PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon come up with a policy for road concreting to check potholes and resultant accidents.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 3 August 2018
नागरिकांना एकाच वेळी मिळणार विविध सेवा
पिंपरी – विविध प्रकारच्या सेवा एकाच वेळी प्रदान करण्याची क्षमता असणारी प्रणाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे. पहिल्यांदा कर संकलन विभागासाठी ही तांत्रिक प्रणाली उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये 25 इंग्रजी आणि 25 मराठी प्रश्न-उत्तरे तयार करून संगणक प्रणालीद्वारे नागरिकांना माहिती उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावास मान्यता दिली.
न्यायालयाचे काम लवकर सुरु होणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोशी येथे होणा-या प्रशस्त न्यायालयाचे काम लवकरच सुरु होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भूमिका सकारात्मक आहे. या न्यायालयाची 10 मजली इमारत होणार असून त्यापैकी चार मजल्यांचे काम लवकरच सुरु होणार आहे. अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.
मेट्रो स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा
पुणे – पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने नुकताच भूजल अधिनियम जाहीर केला आहे. त्यानुसार निवासी, अनिवासी इमारतींवरील पावसाच्या पाण्याची साठवण आणि पाणी पुनर्भरण करणे बंधनकारक केले आहे. पाणी पुनर्भरणासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) शहरातील सर्व मेट्रो प्रकल्पांनी सहभाग दर्शविला आहे. शहरात होऊ घातलेल्या मेट्रो मार्गावरील सर्व स्टेशन्सवर आणि मेट्रो मार्गावरील दोन पिलरच्या मधल्या जागेत पाणी पुनर्भरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
MahaMetro to raise pillars for Pimpri station
PMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation Limi ..
Gangs, vehicle vandalism major challenges for PCMC police chief
Vehicle vandalism, newly-emerging gangs and street crimes are going to be some of the major challenges before the first-to-be police commissioner of Pimpri-Chinchwad industrial township, RK Padmanabhan. The commissionerate is likely to start functioning from August 15.
व्हॉटस् अॅॅपवर फोटो पाठवा अन् रेल्वे स्टेशन स्वच्छ करा
9766353772 क्रमांक प्रशासनाकडून जारी
पुणे – रेल्वे स्थानकावरील गैरप्रकार, अस्वच्छतेमुळे त्रास सहन करावा लागतो. मात्र, मध्य रेल्वे पुणे विभागाने यावर उपाय म्हणून एक व्हॉट्स अॅॅप नंबर सुरू केला आहे. यावर रेल्वे स्टेशन परिसरातील अस्वच्छता, गैरप्रकाराच्या घटनेचा फोटो प्रशासनाला पाठवू शकणार आहे. यामुळे वेळीच कारवाई शक्य होणार आहे.
पुणे – रेल्वे स्थानकावरील गैरप्रकार, अस्वच्छतेमुळे त्रास सहन करावा लागतो. मात्र, मध्य रेल्वे पुणे विभागाने यावर उपाय म्हणून एक व्हॉट्स अॅॅप नंबर सुरू केला आहे. यावर रेल्वे स्टेशन परिसरातील अस्वच्छता, गैरप्रकाराच्या घटनेचा फोटो प्रशासनाला पाठवू शकणार आहे. यामुळे वेळीच कारवाई शक्य होणार आहे.
रेल्वे बुकिंग झाले सोपे
पुणे - लोकलच्या प्रवाशांसाठी रेल्वेने गेल्या एप्रिल महिन्यापासून ‘यूटीएस ॲप’द्वारे ऑनलाइन ई-तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये २३ हजार प्रवाशांनी या ॲपचा लाभ घेतल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या सुविधेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सोसायट्यांचे ‘जीएसटी’ला आव्हान
पिंपरी - एखाद्या गृहरचना संस्थेकडून सोसायटीच्या देखभालीसाठी प्रत्येक घरातून दर महिन्याला पाच हजार रुपये घेतले जात असतील, तर त्यांना वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. शहरातील सोसायट्या याबाबत अनभिज्ञ असल्याचे बोलले जात असले, तरी येत्या सप्टेंबर महिन्यानंतर अशा सोसायट्यांना वस्तू आणि सेवा कर विभागाकडून नोटिसा येण्याची शक्यता आहे.
Transfer of ownership at school in Sangvi hits RTE beneficiaries
PUNE: Around 35 students of the National English School in New Sangvi, who were admitted under the Right to Education (RTE) Act, may now have to go to new institutions because the management of the school has been transferred to new owners.
