'चारमितीय यंत्रणा' व 'सारथी २.०' याद्वारे सारथीमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माननीय आयुक्तांनी मी दिलेल्या सदर सूचना तत्वतः मान्य केल्या आहेत. लवकरच यावर कालबद्ध कृतिआराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर नक्कीच सारथी यंत्रणेचे पुनरुज्जीविकरण करतील असा विश्वास वाटतो.
