The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to construct two parallel flyovers and two parallel grade separators at the busy KSB junction on Telco Road in Chinchwad to reduce traffic congestion.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 9 March 2014
मतदार नोंदणीसाठी रविवारी विशेष मोहीम
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील 423 मतदान केंद्रांच्या ठिकाणी रविवारी (दि. 9) मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.
सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात नागरिकांना 31 मार्च 2014 रोजी प्रसिध्द झालेली मतदान केंद्रनिहाय छायाचित्र मतदार यादी, छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी, 2012-2013 मधील विशेष मोहिमेत वगळण्यात आलेल्या स्थलांतरीत, दुबार व मृत मतदारांच्या नावाची यादी अवलोकनासाठी ठेवण्यात येणार आहे.
वीजबील भरणा केंद्र रविवारी सुरू
पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व विजबील भरणा केंद्र वीजग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी (दि. 09) सुरू राहणार आहेत.
या दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे. सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबिलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागातील महावितरणचे आणि इतर अधिकृत वीजबिल भरणा केंद्र त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
'सारथी' घेणार महिलांच्या समस्यांची दखल
जागतिक महिला दिनापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सारथी 8888006666 या हेल्पलाईनवर महिलांच्या समस्या बाबतची माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी आज (शनिवारी) दिली.
महापालिकेच्या 'सारथी'बाबत अधिका-यांची आढावा बैठक आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक आयुक्त डॉ. उदय टेकाळे, दिलीप गावडे, नीळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, थॉमस नरोना, माहिती तंत्रज्ञान क्षेञातील सुधीर बोराडे, अमित तलाठी, अमोल देशपांडे, रोहन निघोजकर आदी उपस्थित होते.
महिलांनी सुरक्षाविषयक तातडीच्या मदतीसाठी कुठे संपर्क साधावा. यासह विविध विषयांची माहिती सारथी या हेल्पलाईनवर देण्यात येणार असून, त्या प्रश्नांचा समावेश करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी आज दिली.
महिला दिन कुटुंबातही रोज साजरा ...
महिला दिन जवळ आला की त्या दिवसासाठी सगळीकडे विशेष पुरस्कार सोहळे, वेगवेगळे लेख, जागतिक महिला दिनाचं महत्त्व या सगळ्या गोष्टींचा महापूर येतो. एखादा दिन साजरा करायचा म्हणजे त्या दिवसापुरतंच त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं का, असा सूरही ऐकायला येतो. खरोखरीच महिलांना बरोबरीची वागणूक दिली जातीय का समाजात स्त्रीला समान दर्जा मिळणं हा मुद्दा बाजुला ठेवून निदान घरात तरी तिला बरोबरीची वागणूक मिळतीये का कुटुंब आणि नोकरी करताना होणारी तिची कसरत कमी झाली आहे का, याबाबत विविध क्षेत्रातील महिलांची जाणून घेतलेली मते.
ताथवडे येथे फौजदाराला धक्काबुक्की
पिंपरी : ताथवडे येथे फौजदाराला, तर चिखलीत कनिष्ठ अभियंत्याला धक्काबुक्की केल्याच्या घटना शहरात घडल्या.
याप्रकरणी हिंजवडी व निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी हिंजवडी व निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
चौकाचौकांत दिसले वाहतूक पोलिस
पुणे- शहर वाहतूक शाखेतील 11 पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळताच शनिवारी चौकाचौकांत वेगळे चित्र पाहायला मिळाले.
Subscribe to:
Posts (Atom)