पिण्याच्या पाण्याचे केंद्राकडून होणार ऑडीट
महापालिकेकडून नागरिकांना केल्या जाणार्या पिण्याच्या पाण्याचे भारतीय लेखा परिक्षण विभागाकडून परिक्षण (ऑडीट) होणार आहे. पहिल्यांदाच अशा पध्दतीचे ऑडीट होत आहे. त्यात प्रामुख्याने पिण्याची पाण्याची गुणव्वता, संख्या आणि वाटप यंत्रणा याचा समावेश असून या ऑडीटमध्ये आढळून येणार्या त्रुटी दुर करण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून महापालिकांना मदत मिळणार आहे.
नागरी वाहतूक धोरणाला मान्यता कधी?
मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या खासगी वाहनसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचे प्रस्तावित नागरी वाहतूक धोरण गेल्या काही महिन्यांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. या धोरणाला मान्यता मिळाल्यानंतर दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांना त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
पालिका शाळांत सेमी इंग्रजी
पिंपरी-चिंचवड शिक्षण समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा खालावत असलेला दर्जा आणि घटणारी विद्यार्थी संख्या यामध्ये सुधारणा करण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा खालावत असलेला दर्जा आणि घटणारी विद्यार्थी संख्या यामध्ये सुधारणा करण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.
कामे अपूर्ण, तरी उद्घाटनाची तयारी सुरू
पोलीस आयुक्तालयाच्या प्रेमलोक पार्क येथील नियोजित इमारतीचे डागडुजीचे काम सुरु आहे
पालिका आवारात पार्किंग सुविधा करा
पिंपरी : महापालिका भवनात वाहने लावण्यासाठी पुरेशी पार्किग सुविधा नाही. त्यामुळे नागरिक व कार्यकर्त्यांना नाईलास्तव रस्त्यावर वाहने लावाली लागतात. पालिका भवनात पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिकेकडे केली आहे.
लोखंडे कामगार सभागृह कामगारांसाठीच ठेवावे
पिंपरी : महापालिकेने कामगारांसाठी उभारलेले पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे कामगार सभागृह आरोग्य खात्यास न देता ते कामगारांसाठीच ठेवावे, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, या भवनात कामगारांसाठी वाचनालय असून त्यात विविध उपक्रम पार पडतात. महापालिकेला 30 ते 40 टक्के कर कामगारांकडून मिळतो. उर्वरित कर कामगारनगरीतील विविध उद्योगांमधून प्राप्त होतो. परंतू, महापालिकेने या भवनातील तळमजल्यातील गाळे वाहतूक पोलिस यंत्रणेच्या कार्यालयीन कामकाजासाठी देले आहे. शिवाय उर्वरित राहिलेले गाळे आरोग्य खात्याच्या कार्यालयास देण्याचे ठरवले आहे. मात्र तसे करू नये.
बायसिकल शेअरिंग चिंचवड परिसरात राबविण्याची मागणी
वाल्हेकरवाडी - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे शहरात सायकल सुविधा योजना (बायसिकल शेअरिंग) राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर ते वाकड रस्त्यासह क्षेत्रीय पायाभूत सुविधा तत्त्वावर निश्चित केलेल्या ४५ ठिकाणांची निवड केली आहे. त्यासाठी सायकल प्रायोजक कंपन्या आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
‘शेअर ए बायसिकल’ प्रकल्पाला मंजुरी
पिंपळे गुरव ते वाकड मार्गावर 45 ठिकाणी राबविणार योजना
पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात ’बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत पिंपळे गुरव ते वाकड या बीआरटीएस मार्गालगतच्या एकूण 45 ठिकाणी ही योजना राबविली जाणार आहे. यामध्ये काही उच्चभ्रू सोसायट्यांचा देखील समावेश असणार आहे. याबाबतचा कराराला बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
…तरच नृत्याचा प्रवास सुकर होईल – मनिषा साठे
पिंपरी – ततकारातील जरब, आघात आणि देहबोलीतून ततकाराची स्पष्टता दाखवता आली पाहिजे. यासाठी सराव आवश्यक आहे तेव्हाच तुमचा नृत्याचा प्रवास सुकर होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध नृत्यांगना गुरु पंडिता मनिषा साठे यांनी चिंचवड येथे केले.
सायकल लाभार्थ्यांकडून “गोलमाल’?
पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाने लाभार्थ्यांना सायकल व शिलाई मशीन थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अतंर्गत देण्यात आला. मात्र, काही लाभार्थ्यांनी “जीएसटी’च्या बोगस पावत्या सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस पावत्या देणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
“हॅलो फॉरेस्ट’… डायल 1926; वनविभागाशी संपर्क
पुणे – रस्त्यावर आढळलेल्या एखाद्या जखमी वन्यप्राण्याची माहिती, प्राणी तस्करीबाबत सूचना देणे, वणवा, वृक्षारोपण यांसारख्या असंख्य विषयांसंदर्भात वनविभागाशी संपर्क साधण्यासाठी 1926 या क्रमांकाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत असतो. “हॅलो फॉरेस्ट’ हा उपक्रम राबविणारा राज्याचा वनविभाग हे देशातील पहिलाच विभाग आहे.
स्कूल व्हॅनचालकांवर बेरोजगारीचे संकट
पिंपरी - तुम्ही, सिग्नलला अथवा रस्त्यावर जाताना स्कूल व्हॅनमध्ये कोंबून बसलेली मुले पाहिली असतील. परंतु, भविष्यात असे चित्र दिसणार नाही. कारण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता 13 आसन क्षमतेपेक्षा कमी आसन असलेल्या शालेय विद्यार्थी वाहनांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अशा वाहतूकदारांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार नसल्याने स्कूल व्हॅन व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
रेल्वे भारमानात 30 टक्के वाढ
पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीत वाढ झाल्यामुळे भारमान क्षमतेपेक्षा 30 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळेच खंडाळा परिसरात रुळाचा तुकडा पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. असे धोके टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला हा वाढणारा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम प्रस्तावित आहे. त्यापैकी एक ट्रॅक लवकर उपलब्ध झाल्यास भार कमी होऊ शकेल.
जुनी सांगवीत शाडुमातीच्या पर्यावरणपुरक गणेशमुर्ती तयार करण्याची कार्यशाळा
जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभाग व इसिए संस्था यांच्या वतीने आयोजित पर्यावरण पुरक शाडु मातीच्या गणेश मुर्ती तयार करण्याची कार्यशाळा पालिकेच्या जुनी सांगवी मुले क्र.४९ शाळेत संपन्न झाली. शाडु माती मुर्तीचे काम, कला आणि कलाकारांचे कौतुक या उपक्रमाअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना मिळणार कचरा कंपोस्टिंगचे ज्ञान
पर्यावरण विषयक नागरी समस्यांबाबत बैठक ः कित्येक मुद्यांवर सकारात्मक चर्चा
पिंपरी – कचरा ही शहरासमोरील सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक समस्या आहे. जनजागृतीनेच या समस्येचे निराकारण होऊ शकते, ही बाब सर्वांच्याच ध्यानात आली आहे. कचरा कंपोस्टिंगविषयी शहरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या साडे तीन लाख विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाल्यास प्रत्येक घरात माहिती पोहचेल आणि जनजागृती होईल, असे विचार पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने एका बैठकीत मांडण्यात आले. यावर पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून ऑगस्ट 2018 मध्ये कंपोस्टिंग योजनेबाबत प्रदर्शन होणार असून त्याच माध्यमातून योजना राबविण्याचे पर्यायी मार्ग शोधण्यात येईल असे सांगण्यात आले.
पिंपरी – कचरा ही शहरासमोरील सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक समस्या आहे. जनजागृतीनेच या समस्येचे निराकारण होऊ शकते, ही बाब सर्वांच्याच ध्यानात आली आहे. कचरा कंपोस्टिंगविषयी शहरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या साडे तीन लाख विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाल्यास प्रत्येक घरात माहिती पोहचेल आणि जनजागृती होईल, असे विचार पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने एका बैठकीत मांडण्यात आले. यावर पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून ऑगस्ट 2018 मध्ये कंपोस्टिंग योजनेबाबत प्रदर्शन होणार असून त्याच माध्यमातून योजना राबविण्याचे पर्यायी मार्ग शोधण्यात येईल असे सांगण्यात आले.
आयटीआय अभ्यासक्रमाकडे मुलींची पाठ
पिंपरी - औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)सारख्या रोजगाराभिमुख क्षेत्राकडे मुलींचा कल वाढावा, यासाठी त्यांना ३० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आरक्षणाच्या तुलनेत १० टक्केदेखील मुली प्रवेश घेत नसल्याचे एका माहितीतून स्पष्ट झाले आहे. या वर्षी तीन हजार ३३९ जागांपैकी केवळ ५९३ जागांवर प्रवेश घेतला असून, त्यातून मुलींची आयटीआयविषयी उदासीनता दिसून येते.
Subscribe to:
Posts (Atom)