांगवी : नागरिकांना एकाच ठिकाणी नागरिकांची विविध कामे व दाखले वेळेवर मिळावेत, यासाठी तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून नांदेड पॅटर्ननुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याच नियंत्रणाखाली मात्र खाजगी तत्वावर नागरी सुविधा केंद्रे देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची चिंचवडची सभा उधळणार : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
मराठा आरक्षणाची मागणी करूनही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. राज्यभरात 58 मोर्चे काढूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचे गांभीर्य नाही. समाजाला आश्वासनावरच ठेवले आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून चिंचवड येथील मुख्यमंत्र्यांची सभा उधळवून लावणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला.
घर बचाव संघर्ष समितीत दुही कायम
वाल्हेकरवाडी (पुणे) : सोमवारी (ता.23) मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात चाफेकर स्मारकाच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. जोपर्यंत रिंगरोडची टांगती तलवार आमच्या घरावरील प्रशासन काढत नाही तोपर्यंत आम्ही शहरात कुठल्याही मंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देणार असा पवित्रा स्वाभिमानी घरबचाव संघर्ष समितीने घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती करावी !
पिंपरी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ रोजी पिंपरी चिंचवड येथे विविध शासकीय कामकाजाच्या उदघाटनासाठी येत आहे. या अगोदर देखील मुख्यमंत्री अनेक वेळा शहरात येऊन गेले त्यांनी शहरवासियांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप आश्वासन पूर्ण केलेले नाही, आता मुख्यमंत्री पुन्हा शहर दौऱ्यावर येत असून त्यांनी आता तरी दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी ‘घर बचाव संघर्ष समिती’ने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राद्वारे केले आहे.
पंतप्रधान आवास प्रकल्पाचे भूमिपूजन रद्द
वादाची किनार असलेला पंतप्रधान आवास योजनेच्या चिखलीतील गृहप्रकल्प आणि मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन सत्ताधारी भाजपने लांबणीवर टाकले आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होऊ घातलेले भूमिपूजन अचानक लांबणीवर टाकल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र, भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन नियोजित असल्याचे सांगत याचा इन्कार केला.
“बिल्डर लॉबी’चा आवास योजनेला “खोडा’?
तीनदा विषय तहकूब : “पीएम-व्हीजन’ला सत्ताधाऱ्यांचाच “खो’
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वप्नातील प्रकल्प’ अशी ओळख असलेल्या “प्रधानमंत्री आवास’ योजनेची पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात सत्ताधारी भाजप अपयशी ठरताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाला शहरातील “बिल्डर लॉबी’मुळे खोडा बसला आहे का? असा संशय व्यक्त होत आहे.
’पार्किंग पॉलिसी’ विरोधात पालिकेसमोर आंदोलन
विविध सामाजिक संघटनांचा सहभाग
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील सत्ताधार्यांनी शहरवासियांवार लादलेली ‘पार्किंग पॉलिसी’ जाचक असल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधरण सभा आज आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहक हक्क संघर्ष समिती, रिपब्लिकन संघटना, लोकशाहीर संघटना यांच्यासह विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. धम्मराज साळवे, अमोल उबाळे, अंजली गायकवाड, सतिश कदम, दिपक खैरणार, अजय लोंढे सहभागी झाले होते.
PCMC to tighten norms on roadwork
Following several complaints of digging sans permission, civic body has framed a stringent new policy.
रस्ते खोदाई पडणार महागात
पिंपरी – शहरातील रस्ते खोदाईबाबत पिंपरी- चिंचवड महापालिकेने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार खोदाईसाठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विनापरवाना किंवा परवानगीपेक्षा अधिक खोदाई केल्यास दुप्पट दंड आकारण्यात येणार आहे. तसेच, अनधिकृत खोदाई करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. महापालिकेच्या आज (शुक्रवारी) झालेल्या सभेमध्ये जोरदार खल झाल्यानंतर या धोरणास मंजुरी देण्यात आली.
