Thursday, 5 October 2017

[Video] Pune's Roseland society wins Swachh Bharat award in RWA category

Roseland Residency Waste Management story covered by India TV : Jan Andolan for Swachhata

[Video] वाहतूक पोलिसांबरोबर हिंसक वर्तन केल्यास आजीवन परिणाम भोगण्यास तयार रहा!

Getting violent with traffic staff has consequences you wouldn't like to live with. #RespectTrafficRules #RespectTrafficStaff

10 documents and accounts to link with Aadhaar

An expanding list
From getting a mobile connection to conducting financial transactions, you just cannot escape Aadhaar. Here is a list of accounts and documents which have to be linked with Aadhaar mandatorily, and those where linking or quoting is not a must but doing so can make your life easier:

10 दस्तऐवज/खाती जी आधार कार्डशी जोडणे अनिवार्य आहे

DMRC suggests monorail or tram service on HCMTR

Pimpri Chinchwad: The Delhi Metro Railway Corporation has suggested the Pimpri Chinchwad Municipal Corporation to construct a monorail, tram or a Bus Rapid Transit System corridor on the 30-metre High Capacity Mass Transit Route from Kokane Chowk ...

PCMC officials told to do better job or step down

The BJP has warned the PCMC officials to either improve their performance by resolving civic issues within a fortnight, or make way for others who can do a better job. This was revealed to the media by Pimpri Chinchwad mayor Nitin Kalje and Eknath ...

बेरोजगार संस्थांना न्यायालयाचा दणका

– निविदा प्रक्रियेतून प्रतिबंधित करण्याचे आदेश
पिंपरी –  दैनंदिन साफसफाईचे ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचा पीएफ लाटणाऱ्या आणि किमान वेतन न देणाऱ्या बेरोजगार व स्वयंरोजगार संस्थांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बेरोजगार व स्वयंरोजगार संस्थांना निविदेत भाग घेण्यापासून महापालिकेने प्रतिबंधित करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

महापौर निवासाचा प्रश्‍न मार्गी लावणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्राधिकरणाच्या जागेवर शहरात आजी-माजी महापौरांना एकत्रित राहण्याच्या दृष्टीने आरक्षित ठेवलेल्या अडीच एकर जागेवर नियोजित महापौर निवासाचा प्रश्‍न गेली पंचवीस वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या जागेवर महापौर निवास बांधण्यासाठी लवकर प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करुन माझ्या कार्यकाळात भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.

कचरा कोंडी काही सुटेना

पिंपरी-चिंचवड शहरात कचऱ्याचा प्रश्न दिवेंसदिवस गंभीर होत चालला आहे. कचऱ्याच्या प्रश्नाबाबत सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत नऊ ते दहा बैठका घेतल्या आहेत. तरीही, कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. बुधवारी पुन्हा स्थायी समितीमध्ये शहरातील ...

चार अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पिंपरी – महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने रावेत, मामुर्डी व किवळे परिसरातील चार अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.
महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग 16 मधील मामुर्डी आणि किवळे भागातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या बाधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केलेल्या या कारवाईत वीटेची दोन आणि पत्राशेड दोन अशा चार बांधकामांवर कारवाई केली आहे. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. पाच महापालिका पोलीस कर्मचारी, 1 ट्रॅक्‍टर, 1 जेसीबी, 8 मजूर, 10 मनपा कर्मचारी तसेच देहुरोड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात होता.

दैनंदिन प्रवासाचा पास वाहकांकडेच मिळणार

पुणे - पीएमपीच्या दैनंदिन प्रवासाचा ७० रुपयांचा पास गुरुवारपासून (ता. ५) फक्त बसमध्येच वाहकाकडे (कंडक्‍टर) मिळणार आहे. त्यामुळे स्थानकावरील पास केंद्रात दैनिक पास मिळणार नसल्याचे पीएमपीने बुधवारी जाहीर केले. 
प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने प्रवाशांसाठी ७० रुपयांचा दैनिक पास सुरू केला आहे. हा पास सध्या बस स्थानकांवर पास केंद्रातही मिळतो. मात्र हा पास आता पीएमपी बसमध्ये वाहकाकडे मिळणार आहे. गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील कोणत्याही मार्गावरील बसमध्ये हा प्रवासी पास उपलब्ध होणार आहे. त्याची प्रवाशांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन प्रवासाचा ४० रुपयांचा पास बस स्थानकावर पास केंद्र आणि बसमध्ये वाहकाकडेही मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Many private hospitals resume cashless mediclaim facility

PUNE: Many big private hospitals in the city have resumed offering cashless mediclaim of public sector insurance firms after "one-on-one negotiations".
The move comes as a huge relief to a host of insured patients who are currently forced to raise money to pay their hospital bills and get the amount reimbursed from their insurance companies later.

स्वतःच्या घराचे स्वप्न साकारण्याची सुवर्णसंधी

चिंचवडमध्ये सात व आठ ऑक्‍टोबर रोजी ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शन २०१७ 
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शन २०१७ येत्या सात व आठ ऑक्‍टोबर रोजी संपन्न होत आहे. दिवसेंदिवस विस्तारत चाललेल्या या औद्योगिकनगरीमध्ये स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते.

चिंचवड येथील विमाधारकांच्या मेळाव्यास उदंड प्रतिसाद

पिंपरी (प्रतिनिधी):- वरिष्ठ विमा सल्लागार तात्यासाहेब शेवाळे यांच्या पुढाकाराने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या विमाधारकांच्या मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी माजी महापौर योगेश बहल, एलआयसीचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक प्रशांत नायक, बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे, राष्ट्रीयस्तरीय व्यावसायिक प्रशिक्षक संतोष नायर, राजेंद्र जैन, सतीश अगरवाल, दिनेश गुंठे, दामोदर मोरे, वास्तुविशारद राजेंद्र कोरे, उद्योजक ओमप्रकाश पेठे, सुभाष जयसिंघानिया,अशोक बिराजदार अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शाळा एकत्रीकरणाचा विद्यार्थ्यांना फटका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 43 शाळा एकत्रीत केल्यामुळे दोन सत्रात चालणाऱ्या शाळा आता एका सत्रात सुरू झाल्या आहेत. त्याचा फटका शाळेतील विद्यार्थिनींना बसत आहे.
महापालिकेच्या 128 प्राथमिक शाळांपैकी 43 शाळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शिक्षण मंडळ प्रशासनाने घेतला. त्यानुसार काही शाळांचे एकत्रीकरणही झाले. त्यातील काही शाळांची पटसंख्या 500 पेक्षाही अधिक आहे. तरीही, अशा असंख्य शाळांचे एकत्रीकरण केल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वी दोन सत्रात चालणाऱ्या शाळा एकत्रीकरणामुळे आता एकाच सत्रात चालत आहेत. त्यामुळे दुपारी भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही वेळ अडचणीची ठरत असल्याची बाब मंडळातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. घरातील काम, लहा भावंडाचा सांभाळ, बाहेरील घरगुती कामे करण्यासाठी अडचणी येत असल्याच्या तक्रारी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.