Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has barred a contractor from participating in bids related to sewage treatment plants' ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 24 September 2017
पिंपरी-चिंचवडला पाच ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृहे सुविधा
पिंपरी-चिंचवड शहरात पाच ठिकाणी 'अॅटोमॅटिक पब्लिक टॉयलेट' बसवण्यात येणार आहेत, यासाठी 'सॅमटेक क्लिन अॅन्ड केअर' या कंपनीने पुढाकार घेतला आहे. सर्वसोयींयुक्त तसेच महिला व पुरूष असे दोघांनाही वापरता येतील, अशा प्रकारची ही ...
तळवडे ‘सफारी पार्क’च्या जागेची पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डिकर यांचेकडून पाहणी
रेन फॉरेस्ट, नाईट पार्क की बर्ड पार्क: पालिकेकडून सर्वेक्षण सुरु
तळवडे येथील मोकळ्या जागेत डिअर सफारी पार्क उभारण्याची संकल्पना महापालिके आहे. मात्र, त्याबरोबर रेन फॉरेस्ट, नाईट पार्क आणि बर्ड पार्क यापैकी काही करता येईल का, याचाही विचार पालिका करत आहे. त्यासाठी महापालिकेचे सर्वेक्षण सुरू असून ऑनलाईन पध्दतीने नागरिकांचे अभिप्राय घेतले जात आहेत. दरम्यान, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नियोजित सफारी पार्कच्या जागेची शनिवारी (दि. २३) पाहणी केली.
कचरा व्यवस्थापन न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका – आयुक्त हर्डीकर
चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु, घरोघरचा कचरा गोळा करुन डेपोपर्यंत वाहून नेणे आणि शहरातील रस्ते व गटर्स साफसफाई आठ प्रभागात प्रत्येकी एक एजन्सी नेमण्यात येणार आहे. त्यामुळे त्या सर्व कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत पूर्वीच्या ठेकेदारांना मुदतवाढ देणे आवश्यक होते. जर मुदतवाढ दिली नसती तर शहरातील सगळा कचरा जागोजागी ठप्प होवून आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असते, अशी कबुली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
..तर 'रिलायन्स'चे काम काढा
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव,पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य ...
हिंजवडी मेट्रो कुणाकडे?
पुणे शहरात मेट्रो प्रकल्पांतर्गत दोन मार्गिका प्रस्तावित आहेत. त्यापैकी शिवाजीनगर ते िहजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अॅथॉरिटी- पीएमआरडीए) करण्यात ...
अवैध धंद्यांत पोलिसांची भागीदारी, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यास बसेल चाप
पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत पिंपरी-चिंचवड व शहरालगतचा ग्रामीण परिसर येतो. पोलीस मुख्यालयापासून हे अंतर ३० ते ३५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाºयांकडून या भागातील पोलिसांवर पूर्ण नियंत्रण ...
“रेन्ट टू ओन’ धोरणाचे अनेक फायदे
फ्लॅट भाड्याने दिल्यास भाडेकरूच्या बाजूने कायदा असल्यामुळे मालक फ्लॅट भाड्याने देत नाहीत. याचा सुवर्णमध्य साधणारी “रेन्ट टू ओन’ ही योजना सरकारने तयार केली असून, त्याअंतर्गत भाड्याने घर घेणारा काही कालावधीनंतर घराचा मालकही होऊ शकेल. तसेच भाडेकराराच्या अटी दोघांनाही मान्य असतील याची काळजी सरकार घेणार आहे. शहरात यामुळे कुणी बेघर राहणार नाही.
– कमलेश गिरी
– कमलेश गिरी
नोकरीसाठी फोन आलाय? जरा जपून...
खोट्या आमिषाने अनेक बेरोजगारांची फसवणूक
पुणे: ऑनलाइन नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुण-तरुणींना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. नोकरी देण्याच्या बहाण्याने काही संस्था बेरोजगार तरुणांना लुबाडून पसार होतात. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर नव्या नावाने संस्था सुरू करून पुन्हा बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जाते. पोलिसांनी अशा सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांमधून केली जात आहे.
पुणे: ऑनलाइन नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुण-तरुणींना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. नोकरी देण्याच्या बहाण्याने काही संस्था बेरोजगार तरुणांना लुबाडून पसार होतात. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर नव्या नावाने संस्था सुरू करून पुन्हा बेरोजगार तरुणांची फसवणूक केली जाते. पोलिसांनी अशा सायबर गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांमधून केली जात आहे.
स्वप्नातील घरकुलासाठी तुडुंब गर्दी, 'लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७'मध्ये शेकडो गृहप्रकल्पांचा सहभाग
एकाच छताखाली पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील प्रॉपर्टीचे पर्याय नागरिकांना उपलब्ध व्हावेत, यासाठी 'लोकमत'च्या वतीने आयोजित केलेल्या 'लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७' या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली ...
चिंचवडमध्ये घुमणार ताल घोष
पिंपरी – चिंचवड नवरात्र महोत्सावअंतर्गत उद्या (रविवारी) पिंपरी-चिंचवड येथे पारंपारीक वाद्यांच्या महावादनाच्या ताल घोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी दिली.
चिंचवड बस स्टॉप जवळील चापेकर चौकाजवळील प्रांगणात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता वादनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सवाअंतर्गत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील शिवाज्ञा ढोल-ताशा पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक, पुण्यातील नुमावि वाद्यपथक, श्री शिव दुर्गा ढोल-ताशा पथक, एक दिल ताशा पथक सहभागी होणार आहेत.
शिवसेनेत शहर प्रमुख बदलाच्या हलचाली?
सोमवारी मातोश्रीवर बैठक : उबाळे, आल्हाट, चिंचवडे, भापकर चर्चेत
पिंपरी – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक तसेच शिवसेनेचे विद्यमान शहर प्रमुख राहुल कलाटे यांचा तीन वर्षांचा कार्यकाल संपत आल्याने शिवसेनेकडून नवीन शहर प्रमुखाची निवड केली जाणार आहे. यासंदर्भात येत्या सोमवारी (दि. 25) मातोश्रीवर बैठक होणार आहे. या पदासाठी शहर महिला संघटक सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, मारुती भापकर, माजी शिक्षण मंडळ सदस्य गजानन चिंचवडे यांचे नाव चर्चेत असून शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उबाळे यांचे नाव आघाडीवर आहे.
भाजपा कामगार आघाडीचा अभ्यास वर्ग
चौफेर न्यूज – भाजपच्या कामगार आघाडीच्या वतीने कामगार प्रतिनिधींकरीता रविवारी (दि.24)अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोरवाडी येथील हॉटेल घरोंदा येथे हा अभ्यास वर्ग आयोजित केला आहे. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या अभ्यास वर्गाचे उद्घाटन होणार असून यावेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार उपस्थित राहणार आहेत.
चिंचवड ते राजगुरूनगर बस सुरू करण्याची मागणी
चौफेर न्यूज – ‘पीएमपी’ची चिंचवड ते राजगुरूनगर बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून राजगुरूनगर या ठिकाणी कामासाठी जाणारा नोकरदार वर्ग जास्त आहे. राजगुरूनगरपर्यंत जाण्यासाठी दोन बस बदलून जाव्या लागतात. त्यासाठी चिंचवड ते राजगुरूनगरपर्यंत बस सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अण्णा भाऊ साठे स्मारक समितीवर गोरखे
पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून घाटकोपर परिसरातील चिरागनगरात लोकशाहिरांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या समितीत पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांचा समावेश करण्यात आला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)