Sunday, 19 November 2017

I-am-PCMC

Active citizens of Pimpri-Chinchwad are working towards making PCMC a brand पिंपरी-चिंचवडचे सक्रिय नागरिक पिंपरी चिंचवड शहर एक ग्लोबल ब्रँड बनवण्यासाठी काम करीत आहेत

जनता रक्षकांनीच साथ सोडल्यास...


RTO stops e-rickshaw promotions, tells manufacturers to take ad route

Pune: The regional transport office (RTO) has said it will no longer campaign to promote e-rickshaws, despite the sales being dismal. While manufacturers are shocked, RTO officials claim they have done their part.

Proposal seeking higher FSI along Pune Metro routes raises concerns

Following the Pune Municipal Corporation’s (PMC) proposal to increase the Floor Space Index (FSI) from two to four along the Metro routes, activist have raised concerns about the higher FSI development along the Metro and its impact on the environment, especially when the basic infrastructure is not in place in many years.

The Pune Municipal Corporation has put in a proposal seeking increase the Floor Space Index (FSI) from two to four along the Metro routes.

MANS meets top cop over event at PWD Ground where ‘unscientific & false claims on curing diseases were made’

A poster on the programme, among several put up across the city, purportedly stated ‘come and be delivered from sin, sickness, curses, and bindings of evil spirits’, and mentioned contact numbers of the ‘United Christian Fellowship, Pune’.

The tiny toilets miracle

Yasin Shaikh runs a small tailoring shop in Balajinagar, a slum area near the Maharashtra Industrial Development Complex in Pimpri-Chinchwad, Pune’s satellite city. Like many structures in the area, his residence is his workplace, and it has grown and morphed over time. His family used to live in a small room at the back; now it has shifted up to a new room on the first floor and rented it out.

रोड स्वीपर मशीन खरेदीत अनियमितता

पिंपरी – महापालिकेने जेएनएनयुआरएम निधीतून घनकचरा व्यवस्थापनांतर्गत रस्ते सफाईसाठी 4 मोठे आणि 4 छोटे अत्याधुनिक रोडस्विपर्स 7 कोटी 40 लाख 73 लाख 752 रुपयास खरेदी करण्यात आले. परंतु, रोडस्विपर्स मशीन कोणती घ्यायची, ती मशीन भारतातून घ्यावयाची की परदेशी बनावटीचे खरेदी करायचीही यांचा अभ्यास केला नसून दोन ठेकेदार राहिल्याने निविदेला मुदतवाढ न देता, एका ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून मशीन खरेदी करण्यात आली. त्यामुळे रोडस्विपर्स मशीन खरेदीत अनियमितता आढळून आली आहे.

पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डनच्या कामाची नागरिकांकडून पाहणी

पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर टाकणार्या पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डनचे काम प्रगतीपथावर आहे. या उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर पडावी म्हणून येथील स्थानिक रहिवाशांनी नवीन कल्पना सुचविल्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी नागरिकांसोबत या उद्यानाचा पाहणी दौरा करून सूचना ऐकून घेत त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

तापकीरनगर येथील प्राईड सोसायटीसमोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्याची शिव व्यापारी सेनेची मागणी

पंधरा दिवसात रस्त्याचे काम नकेल्यास शिव व्यापारी सेनेचे शहरप्रमुख युवराज दाखले शिवसेना स्टाईलने करणार आंदोलन  
तापकीरनगर येथील बेबी स्कूल रोड शेजारील प्राईड सोसायटीच्या समोरील बाजूस डांबरीकरण करण्याची मागणी शिव व्यापारीसेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. अशी माहिती शिवव्यपारी सेनेचे उपशहरप्रमुख गणेश पाडुळे यांनी दिली.

रोटरीतर्फे दहावीनंतर मुलांना एक वर्ष परदेशी राहण्याची सुवर्णसंधी; नावनोंदणी करण्याचे आवाहन

रोटरी क्लब ऑफ पिंपरी, प्राधिकरण, आकुर्डी आणि पिंपरी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीनंतर शहरातील मुलांना एक वर्ष शिक्षणासाठी मोफत परदेशी राहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन, रोटरी क्लबने केले आहे.

रोटरीतर्फे महापालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांना हातमोजे व मास्कचे वाटप

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना स्वच्छतेसाठी हातमोजे आणि मास्कचे वाटप करण्यात आले. दोनशे कर्मचा-यांना मास्क आणि हातमोजे देण्यात आले.

माजी लोकप्रतिनिधी, सदस्यांचे नामफलक हटवा; अमोल थोरात यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध समित्या आणि मंडळाच्या माजी सदस्यांसह माजी लोकप्रतिनिधींचे निवासस्थान, संपर्क कार्यालय यांची माहिती देणारे फलक आणि त्यांचे नामफलकही शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. या माजी सदस्य आणि माजी लोकप्रतिनिधींकडून कार्यकाळ संपल्यानंतरही केवळ सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी असे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहेत. असे नामफलक हटविण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

दापोडीत ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त; नगरसेवक रोहित काटे यांचा उपोषणाचा इशारा

दापोडी येथील बुध्द विहाराजवळ असलेल्या धोंडीबा काटेनगर भागात ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रत्येक घरासमोर पाणीच पाणी झाल्याचे दिसत आहे. या परिसरातील जयभीमनगर येथेही असाच प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

मुरुम घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा!

पिंपरी – मोशी कचरा डेपोतील कचऱ्यावर सॉईल काव्हिरिंग करण्यासाठी सॉफ्ट मुरुमाची आवश्‍यकता होती. त्या मुरुमाच्या अनावश्‍यकपणे खेपा वाढवून सुमारे 16 लाखाची अपहार केला आहे. त्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मारुती भापकर यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

म्हाडा प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला नको

पिंपरी – मोरवाडी येथील म्हाडा प्रकल्पातील खुल्या जागा विकसित होत नाहीत आणि प्रकल्पाचे कायदेशीररित्या पालिकेकडे हस्तांतरण होत नाही, तोपर्यंत म्हाडा प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला देण्यात येवू नये, अशी मागणी नगरसेवक बाबू नायर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अपंग स्टॉल धारकांवरील कारवाईस स्थगिती

चौफेर न्यूज  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अपंगांच्या स्टॉल धारकांवर अतिक्रमणाच्या नावाखाली नोटीस न देता कारवाई करण्यात येत आहे, याबाबत संपूर्ण अहवाल तात्काळ अपंग कल्याण आयुक्‍तालयाकडे सादर करावा आणि पुढील आदेश देईपर्यंत अपंग स्टॉलवरील कारवाई स्थगीत ठेवण्याचे आदेश अपंग कल्याण आयुक्‍तांनी प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.