Wednesday, 6 March 2019

Pimpri : पिंपरी-चिंचवड कन्नड महासंघाच्या वतीने भोसरीत गुरुवारी कन्नड स्नेह समारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड कन्नड महासंघाच्या वतीने पाचवा कन्नड स्नेह समारंभ आणि हास्य कलाकार गंगावती प्राणेश यांचा हास्य विनोदाचा कार्यक्रम होणार आहे. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरुवारी (दि. 7) मार्चला सायंकाळी चार वाजता आयोजित केला आहे. 

पिंपळे निलख येथे आमदार जगताप यांच्या हस्ते मैलाशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन

पिंपरी (दि. ५ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख येथे मंगळवार (दि. ५) रोजी केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गंत उभारण्यात येणा-या १५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मैलाशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.

भाजपने पिंपरी चिंचवड बेस्ट सिटीला कचरा सिटी बनविले – अजित पवार

भोसरी (दि. ५ मार्च) :-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरीमधील गावजत्रा मैदानावर आज मंगळवार (दि. ५) रोजी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यात 10 वर्षांनंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे खंडपीठ

पुणे – राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाखल झालेल्या पुणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण आयोगाच्या खंडपीठाद्वारे पुण्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल दहा वर्षांनी खंडपीठ पुण्यात येणार आहे.
आझम कॅम्पसमधील न्यू लॉ ऍकॅडमीच्या तिसऱ्या मजल्यावर 11 ते 15 मार्चदरम्यान कामकाज चालणार आहे. 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा दावा असल्यास, राज्य ग्राहक आयोगाने दिलेल्या निकालाविरुद्ध अपील करायचे असेल किंवा दावा इतरत्र बदली करायचा असेल, तर थेट दिल्ली येथील राष्ट्रीय आयोगाकडे दाद मागावी लागते. 

'शे काट्या' पक्षांचा मुक्काम चिंचवड परिसरात वाढला

लक्ष्मीनागर, चिंचवड - थंडीचा कालावधी वाढल्याने पवनेच्या पात्रालगत 'शे काट्या' पक्षांचा मुक्काम वाढला असुन त्यांचे थवे नागरीकांचे लक्ष वेधुन घेत आहेत. 

शहरातील पदपथ कोणासाठी?

पिंपरी-चिंचवड शहर तुफान वेगाने वाढते आहे. एका सर्वेक्षणानुसार हा वेग सुमारे ७० टक्के आहे. दहा वर्षांपूर्वी १७ लाख लोकसंख्या होती ती आज २७ लाखांच्या दरम्यान आहे. नागरिकांचे सुदैव म्हणजे एक बेशिस्त वगळता या नगरीला अगदी कशाकशाचीही कमी नाही. मुबलक पाणी, प्रशस्त रस्ते, पूल, उड्डाण पूल, शाळा, दवाखाने, उद्याने, मंडई, मैदाने, जलतरण तलाव अशा सर्व सुखसुविधा आहेत. 

भोसरीत विलास लांडेचा उत्साही कार्यकर्त्याकडून जयघोष, आवाज आला, तर तिकीटच कापतो; अजितदादांनी कार्यकर्त्यांना भरला दम

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विलास लांडे पाहिजेत, ‘आमचा उमेदवार विलास लांडेच’ अशा घोषणा देणा-या कार्यकर्त्यांना आज बेंबिच्या देठापासून ओरडतात. 2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी कुठे गेलतात? असा सवाल विचारत आता घोषणा दिल्यास तिकीटच कापतो, मला अजित पवार म्हणतात, असा सज्जड दम अजितदादांनी विलास लांडे यांच्या समर्थनार्थ घोषणा देणा-या कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

दिघीत 10 बांधकामांवर कारवाई

निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने निदघी येथील ज्ञानेश्‍वर पार्क, श्रीराम कॉलनी, विनायक पार्क, काटे वस्ती येथील 10 अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (दि.5) कारवाई करण्यात आली. खेळाच्या मैदानास बाधित व निवासी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत, एकूण 8 हजार 260 चौरस फुट क्षेत्राचे बांधकाम पाडण्यात आले.
कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता के. ए. सगर, अतिक्रमण पथक,पोलिस उपनिरीक्षक, पोलिस, मजुर, जेसीबी, डंपर, निडल यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

अजितदादांनी घेतली आझम पानसरेंची भेट, घरवापसीच्या चर्चेला ‘उधाण’

पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवारी) सकाळी अचानक भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आझम पानसरेंच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत असले तरी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे निवडक पदाधिकारी यावेळी उपस्थित असल्याने पानसरेंच्या घर वापसीच्या चर्चेने जोर धरला आहे.

शहरबात पिंपरी : खांदेपालट झाले, कामगिरी सुमारच

पिंपरी महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात बऱ्यापैकी मरगळ आलेली आहे. आयुक्त तसेच सत्ताधाऱ्यांचे कसलेही नियंत्रण नसल्याने महापालिकेत मनमानी कारभार सुरू आहे. त्यात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्षांची भर पडली आहे. अशातच निवडणुकांच्या तोंडावर बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे. खांदेपालट झाली तरी प्रशासकीयदृष्टय़ा कामगिरी सुधारण्याची शक्यता कमीच आहे.

पिंपरी आरटीओमधील कर्मचारी ‘स्मार्ट’

पिंपरी : जुन्या इमारतीमधून मोशी येथील नवीन प्रशस्त तीन मजली इमारतीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) रुपही पालटले आहे. आरटीओच्या सुसज्ज इमारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही रुप बदलण्याचा निर्णय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी घेतला असून त्यानुसार आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी आता आकाशी रंगाच्या सुटबुटात काम करताना पहायला मिळत आहेत.

