पीएमपीएल डेपोमध्ये बस दुरुस्तीचे काम करणार्या तब्बल 976 कर्मचार्यांकडे वाहन चालविण्याचा परवानाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वाहन चालविण्याचे तंत्र माहिती नसताना आणि परवाना नसताना हे कर्मचारी सर्रास बस चालवित असल्याने प्रशासन अपघात होण्याची प्रतिक्षा करीत आहे का, हा सवाल उपस्थित होत आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 16 October 2018
भीमसृष्टीचा ऑक्टोबरचाही मुहूर्त हुकला
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात त्यांच्या जीवन प्रसंगांवरील म्युरल्स लावून भीमसृष्टी तयार करण्याचे काम अद्याप सुरू आहे. मात्र, अद्याप कांस्य धातूचे सर्व म्युरल्स तयार झालेले नाहीत. किमान दीड महिन्यांचा कालावधी म्युरल्स बसविण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला भीमसृष्टी तयार करण्याचा सत्ताधारी भाजपाचा संकल्प अपूर्ण राहिला आहे. सध्याचे काम पाहता भीमसृष्टी वर्षअखेरीत डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पुणे महामेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवडचा समावेश करा; ‘दिशा’च्या बैठकीत महापौरांची मागणी
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोचे काम वेगात सुरु आहे. परंतु, मेट्रोला केवळ पुणे महामेट्रो असे नाव दिले आहे. शहराची स्वतंत्र ओळख असून ती पुसली जाऊ नये. त्यासाठी पुणे महामेट्रोच्या नावामध्ये पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी महापौर राहुल जाधव यांनी आज (सोमवारी)’दिशा’ समितीच्या बैठकीत केली.
मकरंद निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी (दि.19) होणा-या विधी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून विधीच्या मंजुरीनंतर महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.
शहरात दुर्गोत्सवातून घडतेय बंगालचे ‘दर्शन’
एमपीसी न्यूज – शंखनाद, ढोलचा निनाद , अशा मंगलमय वातावरणात बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा उत्सवाला सुरूवात झाली. पाच दिवस चालणारा हा सण आज (सोमवार) अष्टमीपासून सुरू झाला असून दशमीपर्यंत चालणार आहे. दुर्गा मूर्ती स्थापनेचा मुहूर्त सकाळीच असल्याने सकाळपासूनच बंगाली पद्धतीच्या पूजाअर्चेनेने शहरात नवरात्रीचा आनंद द्विगुणीत केला. बंगाली बांधवाचे विविध धार्मिक कार्यक्रम दि. 15 ते 19 ऑक्टोबर
काटकसरीने पाणी वापरा
पिंपरी - निम्म्या शहराला अपुरा पाणीपुरवठा सुरू असतानाच पवना धरणातही यंदा कमी पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. निश्चित केलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी शहराला पुरविले जात असल्यामुळे शहरवासीयांनी पाण्याची बचत करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
105 शाळांसाठी अवघे 4 पर्यवेक्षक
पिंपरी – शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांची नेमणूक केली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या शिक्षण विभागात केवळ चार पर्यवेक्षक आहेत. तसेच, या पर्यवेक्षकांना विभागातील इतर कामांचा अतिरिक्त भार दिल्याने शाळांच्या तपासणीसाठी वेळ मिळत नाही. यामुळे, शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पोलिसांपेक्षा महापालिकेचे सुरक्षा रक्षक भारी!
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे कार्यालय असलेल्या गुलाब पुष्प उद्यानात भरदिवसा भंगार चोरीची घटना घडली. येथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. मात्र, सशस्त्र चोरटे पाहून पोलिसांनी काढता पाय घेतला. मात्र, महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी धडाडी दाखवत चोरट्यांना पाठलाग करुन पकडत चोरी केलेले भंगार साहित्य परत मिळवले.
“डिजीटल पिढी’ला जैन संस्कृती मार्गदर्शक!
पिंपरी – मातृ-पितृ आणि गुरु परंपरेला महत्त्व देणारी, अहिंसेचे पालन करणारी जैन संस्कृतीच पाश्चिमात्यांचे अनुकरण करु पाहणाऱ्या युवा डिजीटल पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास जैन समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फुलचंद कटारिया यांनी व्यक्त केला.
