Tuesday, 2 January 2018

Bhima Koregaon violence: Prakash Ambedkar calls for Maharashtra bandh tomorrow

Bharipa Bahujan Mahasangh (BBM) leader Prakash Ambedkar has called for Maharashtra bandh tomorrow to protest the state government's "failure" to stop the violence at Bhima Koregaon v​illage in Pune district yesterday.

रस्ते खोदाईसाठी महावितरणशी करार करणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) वतीने केबल खोदाईसाठी प्रति मीटरला 2 हजार 350 रुपये सवलत दरामध्ये शुल्क पिंपरी-चिंचवड महापालिका आकारणार आहे. याबाबत नागपूर महापालिकेच्या धर्तीवर महापालिका महावितरण कंपनीसोबत कामासाठी सामंजस्य करार करणार आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रशासन कार्यवाही करीत आहे.

आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

अपंग, विधवा, घटस्फोटीत महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध योजनांची प्रकरणे एकाच ठिकाणी तात्काळ मार्गी लावण्यासाठी ५ जानेवारी रोजी पिंपरी येथे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

निविदा न काढता कोट्यवधीची खरेदी! शिक्षण मंडळात अपहार?

महापालिका शाळांची मागणी नसतानाही त्यांच्याकडून उशिरा मागणीपत्र घेण्यात आली. त्यानूसार शिक्षण मंडळाने सन 2016-17 आर्थिक वर्षांत विविध शैक्षणिक साहित्य खरेदी केली आहे. मात्र, निविदा न काढता कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. त्यामुळे खरेदीत ठराविक पुरवठादारांना ठेका देवून कोट्यवधीचा अपहार झाल्याची चर्चा मंडळात रंगली आहे.

आयटी कंपन्यांत दिवसभर चिंतेचे वातावरण

पुणेः शहराच्या काही भागांमध्ये घडलेल्या तुरळक अनुचित प्रकारांमुळे दिवसभर घबराट आणि अफवा पसरल्याचे चित्र होते. विशेषतः उपनगरांमधील नागरिक आणि आयटी कंपन्यांमध्ये दिवसभर चिंतेचे वातावरण होते.

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी सरकारने दिली खुशखबर

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट करणाऱ्यासाठी मोदी सरकारने नव्या वर्षात खूशखबर दिली आहे. डेबिट कार्ड, भीम अॅप किंवा इतर डिजिटल माध्यमातून पेमेंट केल्यास २००० रुपयपर्यंतच्या रकमेवर सरकार कोणतेही चार्जेस नाही घेणार आहे. ही सुविधा १ जानेवारीपासून लागू झाली आहे.

दुर्धर आजारांसाठी पालिकेचा 25 लाखांचा निधी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील हृदयरोग, कर्करोग, किडनी, मेंदूचे आजार, गंभीर अपघातग्रस्त आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

ई-कचरा संकलनात सहभागी संस्था, व्यक्तींचा सत्कार

पिंपरी – महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समिती (ईसीए)च्या वतीने शहरात ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. या अभियानात सहभागी संस्था व व्यक्तींचा सत्कार पुणे धर्मदाय आयुक्‍तालयाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्‍त कांचनगंगा सुपाते-जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या ६८ व्या जयंतीनिमित्त बुधवारी आनंदोत्सव

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पुणे, पिंपरी चिंचवड आणि आळंदी येथे भाजपची सत्ता यावी हे स्वप्न होते. या स्वप्नांची मागील वर्षात पुर्तता झाली आहे. त्यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती समिती पिंपरी चिंचवड शहर समिती यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

मिळकत कर थकबाकीदार पालिकेच्या रडारवर

महापालिकेचे मिळकत कर थकबाकीदार करसंकलन विभागाच्या रडारवर आहेत. सोळा थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ५४ लाखांची वसुली पालिकेने केली आहे. तसेच, यापुढे थकबाकीदारांवर मिळकत जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

चित्रकला स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनीच्या राधा, गायत्री दोघींचे यश

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या विद्यार्थीनी राधा येळगावकर व गायत्री मारणे या सरकारी चित्रकला ग्रेड परिक्षा २०१७ स्पर्धेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आल्या आहेत.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे द्या; आमदार लक्ष्मण जगताप यांची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्याच्यादृष्टीने सुरू करण्यात आलेल्या आठ क्षेत्रीय कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. त्याबाबत त्यांनी महापालिकेला निवेदन दिले असून, आयुक्त हर्डीकर यांनी प्रभाग कार्यालयांना गडकिल्ल्यांची नावे देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेची आठ प्रशासकीय कार्यालये लवकरच गडकिल्ल्यांच्या नावाने ओळखली जाणार आहेत.

पिंपरीच्या पोलीस आयुक्तालयाचे भिजत घोंगडे सत्ताधारी अनुकूल; अडले कुठे?

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे.

‘ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’वाल्यांना दंडाचा ‘डोस’

आकडा दुपटीने वाढला : थर्टी फर्स्टच्या रात्री 5 हजार जणांवर कारवाई 
नाकाबंदीची ठिकाणे वाढविल्याने दंडही वाढला
पुणे – शहरात नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात झाले. सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करता पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचा भंग झाला. अनेक कॅब कंपन्यांनी मद्यपींना घरी सोडण्यासाठी सेवा उपलब्ध केली होती. मात्र तरीही मागील वर्षाच्या तुलनेत मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.

“पवनाथडी’वरुन भाजप-राष्ट्रवादीत “तमाशा’

पिंपरी – पवनाथडी जत्रेच्या आयोजनावरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. पवनाथडीतील काही कार्यक्रम रद्द करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी विरोध केल्यानंतर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाघेरे यांचा हा विरोध म्हणजे बनाव असल्याचा आरोप केला. त्याला वाघेरे यांनी पुन्हा प्रत्युत्तर देत भाजपने भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवनाथडीवर संक्रांत आणल्याचा नवा आरोप केला आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे शहरवासीयांची चांगलीच करमणूक होत आहे.