महापालिकेतील महासंघाच्या पदाधिका-यांना थम्ब इम्प्रेशनमध्ये सवलत !

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कामगार संघटनेच्या एकूण 65 पदाधिका-यांना दैनंदिन हजेरीसाठी आवश्‍यक असलेल्या ‘थम्ब इम्प्रेशन’मधून सवलत देण्यात आली आहे. तथापि, त्यांना दैनंदिन हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

गृहप्रकल्पाशेजारी भंगाराचा ढीग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मोशी- मोशी येथील इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या रिव्हर रेसिडेन्सी गृहप्रकल्पाच्या शेजारी भंगार व्यावसायिक आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य टाकत आहेत. हा संपूर्ण कचरा रिव्हर रेसिडेन्सीच्या तळ्यामध्ये टाकण्याचा मानस असल्याने याचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याचा तसेच यामळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिक विजय सूर्यवंशी म्हणाले, रिव्हर रेसिडेन्सीच्या बाजूला सोसायटीचा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आहे. यासाठी सोसायटीकडून एका नैसर्गिक तळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.

गरिबांचे उपचार नाकारणार्‍या संचेती रुग्णालयावर कारवाई करा ः लक्ष्मण जगताप

पिंपरी ः पुणे, शिवाजीनगर येथील संचेती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे शासनाच्या जागेत उभे असल्याने धर्मादाय रुग्णालय आहे. हाडांच्या आजारांवर सर्व प्रकारचे उपचारांसाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. रुग्णालयात आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार करणे कायद्याने बंधनकारक असताना अशा रुग्णांना नाकारले जाते. ही सरकारची फसवणुक असून रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात धर्मादाय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन शुल्कामुळे नागरिकांची लुट

पिंपरी चिंचवड ः महापालिकेने शहरातील पाच हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाच्या पुढील सर्व सोसायटीमधील फ्लॅट धारकांना घनकचरा व्यवस्थापन शुल्काच्या नावाखाली प्रति फ्लॅट प्रति महिना सरासरी शंभर रुपये आकारण्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. शहरातील सोसायट्यांना लागू करण्यात येणार्‍या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापनाच्या शुल्काला विरोध असून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत घनकचरा व्यवस्थापन शुल्क हा प्रस्ताव स्थगित करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

कामगारांची फरकाची रक्कम अदा करा

पिंपरी चिंचवड ः मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने 469 कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांची फरकाची 16 कोटी 9 लाख 79 हजार रुपये रक्कम कंत्राटदारामार्फत 14 वर्षाच्या 9 टक्के सरळव्याजाने महिन्याभरात देण्यात यावी, असा महत्वपुर्ण आदेश कामगार आयुक्तालयातील अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी 28 फेब्रुवारी 2019 रोजी दिला आहे. त्यामुळे महापालिकेला 31 मार्च 2019 पुर्वी फरकाची रक्कम आणि व्याज असे सुमारे 37 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिली. तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांच्या फरकाच्या रक्कमेची पहिल्यांदाच वसूली होत आहे. त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक असून देशभरातील करोडे कंत्राटी कामगांराना याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले. कासारवाडी येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भोसले बोलत होते.

रेडी रेकनरच्या दरात वाढीचा प्रस्ताव

पुणे - मागील वर्षी रेडी रेकनरमधील दर "जैसे थे' ठेवत दिलासा देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागाने यंदा देखील आश्‍चर्यांचा धक्का दिला. पुढील आर्थिक वर्षासाठी (2019-20) पुणे जिल्ह्याच्या रेडी रेकनरच्या दरात सरासरी 1.74 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे; तर पुणे महापालिका हद्दीत 0. 64 टक्के, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 1. 85 टक्के, ग्रामीण भागात 3.20 टक्के, शहरालगतच्या गावांमध्ये (प्रभाव क्षेत्र) 1.08 टक्के आणि नगरपालिका हद्दीमध्ये 1.91 टक्के वाढ प्रस्तावित आहे. त्यामुळे मोकळ्या जागांच्या किमतीबरोबरच घरांच्या किमतीमध्ये अल्पशी वाढ होणार आहे. 

अकरावीच्या इनहाउस कोट्याला कात्री

पुणे - अकरावी प्रवेशासाठी संस्थांच्या हक्काचा संस्थाअंतर्गत (इनहाउस) कोटा वीस टक्‍क्‍यांवरून थेट दहा टक्‍क्‍यांवर येणार आहे. या मार्गाने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास टक्‍क्‍यांनी घटणार असल्याने संस्थाचालकांनी त्यास विरोध केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या या कोट्यासाठी 14 हजार 112 जागा आहेत. इनहाउस कोटा कमी झाल्यास या कोट्यातील जागा सात हजारांनी कमी होतील. 

एफएसआय वाढणार ; पायभूत सुविधांचे काय ?

पुणे -  मेट्रो मार्ग, एचसीएमटीआर रस्ता यांच्या दुतर्फा (टीओडी झोन) चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यामुळे त्या भागातील घरांची संख्या अन्‌ लोकसंख्याही वेगाने वाढणार आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आराखडाच महापालिकेने अद्याप तयार केलेला नाही. त्यामुळे "एफएसआय' वाढल्यानंतर उंच इमारतींत राहणाऱ्या नागरिकांना पाणी, कचरा-सांडपाणी प्रक्रिया आदी पायाभूत सुविधांचा प्रश्‍न भेडसवण्याची शक्‍यता "स्मार्ट सिटी'मध्ये निर्माण झाली आहे.