MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 28 June 2018
नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75% रक्कम काढण्याची सुविधा
नवी दिल्ली – नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75टक्के रक्कम काढण्याची सुविधा देण्याचा निर्णय सेवानिवृत्ती निधी संस्थेने (ईपीएफओ) जाहीर केला आहे. आपल्या प्रॉव्हिडंट फंडातील 75 टक्के रक्कम काढून घेतल्यानंतर उर्वरित 25 टक्के रकमेसह आपले प्रॉव्हिडंट फंड खाते चालू ठेवण्याची सवलतही खातेदाराला देण्यात आलेली आहे.
प्राध्यापकांना कमी करता येणार नाही
'एआयसीटीई'ची इंजिनीअरिंग कॉलेजांना ताकीद
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेज प्रशासनाने प्राध्यापक-विद्यार्थी प्रमाणात बदल झाल्याचे कारण पुढे करून प्राध्यापकांना कामावरून कमी करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने (एआयसीटीई) पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने इंजिनीअरिंग कॉलेजांसोबत व्यावसायिक कॉलेजांमधील प्राध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेज प्रशासनाने प्राध्यापक-विद्यार्थी प्रमाणात बदल झाल्याचे कारण पुढे करून प्राध्यापकांना कामावरून कमी करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने (एआयसीटीई) पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने इंजिनीअरिंग कॉलेजांसोबत व्यावसायिक कॉलेजांमधील प्राध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
लोणावळा लोकलच्या वेळापत्रकात बदल
गेल्या एक महिन्यापासून विविध कामांमुळे बंद असलेल्या पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारच्या वेळेतील लोकल सुरू होण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावरील देखभाल-दुरुस्तीचे काम एक ते २७ जुलै या कालावधीत सुरू केले जाणार असून, दुपारच्या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात या कालावधीत बदल करण्यात आला आहे.
किराणा वस्तूंच्या किरकोळ पॅकिंगवरील प्लास्टिक बंदी उठवली; पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा
मुंबई (Pclive7.com):- किराणा दुकानातील पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. या निर्णयामुळे किरकोळ दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मसाला, साखर, तांदूळ, तेल आदी वस्तूंच्या विक्रीसाठी किरकोळ पॅकेजिंगवरची बंदी उठवण्यात आली आहे.
‘एचसीएमटीआर’च्या जागेत गार्डन आणि जॉगिंग पार्क ?
घर बचाव संघर्ष समितीचा आरोप
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरासाठी संयुक्तिक विकास आराखड्यासाठी मंजूर असलेल्या ट्राम रिंगरेल एचसीएमटीआरच्या आरक्षित प्रकल्पाच्या जागेवर पिंपरी महापालिकेने गार्डन आणि जॉगिंग पार्क बेकायदेशीरपणे बनविले असल्याचा आरोप घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केला आहे. तसेच माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरासाठी संयुक्तिक विकास आराखड्यासाठी मंजूर असलेल्या ट्राम रिंगरेल एचसीएमटीआरच्या आरक्षित प्रकल्पाच्या जागेवर पिंपरी महापालिकेने गार्डन आणि जॉगिंग पार्क बेकायदेशीरपणे बनविले असल्याचा आरोप घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केला आहे. तसेच माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
महापौरांच्या प्रभागातील विकासासाठी असणार सल्लागार
पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांच्या प्रभाग क्रमांक तीन च-होली, मोशी गावठाण प्रभागातील रस्ते, आरक्षणे विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार नेमणुकीच्या समितीची २४ एप्रिल २०१८ रोजी शहर अभियंत्याच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मे.नियोजन कन्सल्टंट यांनी च-होली येथील सर्व्हे क्रमांक १३१ येथील आयटुआरच्या बदल्यात ताब्यात आलेल्या महापालिकेच्या जागेवरील जलतरण तलावाची स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत.
सत्ताधाऱ्यांनो, दारूपासून गरिबांचे संसार वाचवा
पूर्वी काँग्रेस राजवटीत, दारू हा कायम चर्चेचा विषय असे. बहुसंख्य पुढाऱ्यांनाच दारू दुकानांचे परवाने बक्षीस मिळत. त्यामुळे मद्य, मद्यपी, व्यसनाधीनता यावर फारशी काथ्याकूट होत नव्हती. गावठी दारू, खोपडी अथवा ताडी-माडी प्यायल्याने कुठे कोणी दगावले की तेव्हढ्यापुरती प्रसारमाध्यमे तुटून पडत. नशाबंदी म्हणा की दारूबंदी खाते हे निव्वळ ‘खाते’ असल्याने त्यांनाही त्याचे सोयरसूतक नसे. २ ऑक्टोबरच्या महात्मा गांधी जयंतीपुरता ‘ड्राय डे’, बाकी ३६४ दिवस तळीरामांचे राज्य. हे सर्व भेसूर सामाजिक चित्र गल्ली ते दिल्ली भाजप सत्तेत आल्याने बदलेल, अशी एक भाबडी अपेक्षा होती. सगळे मुसळ केरात गेले. राज्यभर प्लॅस्टिकबंदी झाली, पण कित्येक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या दारूवर कायमची बंदी घालायचे कोणीही नाव घेत नाही. अगदी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’सुद्धा चुप्पी साधून आहे. उलटपक्षी कधी नव्हे इतके दारू गुत्यांची संख्या वाढली आहे. हेच सरकार आल्यानंतर, मुंबईत विषारी दारूप्राशनाची सर्वांत मोठी दुर्घटना होऊन अनेकजण दगावले. आता तीन वर्षांनंतर लक्षात येते, की एकूणच ‘कारभार’ कोणत्या दिशेने जाणार याचे ते निदर्शक होते, असे नाइलाजाने म्हणावे लागते. आज शहरात दारूगुत्त्याशिवाय झोपडपट्टी अशक्य झाली आहे. गल्लोगल्ली हातभट्टीचे अड्डे वाढलेत. पिंपरी- चिंचवड शहरातील हातभट्टीचे गुत्ते पहिल्यापेक्षा दुप्पट झाले. दारूच्या दुष्परिणामांवर चर्वितचर्वण भरपूर झाले, कृती मात्र कोणीच करत नाहीत. आता फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते असल्याने त्यांच्याकडून काहीतरी कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.
वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्प संथगतीने
पिंपरी - वाल्हेकरवाडीतील स्पाइन रस्त्यालगत नवनगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या ७९२ घरांच्या गृहयोजनेसाठी कामाचे आदेश देऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही या प्रकल्पाच्या कामाने अपेक्षित वेग पकडलेला नाही. प्रकल्पाला विलंब होत असल्याने प्राधिकरणातर्फे कंत्राटदाराला सध्या दररोज दहा हजार रुपये दंड लागू आहे. दंडापोटी कंत्राटदाराकडून प्राधिकरणाने मे अखेरपर्यंत ४५ लाख रुपये वसूल केले आहेत.
प्रदूषणमुक्तीकडे पिंपरी शहराची वाटचाल
पिंपरी - प्रदूषणामुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका कमी व्हावा, म्हणून केंद्र सरकारने शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसचा वापर करण्याचे ठरवले आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील रस्त्यांवर या बस चालविण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक प्रशिक्षण संस्थेला (सीआयआरटी) देण्यात आले आहेत. हा अहवाल तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे सीआयआरटीचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले.
ईसिएच्या उपक्रमात विद्यार्थी झाले सहभागी
विद्यार्थ्यांनी जमा केले घरचे प्लास्टिक
पिंपरी- एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनतर्फे शहरामधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांमधूनच ई-कचरा संकलन केले जाते. मोशीमधील श्री श्री राविशंकर विद्यालय आणि तळवडेतील राजा शिवछत्रपती प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील एकदाच वापरू शकणारे प्लास्टिक एका ठिकाणी जमा केले. तसेच विद्यार्थ्यांनी 29 किलो ई-कचरासुद्धा आणून इसिएच्या ताब्यात पुढील व्यवस्थापनासाठी आणून दिल्याचे इसिएचे संचालक आणि पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी सांगितले.
वृक्षारोपण करुन साजरी केली वटपौर्णिमा
निगडी – वट पौर्णिमेला पर्यावरणासाठी महत्त्वाच्या वट वृक्षाचे पूजन केले जाते. सध्याचा पर्यावरणाचा ऱ्हास पाहता वट वृक्षाच्या पूजनासोबत त्याचे रोपण आणि संवर्धन देखील गरजेचे आहे. हीच बाब ध्यानात घेऊन एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने (इसीए) वडाच्या रोपांचे रोपण केले.
नियमितीकरणास मुदतवाढ
अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने आठ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. या वाढीव मुदतीत नागरिकांनी बांधकामे नियमित करण्यास अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
निळ्या पुररेषेच्या बाहेरील हरित पट्टा रहिवासी करण्यास शासनाची मान्यता; आमदार जगतापांच्या पाठपुराव्यास यश
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जुन्या व वाढीव क्षेत्राच्या हद्दीतील निळ्या पुररेषेच्या बाहेरील नाविकास विभागातील क्षेत्र रहिवास विभागात सामाविष्ट करण्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप मागील चार वर्षापासून पाठपुरावा घेत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले, निळ्या पुररेषेच्या बाहेरील नाविकास विभागातील क्षेत्र रहिवास विभागात सामाविष्ट करण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला असून जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
भाजपच्या काळात भेटवस्तुची परंपरा होणार खंडित
- यंदा दिंड्यांना भेट वस्तू नाहीच
पिंपरी – आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदा भेटवस्तू म्हणून “तंबू’ देण्याचे विचाराधीन होते. मात्र, बुधवारी (दि. 27) झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चाच न झाल्याने दिंड्यांना यंदा भेटवस्तू न देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून सुरु असलेली भेटवस्तू देण्याची परंपरा भाजपच्या काळात खंडित होणार आहे.
सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी तिसऱ्या स्थानी
चौफेर न्यूज – देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले असून या यादीत मराठी भाषा आता तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्क्यांवरुन ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर बंगाली भाषा ही दुसऱ्या स्थानी आहे.
आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली!
- कार्यपद्धतीत बदल करण्याचा सभागृहात सल्ला
पिंपरी – महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रत्येक आयुक्तांनी कामाच्या माध्यमातून आपली छाप सोडली आहे. मात्र, श्रावण हर्डीकर यांच्यावर सत्ताधारी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा दबाव असल्याचे त्यांच्या कामकाजावरुन दिसून येते. मात्र, हर्डीकर यांनी हा दबाव झुगारुन काम करावे, असा सल्ला नगरसेवकांनी आयुक्त हर्डीकर यांना दिला.
महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा
संजोग वाघेरेंचा टोला ः सत्ताधाऱ्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आगपाखड
पिंपरी – सभा तहकुबीचा राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार करावा, असा उपरोधक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी लगावला आहे. वाघेरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सत्ताधारी भाजपवर आगपाखड केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)