Saturday, 10 February 2018

खासदार शिवाजीराव आढळरावांची अपरिहार्यता!

पिंपरी : शिरुरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारात बारीक लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. रेड झोन, पुणे-नाशिक महामार्ग, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासह पालिकेच्या विकासकामांबाबत त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे त्याला दुजोरा देत आहेत. मात्र,ही त्यांची राजकीय अपरिहार्यता असल्याचे मानले जात आहे.

मुंडे, परदेशी राजकारण्यांना का नको ?

धडाकेबाज आणि प्रामाणिक अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुण्यातील टर्मही पुर्ण होणार नाही, असा सुरवातीपासूनच अंदाज होता. तो त्यांच्या अवघ्या दहा महिन्यांत झालेल्या बदलीने खरा ठरला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांची संयुक्त परिवहन उपक्रम  असलेल्या पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते गेल्यावर्षी मार्चमध्ये रुजू झाले. यावर्षी सुरुवातीसच त्यांची बदली झाली.

Work starts on pillars for 2 Metro stations

Pimpri Chinchwad: The Maharashtra Metro Rail Corporation Limited (MahaMetro) has started the geotechnical survey to erect pillars at two Metro station.

The pillars will come up at the entry and exit points of the two stations, at Kasarwadi and Phugewadi, which fall on the Pimpri-Swargate route, said Sunil Mhaske, chief project manager of Reach-1, MahaMetro.

PCMC-run hospitals get extra 0.5 FSI

Pimpri Chinchwad: The state government has sanctioned an additional 0.5 FSI to hospitals run by Pimpri Chinchwad Municipal Corporation. The current FSI for the hospitals is one.

PM 2.5 level in Pune touched new high last year, up 70% since 2013

PUNE: A study of the annual pollution data for the city shows an alarming 70% rise in the concentration of PM2.5 (particulate matter less than 2.5 micrometers) in 2017 from the level five years ago.

महापालिका अर्थसंकल्पाचे १५ फेब्रुवारीला सादरीकरण

आगाणी २०१८-१९ या आर्थिक वर्षांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी अकरा वाजता महापालिका आयुक्त   स्थायी समितीला सादर करणार आहेत. अर्थसंकल्प तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

इराणी टोळीतील सोनसाखळी चोर वाकड पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी-चिंचवड शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या इराणी टोळीतील तिघांच्या वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाख ५३ हजार किंमतीचा ४५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यावेळी त्या तिघांनी सोनसाखळी चोरीच्या १० गुन्ह्याची कबुली दिली.

रावेत चौक ठरतोय अपघात स्थळ

वाल्हेकरवाडी - रावेतमधील तुकाराम पुलाजवळील चौकात बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांचे अतिक्रमण, पोलिसाचा अभाव या कारणांनी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. परिणामी, दररोज छोटे-मोठे तीन ते चार अपघात होत आहेत. या सर्व समस्यांनी रावेत चौक अपघाती ठरू लागला आहे. 

आरटीओ अधिकाऱ्यांची परिवहनमंत्र्यांकडून कानउघाडणी

चिखली - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षकांच्या खासगी दलालराज बाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी परिवहन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.  

निगडीत रविवारी होणा-या ‘रनेथॉन ऑफ होप’ 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आठ हजार जण होणार सहभागी

रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यातर्फे येत्या रविवारी (दि.11) आयोजित केलेल्या आठव्या ‘रनेथॉन ऑफ होप 2018 या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आठ हजार जण सहभागी होणार आहेत. रविवारी सकाळी पावणेसहा वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

राज्यातील दस्तनोंदणी, आधार केंद्र ठप्प

‘डेटा सेंटर’मध्ये बिघाड; नागरिकांची तारांबळ

सोसायट्यांची निवडणूक नियमांच्या कचाट्यात

पिंपरी - सहकारी गृहरचना (हाउसिंग सोसायट्या) संस्था निवडणूक प्रक्रियेसाठी पुढे येत नसल्याची खंत सहकार खात्याकडून व्यक्त केली जात आहे. किचकट-वेळखाऊ प्रक्रिया, जाचक अटी आणि उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘असहकार’ या सोसायट्यांना निवडणुकीपासून परावृत्त करीत असल्याचा दावा काही सोसायट्यांनी केला आहे. परिणामी, निवडणुकीच्या या नियमांमधून सहकारी गृहरचना वगळण्याबाबतचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, राज्य सहकारी गृहनिर्माण संघाने निवडणूक प्रक्रियेत बदल सुचविणारी शिफारसही सहकार खात्याकडे केली आहे.

जीएसटीमुळे देशाची प्रतिमा उंचावणार असल्याचे तज्ञांचे मत!

केंद्र सरकारने सेवा व वस्तू कर (जीएसटी) लागु करून एक धाडसी निर्णय घेतला आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत १८ लाख करोड जमा झालेत. करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जीएसटीच्या कर माध्यमातून जगात आपल्या देशाची प्रतिमा उंचावणार आहे. असा सुर तज्ञ मान्यावरांनी काढला.

चिंचवडमध्ये आजपासून गृहप्रकल्पांचे भव्य प्रदर्शन

पिंपरी - रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आजपासून चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये सुरू होत आहे. आयकर आयुक्त संदीप गर्ग यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता उद्‌घाटन होणार आहे.