कचराप्रश्नी विरोधकांनी भाजपला घेरले
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा उचलण्याच्या ठेक्यावरून विरोधकांनी भाजपला आपले लक्ष्य केले आहे. ही निविदा चुकीची असून, जुनीच निविदा मंजूर करायची होती, तर नवीन निविदा प्रक्रिया का राबविली असा सवाल उपस्थित करत, या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी हे काम कायद्याचे पालन करत, निविदेनुसार ही प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी केली आहे. तर हा ठेकाच रद्द करण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
भत्त्याचे अडीच लाख जमा करा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर यांनी तसा अभिप्राय महापालिका आयुक्त कार्यालयाला सादर केला आहे. याशिवाय आतापर्यंत मासिक मानधन आणि सभांचा उपस्थिती भत्ता असे एकूण दोन लाख 54 हजार 968 रुपये महापालिकेत जमा करा, अशी नोटीस नगरसचिव कार्यालयाने कुंदन गायकवाड यांना बजावली आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे गटाला धक्का बसला आहे.
उपमहापौरांच्या स्वच्छतागृहासाठी महापालिकेत तोडफोड
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर पदाखालोखाल असलेल्या उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या मागणीवरुन स्वतंत्र स्वच्छतागृहाचे काम सुरु करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर असलेल्या उपमहापौर दालनाजवळ स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता त्यासाठी कोणतीही प्रशासकीय, आर्थिक मंजुरी न घेता दालन तोडफोडीचा उद्योग सुरू करण्यात आला आहे.
पिंपळे सौदागरमध्ये रंगला पारंपारिक पध्दतीने ‘महाभोंडला’
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज २ सोसायटी येथे रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत शारदीय उत्सवात आगळा वेगळ्या महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीमधील सर्व वयोगटातील महिलांनी उत्साहाने भोंडल्याची गाणी गात भोंडला सादर केला. नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांच्या हस्ते महाआरती करून भोंडल्याच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रश्नमंजुषेसह विविध पारंपारिक खेळ झाले.
अतिक्रमणावर पालिकेची कारवाई
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील अतिक्रमणावर आज (सोमवारी) धडक कारवाई केली. हातगाड्या, टप-या जप्त करण्यात आल्या आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील यमुनानगर पोलीस चौकीसमोरील तसेच कस्तुरी मार्केट, नेवाळे चौक येथील विनापरवाना हातगाडी, टप-यांवर आज धडक अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यामध्ये 16 हातगाडी, एक टपरी, एक लोखंडी काऊंटर जप्त […]
महापालिकेतर्फे वनपाल रमेश जाधव यांचा सपत्नीक सत्कार
एमपीसी न्यूज – वनपाल रमेश जाधव यांच्या कार्याची दखल घेत महापालिकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात महापालिकेतर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे आदी यावेळी उपस्थित होते. रमेश जाधव यांच्या गेल्या 35 वर्षातील कामगिरीची […]
शहरातील एक हजार अट्टल गुन्हेगार एका क्लिकवर
येरवडा : पुणे शहर व पिंपरी-चिंचवड मधील तब्बल एक हजार गुन्हेगारांची माहिती एका लिंकवर उपलब्ध झाली आहे. या लिंकच्या माध्यमातून हव्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'हिस्ट्री शिटर'ची (अट्टल गुन्हेगार) कुंडली मिळणार आहे. यामध्ये त्यांचे नाव, पत्ता, फोटो, संपर्क क्रमांक, वाहन क्रमांकासह पत्ते गुगल मॅपद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या लिंकच्या माध्यमातून पोलिस गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.
सुलभा उबाळे यांची शिवसेनेच्या शिरुर महिला जिल्हा संघटकपदी निवड
चौफेर न्यूज – शिवसेनेच्या शिरुर महिला जिल्हा संघटकपदी माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. तर, भोसरी मतदारसंघाच्या महिला संघटकपदी वेदश्री काळे यांची निवड करण्यात आली आहे.
दिव्यांगाच्या अधिकृत स्टॉलवर कारवाई केल्याप्रकरणी पिंपरी पालिकेसमोर आंदोलन
चौफेर न्यूज – दिव्यांग नागरिकांच्या अधिकृत स्टॉलवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याचा आरोप करत दिव्यांग नागरिकांनी आज (सोमवारी) महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. अधिकृत स्टॉलवर कारवाई करणा-या अतिक्रमण निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी आहे.
14k citizens give views for civic projects
More than 14,000 citizens have submitted their suggestions — ..
Subscribe to:
Posts (Atom)