Monday, 31 December 2018

Pimpri : बांधकाम कामगारांना आरोग्य योजनेचा लाभ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतेच बांधकाम कामगारांच्या आरोग्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केल्यामुळे राज्यासह इतर राज्यातील कामगारांनाही दीड लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत याची सुरुवात नुकतीच वाकड येथील अक्रोपॉलिस या साईटवर आरोग्य शिबिराचे आयोजन करून करण्यात आले.

पिंपरी पालिकेत मावळत्या वर्षांत

पिंपरी पालिकेत सत्तांतर झाले आणि भाजपकडे कारभार आला. मात्र, मावळत्या वर्षांत भाजपची कामगिरी समाधानकारक नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. पक्षांतर्गत नाराजीचा प्रत्यय अनेक घटनांनी आला.

Pimpri : किल्ले निमगिरी येथे दुर्गसंवर्धन व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

एमपीसी न्यूज –  दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवेच्या स्मृतींना अभिवादन करत भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली. संस्थेच्या शिलेदारांनी रमेश स्मृती सामाजिक पुनुरूत्थान उपक्रमांतर्गत जुन्नर तालुक्‍यातील किल्ले निमगिरी येथे श्रमदान, जनजागृती, वृक्षारोपण, ग्रंथिंदडी, अभ्यासपूर्ण दुर्गभ्रमंती असे उपक्रम राबविले. पहिल्याच दिवशी श्रमदान करण्यात आले. 

“पवनाथडी’तील “स्टॉल्स’साठी सोडत

पिंपरी – महापालिकेच्या वतीने 4 ते 8 जानेवारी या कालावधीत सांगवीमध्ये पवनाथडी जत्रा भरविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र ठरलेल्या 813 महिला बचत गटांना स्टॉल वाटप करण्यासाठी आज (शनिवारी) सोडत काढण्यात आली.

PCMC strips down scrap centres violating norms

Residents had complained to the local body and state polluti


Pimpri : गुरुवारी विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन

एमपीसी  न्यूज – समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) आयोजित दहावे एक दिवसीय विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन  गुरुवारी  (दि. 03 जानेवारी 2019) आकुर्डी येथील  श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट सांस्कृतिक भवनात होणार आहे. 

मोशीत महिलेचा विनयभंग

पिंपरी – महिलेसमोर अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना लक्ष्मीनगर मोशी येथे घडली.
याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दादासाहेब गुलाबराव बाबळ (वय-39, रा. मोशी, मूळ रा. हिंगणी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सरकारचा नवा कायदा , भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना पकडल्यावर किंवा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यावर जामीन मिळाल्याने पुन्हा कामावर रुजू होणाऱ्या सहकार विभागातील अधिकाऱ्यांना राज्य सरकारने चाप बसविला आहे. आता अशा अधिकाऱ्यांना मूळ पदाऐवजी दुसऱ्या विभागात रुजू होऊन कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे. या निर्णयामुळे निलंबनाच्या काळातही कामावर हजर झालेले अधिकारी 'पूर्ण पगारी अन् बिन अधिकारी' ठरणार असून, त्यांनी यापूर्वी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या कार्यालयाची विभागीय चौकशी होणार आहे.

केंद्राच्या मान्यतेनंतर निगडीपर्यंतचे काम सुरू

पिंपरी ते निगडीपर्यंच्या 4.4 किलोमीटर अंतराचा ‘डीपीआर’ अल्पवेळेत महामेट्रोने पूर्ण केला आहे. राज्य शासनानंतर केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ महामेट्रोच्या वतीने त्या वाढीव मेट्रो मार्गिकेचे काम सुरू केले जाईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी रविवारी (दि. 30) सांगितले. 

पिंपरी, आकुर्डीतील घरांच्या मंजुरीचा विषय ‘स्थायी’पुढे

पिंपरी - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वांत कमी दराच्या ठेकेदारास काम देण्याबाबत करारनामा करण्यास मान्यता देण्याचा विषय मंगळवारी (ता. १) होणाऱ्या महापालिका स्थायी समोर ठेवला आहे. 

पिंपळे सौदागरला साकारणार ग्रामसंस्कृती

पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर गावठाणाचे रूप लवकरच पालटणार आहे. येथील प्राचीन मंदिरे व पवना नदी किनाऱ्यासह लगतच्या ३.२ एकर जागेवर ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम घडवून आणणारे सांस्कृतिक केंद्र स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे. 

