Tuesday, 12 March 2019

PCMC set to build grade separator to help reduce traffic congestion at Dange Chowk

PIMPRI CHINCHWAD: The civic body will construct a grade separator at the busy Dange Chowk on the Chinchwad-Hinjawadi road to reduce the travel time fr.

Maval : मावळ मतदारसंघात 22 लाख तर शिरुरमध्ये 21 लाख मतदार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघातील निवडणूक यावेळी प्रथमच दोन टप्यात होत आहे. चार मतदार संघासाठी तिस-या आणि चौथ्या टप्यात मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामतीत 23 तर शिरुर आणि मावळ मतदारसंघासाठी 29 एप्रिलला मतदान होईल. तर, 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

मतदान यंत्राद्वारे दिलेले मत पडताळण्यासाठी मतदाराला लागणार अतिरिक्त सात सेकंद वेळ

पिंपरी (दि. ११ मार्च) :-  मतदान यंत्राद्वारे दिलेले मत योग्य व्यक्तीला दिले की नाही हे समजण्यासाठी मतदानानंतर सात सेकंद संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह मतदान यंत्रावरील स्लिपवर दिसणार आहे. त्यामुळे मतदाराची खात्री पटणार असली, तरी प्रत्येक मतदार सात सेकंद अधिक वेळ घेणार आहे. त्यामुळे मतदानाला पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागेल.

भोसरी पोलिसांनी केला २.२५ लाखाचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भोसरी पोलिसांनी वेगवेगळ्या दोन कारवायांमध्ये अटक केलेल्या आरोपींकडून दोन लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

महापालिकेत प्रशासनाकडून आचारसंहितेचे पालन

पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच पिंपरी चिंचवड महापालिकेने त्याचे पालन करण्यास सुरुवात केली आहे, याबाबतची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सोमवारी दिली. पालिकेचे मुख्यालय, प्रभाग कार्यालये, शाळा, अन्य इमारती यावर असलेले राजकीय पक्ष व समाजावर प्रभाव टाकणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांचे नामोउल्लेख असलेले फलक, जाहिराती एकतर हटविण्यात आले आहेत. किंवा, झाकण्यात आले आहेत. हे काम 24 तासात पूर्ण करण्यात येणार आहे.

विज्ञान प्रदर्शनातून बालवैज्ञानिकांनी साकारले विविध प्रयोग

पिंपरी चिंचवड ः बालवैज्ञानिकांच्या प्रयोगशीलतेला वाव मिळून वैज्ञानिक निर्माण व्हावेत, या उद्देशाने जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील नवीन तंत्रज्ञानाची एक वेगळी जोड या ठिकाणी पाहायला मिळाली.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अंतर्गत दोन लाखांहून अधिक बालकांना लसीकरण

पिंपरी  :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रविवार (दि 10) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा शुभारंभ महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैदयकीय संचालक डॉ .पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी महापौर राहुल जाधव यांचे शुभहस्ते महापालिकेच्या चिखलीतील म्हेत्रेवस्ती दवाखाना येथे केला आहे. यावेळी स्थानिक नगरसेविका योगीता नागरगोजे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, राज्य लसीकरण अधिकारी दिलीप पाटील, प्रांतपाल रो. एस. के. जैन, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या भोईर, रोटरी क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी व मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

…तर औद्योगिक क्षेत्रातील अपघात कमी होतील!

भोसरी – आपली सुरक्षा हेच आपले कर्तृत्व समजल्यास औद्योगिक क्षेत्रातील अपघात कमी होतील, असे प्रतिपादन साज ऑफ उद्योग समूहाचे संस्थापक प्रकाश जगताप यांनी केले.

सांगवीतील विजेताने शोधला फेसबूक बग

सांगवी – शहरातील अनेक महिलांनी आपली यशोगाथा व कर्तृत्वावर अटकेपार झेंडे लावले. सांगवीत राहणाऱ्या विजेता पिल्ले यांनी फेसबूक वरील बग शोधला. फेसबूकने एक हजार डॉलर बक्षीस देऊन बग शोधणारी भारतातील पहिली महिला अशी तिची नोंद केली आहे.

पाण्याची बोंब अन्‌ टॅंकर वाल्यांची चांदी

दापोडी – पवना धरणातील पाणी पातळी खालावत असल्याने महापालिकेने आठवड्यातून एक दिवस “शट डाऊन’चा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध भागामध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जात आहे. मात्र, पहिल्याच आठवड्यात महापालिकेचे हे नियोजन फसल्याने सांगवी, दापोडी परिसरात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे टॅंकरवाल्यांची चांदी झाली असून अव्वाच्या-सव्वा दराने पाणी पुरवठा केला जात आहे.

पीएमारडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम कुमार

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे महाराष्ट्र मेरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लवळे येथील भारती महाविद्यालयात 'घनकचरा व्यवस्थापन'

पिरंगुट  - "पर्यावरण संरक्षणाची जाणीव ठेऊन देशाचा शाश्वत व संधारणीय विकास साधला पाहिजे. मनुष्याने औद्योगिक क्रांतीपासून खूप मोठ्या प्रमाणात विकास केला पण त्याचबरोबर पर्यावरणाची अपरिमित व न भरून येणारी हानी केली व या सर्वांसाठी आपण अभियंतेही जबाबदार आहोत. त्यामुळे आता जो विकास साधायचा आहे तो पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होईल अशा पद्धतींचाच अवलंब करून करावा. "असे आवाहन भारती विद्यापीठ इन्स्टीटयूट ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आणि रिसर्चचे संचालक डॉ. एरिक भरुचा यांनी केले. 

स्मार्ट सिटीचे ‘कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर’ निगडीत !

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे ‘कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर’ महापालिकेच्या निगडीतील संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलातील अस्तित्व मॉल येथे सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरद्वारे संपूर्ण शहरावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍याद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. हे सेंटर उभारीची मुदत दीड वर्षे आहे.

चिंचवड प्रवासी संघातर्फे रेल्वे इंजिनाची पूजा

लोणावळा-पुणे लोकलला ४१ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्त चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनाची पूजा करण्यात आली. प्रवाशांनी मोठ्या उत्साहात लोकलचा वाढदिवस साजरा केला. पुणे-लोणावळा दरम्यान दि.११ मार्च १९७८ पासून लोकल सुरू झाली होती. 

गृहयोजनेचे स्थलांतर करा; नागरिकांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी संतनगर येथील पेठ क्रमांक सहामध्ये उभारण्यात येणा-या गृहयोजनेचे अन्यत्र स्थलांतर करण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे या प्रकल्पात योग्य तो बदल करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरण प्रशासनाला केल्या आहेत.

उन्हाळा आला…आता आरोग्य सांभाळा

एमपीसी न्यूज- उन्हाळा म्हंटल की प्रचंड उकाडा, अंगावर येणारा घाम, आणि घशाला लागलेली कोरड. मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. हळू हळू उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हाळ्यात विविध प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच आरोग्य स्वतःच जपलं पाहिजे.विशेषतः उन्हाळ्यात लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्मघात होण्याची शक्यता असते. 

Pimpri : रस्त्यावर धूळ खात पडलेल्या वाहनांवर होणार कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात भले मोठे रस्ते झाले. त्यातूनच बीआरटीचे नियोजन झाल्याने बीआरटी मार्ग देखील तयार करण्यात आले. मात्र तयार असलेल्या ज्या बीआरटी मार्गावर बस धावत नाही, त्या मार्गांवर खासगी वाहने धूळ खात पडली आहेत. तसेच प्रशस्त रस्ते बघून नागरिकांनी रस्त्यांच्या बाजूला देखील वाहने लावून ठेवली आहेत. 

महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ जोडपी होणार विधीवत विवाहबद्ध

पिंपरी (दि. ११ मार्च) :- महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस्‌ फाउंडेशन व आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने ”सर्व जाती धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्या” चे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या मागणीनुसार गृहयोजनेत बदल केले जातील – सदाशिव खाडे

निगडी (दि. १२ मार्च) :-  पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने सेक्टर सहा मध्ये गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजित आहे. या गृहयोजनेत ३८४ सदनिका आणि १६ रोहाऊस बांधण्यात येणार आहेत. गृहयोजना होणा-या परिसराजवळ राहणा-या नागरिकांना उद्यान, खेळाचे मैदान, महापालिका शाळा, विरंगुळा केंद्र नाही. त्यामुळे प्रकल्प तेथून स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दापोडीतील हॅरिस पुलाची पालिका करणार मजबुतीकरण

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील मुळा नदीवरील दापोडी येथील ब्रिटीशकालीन हॅरिस पुलाची दुरूस्ती पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. या जुन्या पुलाच्या बांधकामाचे मजबुतीकरण केले जाणार आहे. या कामासाठी पालिका सव्वातीन कोटी खर्च करणार आहे.

Maharashtra government asks urban bodies to start weekly markets inside housing societies

The Maharashtra government has directed all urban local bodies in the state to allot vacant land in every electoral ward, including on the premises of residential cooperative housing societies, for setting up weekly markets (athawade bazaar), a step aimed at providing farmers markets to which they can have direct access to sell their produce.