Monday, 18 May 2020

Stranded residents return, housing societies worried; PCMC says 14-day home quarantine mandatory

Video: पिंपरी-चिंचवडकर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने वाढदिवसाला YCM रुग्णालयाला दिले 95 PPE किट्स 

उद्योगांची ‘चाके’ आजपासून ‘धडाडणार’

अटी शर्तींसह कंपन्यांना परवानगी; बांधकाम क्षेत्रालाही दिलासा

पिंपरी – करोनाच्या संकटामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच उद्योगांमधील “खडखड’ गेल्या साठ दिवसांपासून थांबली होती. त्याला आजपासून (सोमवार) गती मिळणार आहे. काही अटी व शर्तींवर कंपन्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. तर बांधकाम व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला असून, शहरातील बांधकामेही आजपासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईच्या टेंडरवरील हरकतीची उद्या सुनावणी

 नगरसेविका सिमा सावळेंनी घेतली होती हरकत

लॉकडाउन ४ साठी केंद्राची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद राहणार ?

केंद्र सरकारकडून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसंच कॉलेज, शाळा, सिनेमागृह, धार्मिक प्रार्थनास्थळंदेखील बंदच राहणार आहेत. राजकीय कार्यक्रमांवरील बंदीही कायम राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे. आंतरराज्य तसंच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त एअर अॅम्ब्युलन्सला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहममंत्रालयाने नियमावलीत हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हाय रिस्क असणाऱ्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनचं कठोरपणे पालन केलं जाणार आहे.

‘उद्योगनगरी’ला पुन्हा गतीमान करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे तज्ञांसोबत ‘विचारमंथन’

– पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना करमाफीसाठी प्रयत्न करण्याची तयारी
– महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आणि चार्टर्ड अकाँटंट्ससोबत ‘वेबिनार’

दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षीय भावाने केली करोनावर मात

आईचा अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आला होता

Paucity of labourers, raw material plague small scale units in PCMC areas

‘माझा समाज माझी जबाबदारी’ अंतर्गत 50 हजार गरजूंना भरवला मायेचा घास

एमपीसी न्यूज – ‘थेरगाव सोशल फाऊंडेशन’ने अनोखं समाज भान जपत लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना 55 दिवस अखंडीत मोफत जेवण पुरवले आहे. ‘माझा समाज माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत तब्बल 50 हजार गरजूंना मायेचा घास भरवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी 24 मार्च रोजी देशात व राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. अचानक लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे […]

कष्टकरी जनतेला जेवण मिळावे यासाठी प्रयत्न करू : आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड ही कामगार कष्टकऱ्यांची नगरी आहे covid-19 कोरोना मुळे सर्व व्यवसाय बंद आहेत त्यामुळे तळ हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी जनतेचे हाल होत आहेत.
गोरगरीब कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी सर्व कष्टकरी कामगारांना जेवण मिळावे यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या सुरू केलेले अन्नछत्रास पूर्ण मदत सहकार्य करण्यात येईल, असे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

राज्यातील कंपन्यांना 'पीएफ'मुळे 'असा'ही मिळणार दिलासा!

 पुणे : केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने देशभरातील कंपन्यांना दिलासा दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात कंपन्या बंद राहिल्यामुळे अनेक कंपन्यांना भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम मुदतीत भरणे शक्‍य झालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दंड न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी राज्यातील 43 हजार 191 तर पुणे शहरातील 18 हजार 810 कंपन्यांना याचा फायदा मिळणार आहे. 

तंत्रशिक्षण मंडळाकडून वेळपत्रक जाहीर; 'या' तारखेपासून होणार परीक्षा

पुणे : राज्यातील तंत्रनिकेतन, औषधनिर्माण पदविका अभ्यासक्रमासह पाच अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्राच्या व शेवटच्या वर्षीची परीक्षा ९ जुलैपासून परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. 

पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचा निर्णय झाला; जाणून घ्या परीक्षेचं स्वरूप!

पुणे Pune News : कोरोना मुळे कमी कालावधी परीक्षा पार पाडण्याचे आव्हान असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा  विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदाच्या परीक्षा ऑफलाईनच (पारंपारिक पद्धतीने लेखी परीक्षा) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले आठवडे परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.

महावितरणचा राज्यातील पहिलाच प्रयोग: 'वेबीनार'मार्फत वीजग्राहकांशी साधला संवाद

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महावितरणने पिंपरी विभागातील 180 हाऊसिंग सोसायट्यांचे फेडरेशनच्या 56 प्रतिनिधीशी 'वेबिनार'च्या माध्यमातून संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. महावितरण व वीजग्राहक यांच्यातील अशा संवादाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. 

अग्निशामक दलाचे जवान ठरले “देवदूत’; ड्रेनेजमध्ये अडकलेल्या गायीची सुखरूप सुटका

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या पिंपरीच्या खराळवाडी भागात शनिवारी (दि. 16) सकाळी एक गाय ड्रेनेजमध्ये अडकली होती. नागरिकांच्या मदतीने अग्निशामक दलाने गायीला सुखरूपरित्या बाहेर काढले. मात्र अग्निशामक दलाच्या “देवदूत’ नावाच्या वाहनातून आलेले जवान त्या गायीसाठी “देवदूत’ ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

कुटुंबनिहाय पाणी वापराचे ऑनलाइन सर्वेक्षण सुरु

पिंपरी  (प्रतिनिधी) – टाटा मोटर्स आणि इनव्हायर्नमेंटल कन्झर्व्हेशन असोसिएशन (ईसीए) यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे कुटुंबनिहाय पाणी वापर तपासण्यास सुरवात केली आहे. “सर्व्हे मंकी’ या संस्थेच्या मदतीने हे सर्वेक्षण केले जात आहे.

ट्रॅफिक वॉर्डनकडे मात्र दुर्लक्ष

पिंपरी (प्रतिनिधी) –वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शहरातील चौका चौकात ट्रॅफिक वॉर्डन राबत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षिततेकडे ट्रॅफिक वार्डन पुरवणारी कंपनी, महापालिका प्रशासन आणि पोलीस या तिघांनीही सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.

105 कामे पूर्ण करण्यास परवानगी

पिंपरी (प्रतिनिधी) – करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरतील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. इमारती, गटारे, रस्ते, नाले, पूल व प्रकल्प, उद्याने अशा स्थापत्य विभागातील आठ क्षेत्रीय कार्यालये, बीआरटीएस, स्थापत्य उद्यान, पर्यावरण, पाणीपुरवठा, जलनिसारण विभागातील अशी 105 कामे तातडीने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.