Saturday, 14 September 2013

सेवा विकास सहकारी बँकेतर्फे कर्मचा-यांना 35 टक्के बोनस

राज्यातील सर्वाधिक बोनस देणारी सहकारी बँक पिंपरीतील सेवा विकास सहकारी बँकेत कर्मचा-यांना सर्वाधिक 35 टक्के बोनस देणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी यांनी विशेष बैठकीत जाहीर केले. 

नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीच्या स्वागतातही गटबाजी

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेल्या उमेदवारीचे पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.  मात्र त्यातही गटबाजी दिसून आली.

ऑटो क्लस्टरमध्ये 'फास्टनर' प्रदर्शन आणि कार्यशाळेला प्रारंभ

अ‍ॅनेक्स मिडीया मार्केटींग नेटवर्क प्रा.लि. यांच्या वतीने येत्या 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत चिंचवड येथे प्रथमच इंडस्ट्रीयल अँड ऑटोमोटीव्ह फास्टनर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

थेरगावात अल्पवयीन चोर जाळ्यात - २० लॅपटॉप, २४ मोबाईल जप्त

पुणे, पिंपरी-चिंचवड, वाकड, थेरगाव, िहजवडी, आकुर्डी, तळेगाव, आळंदी, वाघोली आदी भागातून दिवसाढवळ्या लॅपटॉप व मोबाईल चोरणारा भुरटा व अल्पवयीन चोर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे.

वरिष्ठ निवांत; कनिष्ठांवर ताण

पिंपरी : पवना धरण परिसरात आणि मावळ पश्‍चिम पट्टय़ात ढगफुटी झाली. मेघगर्जनेसह झालेल्या अतवृष्टीमुळे पवना नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. रात्री पावणेबाराच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील नदीकाठच्या भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत तातडीच्या दक्षतेच्या उपाययोजनांसाठी महापालिकेची यंत्रणा कामी आली. परंतु जबाबदार वरिष्ठ अधिकारी निवांत राहिले, तर कनिष्ठ कर्मचार्‍यांनीच ही परिस्थिती हाताळली. त्यांच्यावर कामाचा ताण आला. ब प्रभागातील महत्त्वाच्या अधिकार्‍यांचे मोबाईल दुसर्‍या दिवशी सायंकाळपर्यंत ‘नॉट रिचेबल’ होते.

सुरक्षिततेबाबत मंडळे उदासीन

पिंपरी : गणेशोत्सवात सर्वच मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत होते. मात्र या आवाहनाला मंडळांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. बाप्पाने केवळ २८ मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सद्बुद्धी दिली आहे. 

विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षगणनेची माहिती

पिंपरी : आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळ विद्यापीठ यांच्या सहकार्याने ‘निर्वनीकरण आणि वृक्षगणना’ आपत्ती व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यांनी वृक्षगणनेची माहिती कार्यशाळेत घेतली.

सोनालीचे नृत्य, सावनीचे गायन

पिंपरी : नटरंगमधील ‘अप्सरा आली..’ वर प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सादर केलेला दिलखेच नृत्याविष्कार, सावनी रवींद्र यांचे मधुर गायन.., अशा सूर आणि नृत्याच्या साथीने अठराव्या पिंपरी- चिंचवड महोत्सवाचे उद्घाटन झाले. 

पवनेला पूर; घाट पाण्यात

पिंपरी - पवना धरणातून 10 हजार 736 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग केल्याने पवना नदीला गुरुवारी मध्यरात्री पूर आला.

ऐनवेळच्या प्रस्तावाद्वारे निधीची पळवापळवी

पिंपरी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत झालेल्या स्थायी समितीच्या 26 सभांपैकी केवळ 11 सभांमध्ये ऐनवेळच्या विषयांद्वारे 30 कोटींच्या तरतुदी वर्ग करण्यात आल्या आहेत.

'मोदींच्या उमेदवारीने तरुणाई आनंदली '



पुणे - देशवासीयांचा मूड लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पक्षाच्या वतीने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले.