– नगरसेविका अनुराधा गोफणे यांची मागणी
पिंपरी – मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) मोठ्या प्रमाणात गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु, संस्थेने गतवर्षीपासून प्रवेश शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. संस्थेतील प्रवेश शुल्कात कपात करुन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पालिकेकडे केली आहे.