Wednesday, 5 July 2017

मुंढेंसोबत 'चाय पे चर्चा'

'आयटी' पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिक फाटा ते हिंजवडी मार्गावर 'एसी' बस सुरू करण्याची सूचना आमदार जगताप यांनी केली. त्यावर मुंढे यांनी पहिल्या टप्प्यात निगडी ते पुणे मनपा मार्गावर लवकरच 'एसी' बस सुरू करणार असल्याचे ...

पुणे मेट्रो पिंपरीपर्यंत नव्हे, निगडीपर्यंत हवी!

पिंपरी : केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. पुणे महामेट्रोच्या वतीने हे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी ...

मेट्रोसाठी सामुहीक प्रयत्नाची गरज

  • संस्था, संघटनांनी एकत्रितेची गरज ः सिटीझन फोरम संघटनेची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र व राज्याने मंजुरी देवून पुणे महामेट्रोने काम सुरुवात केली आहे. परंतू, पहिल्या टप्यात पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित आहे. त्यास केंद्राची तत्वत: मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने केली असून, याकरिता सामुहीक प्रयत्न व संस्था,संघटनानी एकत्रित येण्याची गरज आहे. असे आवाहन तुषार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले.

पीएमपीला निधी देणार - सावळे

बसआगार, स्थानकांसाठी तीन ठिकाणी जागा देण्याची जगताप यांची ग्वाही
पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरात तीन ठिकाणी पीएमपीला बसआगार आणि स्थानकांसाठी जागा देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्पष्ट केले.

वाहतूक पोलिसांना मिळणार क्रेन

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील ‘सर्व्हिस रोड बनलाय वाहनतळ’ या बातमीची दखल महापालिकेने घेतली आहे. दापोडी ते निगडी या मार्गावर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना दोन क्रेन दिल्या जाणार असल्याचे शहर सहअभियंता प्रवीण तुपे यांनी सांगितले.

अनधिकृत जाहिरात फलकांवर पिंपरी कॅम्पात कारवाई

पिंपरी : पिंपरी कॅम्पात विविध मोबाईल कंपन्या व व्यावसायिकांनी अनधिकृतपणे लावलेल्या जाहिरात फलकांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने मंगळवारी (ता. 4) सायंकाळी धडक कारवाई केली. 
शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पातील साई चौक, शगुन चौक, आर्यसमाज चौक, कराची चौक आदी भागात विविध मोबाईल व इलेक्‍ट्रॉनिक कंपन्यांनी महापालिकेची जाहिरात लावण्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात फलक व मोठमोठे होर्डिंग लावले होते. त्यात बाजारात नवीनच आलेल्या मोठ्या परदेशी मोबाईल कंपन्यांचा समावेश आहे. या मोबाईल कंपन्या संबंधित दुकानमालकाला लाखो रुपये भाडे देऊन विद्युत रोषणाईचे जाहिरात फलक लावत असत. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत होता. तर परिसरात बकालपणा वाढला होता. अशा प्रकारचे बेकायदा जाहिरात फलक बाजारपेठेत अनेक वर्षापासून लावले जात असून त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करत होते. मात्र अशा फलकांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या वाढल्याने प्रशासनाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात मंगळवारी अचानक ही कारवाई केली.

Graft complaint against PCMC: Complainant was instigated by NCP, has criminal record, alleges BJP

A DAY after the Ajit Pawar-led NCP demanded that Chief Minister Devendra Fadnavis launch a probe into allegations of corruption against BJP-ruled Pimpri-ChinchwadMunicipal Corporation (PCMC), the BJP hit back, alleging that the complainant was ...

पिंपरी-चिंचवड : नियोजनशून्य कारभारामुळे वैद्यकीय सेवेचे 'तीनतेरा'

नियोजनशून्य कारभारामुळेच केसपेपर काढणे असो की औषधवाटप विभाग असो, सगळीकडे रुग्णांच्या नातेवाइकांच्या लांब रांगा लागलेल्या असतात. 'रुग्णसेवा' वाऱ्यावर; फक्त नफेखोरी अन् भ्रष्टाचाराचे कुरण. स्वस्तातील व खात्रीशीर उपचारांमुळे ...

पिंपरी पालिकेचे लवकरच 'टॉयलेट लोकेटर' अ‍ॅप

पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छतागृहे व शौचालयांची संख्या अडीच ते तीन हजारांपर्यंत असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. ही माहिती 'गुगल मॅप'वर टाकण्यात येणार आहे. तत्पूर्वी, महापालिकेच्या वतीने रीतसर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. भारतीय ...

वेस्ट टू एनर्जी’ला अखेर मुहूर्त!

कंपन्यांनी नोंदविल्या सूचना ः पंधरा दिवसांत निविदा होणार प्रसिद्ध
पिंपरी,  (प्रतिनिधी) – मोशी कचरा डेपो येथे शहरातील दैनंदिन संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रीया करून “वेस्ट टू एनर्जी’ हा अत्याधुनिक प्रकल्प राबविण्यासाठी ठेकेदार मिळत नसल्यामुळे प्रकल्प कागदावरच रखडला आहे. तब्बल दीड वर्षाचा कालावधी उलटला, तरी हा प्रकल्प राबविण्याच्या हालचाली होत नाहीत. परिणामी, प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु, हा प्रकल्प राबविण्यासाठी पर्यावरण विभागाने गती घेतली आहे. येत्या 15 दिवसांत कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

ताबा असणाराच जागेचा मालक - माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील

पिंपरी - ‘‘सरकार दरबारी ज्याच्याकडे जागेचा ताबा असतो, तोच जागेचा मालक असतो. सध्या रिंगरोडच्या जागेचा ताबा तुमच्याकडे असल्याने तुम्हीच जागेचे मालक आहात. आपला हा मालकीहक्‍क शाबूत ठेवण्यासाठी होणाऱ्या संघर्षाला तयार राहा,’’ असे आवाहन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले.

पिंपरीतील वर्तुळाकार मार्गाला वाढता विरोध

जवळपास ७०० कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात येणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील ३० किलोमीटरच्या वर्तुळाकार मार्गावर (रिंगरोड) झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिका व प्राधिकरणाने ...

पीएमपीएमएलच्या अनुदानीत पास योजनेला सुरवात

येत्या 5 जुलैपासून अर्ज वाटपाला सुरवात; पीएमपीएमएल प्रशासनाची माहिती
पुणे – शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांच्याकडून देण्यात येणारे अनुदानित पास वितरण येत्या 5 जुलै पासून करण्यात येणार आहे. अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली.

[Video] पालिकेतील पराभवानंतर पहिल्यांदाच अजितदादा पिंपरीत येणार !


भाजपच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना धरले वेठीस

जयहिंद शाळेचे विद्यार्थी : वन मंत्र्यांच्या विलंबाने पाच तास ताटकळली मुले
पिंपरी – पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फॉर्म जागेवर महापालिकेकडून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 3) करण्यात आला. मात्र, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे कार्यक्रम स्थळी दोन ते अडीच तास उशिरा आले. त्यामुळे दुपारचा कार्यक्रम सुरु होण्यास दोन तास विलंब झाला. मात्र, कार्यक्रम स्थळी दुपारी 2 वाजता आणून बसविलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम संपेपर्यत तब्बल पाच ताटकळत ठेवण्यात आले. भाजपच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना दुपारपासून वेठीस धरण्यात आल्याने उपस्थित नागरिकांतून संताप व्यक्‍त केला जात होता.