शहरातील तिन्ही खासदार, आमदारांचे अपयश
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा महत्त्वकांशी प्रकल्प, तसेच गेल्या आठ वर्षांपासूनचे बहुचर्चित मोशीतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र गुंडाळण्याची तयारी चालू झाली आहे. त्यामागे केंद्र सरकारकडून पर्यावरणविषयक 'ना हरकत' दाखल मिळत नसल्याचे प्रमुख कारण आहे. मात्र, दिवसेंदिवस त्यांची गरज कमी होऊ लागल्यानेही प्रदर्शन केंद्र न करण्याचे प्राधिकरणाचे मत बनले आहे. प्राधिकरणाने तशी तयारी केली असून या कामासाठी काढलेली निविदा रद्द करण्याचे पाऊल उचलले आहे.