Thursday, 24 August 2017

स्वच्छता मोहिमेत हवाप्रत्येक नागरिकाचा सहभाग

त्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी हर्डीकर बोलत होते. या वेळी महापालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, ...

मिशन विकास आराखडा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सत्ताधारी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तरतूद केलेल्या २०५ कोटीपैकी ११२ कोटी रुपये ३५ आरक्षणे, ४१ प्रमुख पर्यायी रस्ते आणि उड्डाण पुलांच्या कामांसाठी वर्गीकरणास स्थायी समिती सभेत बुधवारी (ता.२३) मंजुरी देण्यात आली.  

2 pythons go missing at zoo run by PCMC

Two pythons have gone missing from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation-run (PCMC) Bahinabai Chaudhary Zoo at Akurdi. The establishment has long lacked basic security, despite an earlier incident of baby crocodiles being stolen. Now, the ...

पिंपरी-चिंचवडमधील प्राणी संग्रहालयातील दोन अजगरांची चोरी

पिंपरी-चिंचवडमधील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून दोन अजगर चोरीला गेल्याची घटना घडली. संग्रहालयातून ...

‘स्मार्ट सिटी’वर निबंध स्पर्धा

पिंपरी – भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने “माझी सिटी, स्मार्ट सिटी’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
निबंधामध्ये आपले शहर “स्मार्ट’ होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या बाबींचा उल्लेख व उपाययोजना नमूद करणे आवश्‍यक आहे. निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत लिहावा. ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रथम क्रमांकास एक हजार, द्वितीय क्रमांकास सातशे, तृतीय क्रमांकाला पाचशे रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

अत्रे रंगमंदिर नऊ महिने बंद

पिंपरी – पिंपरी प्रभाग क्रमांक 20 मधील आचार्य अत्रे रंगमंदिर स्थापत्य व दुरूस्तीच्या कामासाठी तब्बल नऊ महिने बंद राहणार आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे प्रेक्षागृह बंद असल्याने शाळा, तसेच शहरातील विविध कलाप्रेमींच्या कार्यक्रमाची मात्र तारांबळ उडणार आहे. स्थापत्य व विद्युत विषयक कामांसाठी हे रंगमंदिर बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय घुबे यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार दुसरे सभागृह

दैनिक प्रभातच्या बातमीची घेतली दखल
पिंपरी – महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयासाठी थेरगाव येथील शाळेच्या मूळ इमारतीच्या रचनेत कसलाही बदल होणार नाही. शाळेतील सांस्कृतिक सभागृहाच्या बदल्यात विद्यार्थ्यांसाठी शाळेतच सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत पालक किंवा शिक्षकांनी गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी दिली. शाळेच्या सभागृहाचा अधिकाऱ्यांनी ताबा घेतला होता. दै. प्रभातने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने सभागृह उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.

विनापरवाना मंडप उभारणाऱ्यांवर कारवाई

महापालिकेचा इशारा : गणेश मंडळांना परवानगी बंधनकारक
पिंपरी – शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून दुसरीकडे महापालिका प्रशासनाने शहरातील गणेश मंडळांना कायद्याचा हंटर उगारला आहे. विनापरवाना मंडप उभारल्यास ते बेकायदेशीर ठरवून त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. तसेच अशा मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

Ministerial berth: Laxman Jagtap or Mahesh Landge? Pimpri-Chinchwad awaits its first honour

BJP MLAs Laxman Jagtap and Mahesh Landge are the two top contenders from Pimpri-Chinchwad for a ministerial berth, especially after the party's resounding victory in PCMCelections where it ended the three-decade old reign of the NCP-Congress. In fact ...

क्‍लस्टर विकासात उदासीनता राहिली- केंद्रीय मंत्री कलराज मिश्रांची कबुली

पिंपरी : औद्योगिक क्‍लस्टर विकासात दहा वर्षानंतरही उदासीनता राहिल्याची कबुली केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी आज (ता. 23) पिंपरी-चिंचवडमध्ये दिली. त्यामुळे आता हे क्‍लस्टर उभारणीवर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मूलभूत सेवासुविधा आणि पुरेशा विजेअभावी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचे, मात्र त्यांनी अमान्य केले. वीजटंचाईवर सौरऊर्जा हा पर्याय असून त्याला प्राधान्य देत असल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षपदी वैशाली काळभोर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदी नगरसेविका वैशाली काळभोर यांची आज (बुधवारी) निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काळभोर यांच्या निवडीची घोषणा केली.

आधार आणि डिमॅट खाते संलग्नीकरण होणार

सेबीकडून तडजोड होणार नाही 
नवी दिल्ली -शेअर आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीसाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक सेबीने घेतला आहे. मुंबई शेअरबाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (एनएसई) दोन्ही एक्‍स्चेंजेसना सेबीने सूचना केल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना त्यांचे डिमॅट आणि म्युच्युअल फंड खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावे लागणार आहे.