[Video] पिंपरी-शहरातील खड्डे प्रश्नावर पिंपरी पालिकेच्या सभेत गदारोळ !
पिंपरी-शहरातील खड्डे प्रश्नावर गाजली पिंपरी पालिकेची सभा !
आयटी पार्कचा तिढा सुटेना!
हिंजवडी आयटी पार्कपर्यंत सुस्साट पोहोचण्याचे आयटीयन्सचे स्वप्न अजूनही दृष्टीक्षेपात येण्याची चिन्हे नाहीत. आयटी पार्कमधील वाहतुकीच्या समस्येत सातत्याने वाढच होत असून, पावसाच्या आगमनानंतर या भागातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्या रुंदीकरणास खीळ बसल्याने आयटीयन्सला ऑफिसला जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत वाढ झाल्याचे चित्र आहे. 'मटा'ने यासंदर्भात पाहणी केली असता अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी त्यांना ऑफिसला जाण्यास लागत असलेल्या तासन्तास उशिराचा पाढाच वाचला.
मालवाहतूकदारांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी भुसार बाजारातील आवक घटली
पिंपरी-चिंचवड उपबाजारातही आवक कमी
मांजरी, मोशी आणि उत्तमनगर उपबाजारांमध्ये आवक नेहमीच्या तुलनेत
सर्वच बाजारात भाव स्थिर
मांजरी, मोशी आणि उत्तमनगर उपबाजारांमध्ये आवक नेहमीच्या तुलनेत
सर्वच बाजारात भाव स्थिर
शहर पोलीस आयुक्तालय प्रेमलोक पार्कमध्येच होणार; महापालिका सर्वसाधारण महासभेची मान्यता
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले स्वतंत्र नवीन पोलीस आयुक्तालय चिंचवडच्या प्रेमलोक पार्क मधील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्येच होणार अहे. त्यासाठी शाळेची इमारत पोलिसांना भाडे तत्वावर देण्यासाठीच्या विषयाला आज शुक्रवारी (दि. 20) महासभेने मान्यता दिली आहे.
पिंपरीत शहर पोलिसांचे ‘सुरक्षा अभियान’
पीएमपी बसमधील वारंवार होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी पिंपरीतील परिमंडळ तीनच्या पोलिसांनी सुरक्षा अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत महिला पोलिस कर्मचारी पीएमपी बसमधील प्रवाशांची जनजागृती करणार आहेत. आज (शुक्रवार) याचा शुभारंभ पिंपरीतील आंबेडकर चौकातून करण्यात आला.
“त्या’ स्वच्छतागृहाकडे दुर्लक्षच
पिंपरी – पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेले महिला स्वच्छतागृह 12 डिसेंबर 2017 मध्ये अज्ञातांनी जाळले होते. या घटनेला सात महिने उलटून गेले तरी नवीन स्वच्छता गृह तर सोडाच या स्वच्छतागृहाची दुरुस्ती देखील महापालिकेने केलेली नाही. त्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.
शहरातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्थेत
इसिएने दिले आयुक्तांना निवेदन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. शहरात नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. सार्वजनिक शौचालय सारख्या मुलभूत सुविधा स्वच्छ भारत अंतर्गत पुरविल्या आहेत. पण त्या सोयी-सुविधांची दैनंदिन काळजी व जोपासना करण्याची जबाबदारी पार पाडण्यात पालिका अयशस्वी झाली आहे. आपण त्वरित शहरातील सर्व शौचालये आणि सार्वजनिक जागांची दैनंदिन स्वच्छता व निगा राखण्याबाबत धोरण अमलात आणून नागरी आरोग्याच्या बाबत कठोर पावले उचलावीत. आपल्या शहरातील स्वच्छ भारत अंतर्गत उभारलेली स्वच्छतागृह बेवारस झाली आहेत. त्यांच्या साफ-सफाईची कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशा मागणीचे निवेदन इसिएतर्फे महापालिका आयुक्तांना दिल्याचे संचालक विकास पाटील यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)