प्राधिकरणातील उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

पिंपरी - प्राधिकरणाने आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रात, तसेच पेठ क्रमांक २६ येथे विकसित केलेली उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. 
आकुर्डीतील सुमारे पावणेदोन एकरावरील उद्यानात विविध प्रकारची खेळणी बसविण्यात आली आहेत. रोप क्राऊलर, बॅलसिंग ब्रिज, रोप वॉक, जंपर्स अशा प्रकारच्या खेळण्यांचा त्यात समावेश आहे. ‘ॲडव्हेंचर पार्क’च्या धर्तीवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार जंपर्समध्ये मुलांना उंच उड्या मारता येतील. रोप वॉकमध्ये लोखंडी अँगलला दोरखंड अडकवून जमिनीपासून अँगलपर्यंत चढता येईल. तसेच हर्डल वॉकचीही (टप्प्याटप्प्याने उंच होत जाणारे आडवे लोखंडी अँगल) सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त क्‍लाइंबिंग वॉल, ४०० मीटरचा जॉगिंग ट्रॅकही आहे. उद्यानात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला, पुरुष यांच्यासाठी आधुनिक प्रकारची प्रत्येकी दोन शौचालये बांधण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ‘गजिबो’ची सोय आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी चार लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

Pimpri: कंपनी करणार संतपीठाचा मसुदा तयार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखलीतील बहुचर्चित संत तुकाराम महाराज संतपीठाबाबत स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र कंपनीकडून संतपीठाचा मसुदा तयार केला जाणार आहे. त्यामुळे या समितीमधील सदस्यांची संख्या, महापालिका पदाधिकारी, अथवा बिगर राजकीय सदस्यांना स्थान मिळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीमध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला

Pimpri: महापालिकेत समाजसेवकांची पदे रिक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागात समाजसेवक कार्यरत असलेल्या महिला कर्मचा-याला जातवैधता प्रमाणपत्र सादर करता न आल्याने त्यांना महापालिका सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरवस्ती विकास योजना विभागातील समाज सेवकांची सर्वच पदे आता रिक्‍त झाली असून या विभागाचा कारभार कसा चालणार ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पिंपरी: कुदळवाडीतील आग सहा तासानंतर आटोक्यात

पिंपरी (पुणे) : भंगाराच्या गोदामाला लागलेली आग सहा तासानंतर आटोक्यात आली. ही घटना चिखली, कुदळवाडी येथील वडाचा मळा येथे घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी येथील वडाचा मळा परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार पिंपरी अग्निशामक मुख्यालय आणि चिखली उपकेंद्र येथून प्रत्येकी एक असे दोन बंब घटनास्थळी रवाना झाले. मात्र आगीचे स्वरूप पाहता भोसरी, पिंपरी, प्राधिकरण आणि तळवडे येथील उपकेंद्राचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे चाकण एमआयडीसी, पुणे महापालिका तसेच खासगी कंपन्यांचे अग्निशामक बंबही मदतीसाठी बोलविण्यात आले. याशिवाय पाण्याची वाहतूक करण्यासाठी खासगी टँकरचीही मदत घेण्यात आली. तब्बल सहा तासानंतर ही आग आटोक्यात आली.

विद्युत खांबांवरील फलक काढण्यासाठी 95 लाख

पिंपरी – महापालिकेच्या विद्युत खांबांवर लावलेले दोन बाय तीन फूट या आकाराचे अवैध जाहिरात फलक काढण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना एक फलक काढण्यासाठी 24 रुपये मिळणार आहेत. या कामासाठी एकूण खर्च 95 लाख रुपये होणार आहे.

आकुर्डी, पिंपरीतील घरांचा मार्ग मोकळा

पिंपरी – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आकुर्डी, पिंपरी येथे आर्थिकदृष्ट्य्‌ा दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या घरांसाठी निविदा प्रक्रियेतील स्पेसिफिकेशनमध्ये फेरबदल करून निविदा मागविल्यानंतर या दोन्ही प्रकल्पांसाठी 84 कोटी 32 लाख रुपये लघुत्तम दर सादर केलेल्या एकाच ठेकेदाराला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अपघातात पोलिस कमर्चारी जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  – आळंदी जवळील देहू फाटा येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसाला वेगाने येणाऱ्या मोटारीने धडक दिल्याने ते जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली.

Bhosari : भोसरीत आदर्श शिक्षण संस्थेत विज्ञान प्रदर्शऩ

एमपीसी न्यूज – भोसरी येथील आदर्श शिक्षण संस्थेत कला, कार्यानुभव, विज्ञान प्रदर्शन आणि विद्यार्थी हस्तलिखित प्रकाशन सोहळा उत्साहात झाला.

पिंपरी-चिंचवड : सराईत गुन्हेगाराचा घरात घुसून कोयत्याने ४० ते ४५ वार करून खून

पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे पूर्ववैनस्यातून १९ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा तब्बल ४० ते ४५ वार करून निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. अॅल्विन रवी राजगोपाळ (रा.जयभीम नगर, दापोडी) असं मयत गुन्हेगाराचे नाव आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक घरात घुसून अॅल्विनवर हल्ला करण्यात आला. यात तो जखमी झाला आणि कसाबसा त्याने घरातून चिंचोळ्या गल्लीतून पळ काढला. मात्र, हल्लेखोरांनी त्याला गल्लीत गाठत त्याच्यावर कोयत्याने ४० ते ४५ वार करून ठार केले. याप्रकरणी चार आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एकाचा शोध सुरू आहे.