Tuesday, 14 May 2013

पिंपरीत पहिल्या महिन्यात एलबीटीचे ३० कोटी उत्पन्न

पिंपरीत पहिल्या महिन्यात एलबीटीचे ३० कोटी उत्पन्न: जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्यानंतरपिंपरी महापालिकेला पहिल्याच महिन्यात ३० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.

PCMC traders firm on rally plan

PCMC traders firm on rally plan: The police have denied permission to traders in Pimpri Chinchwad city to conduct public meetings or to take out rallies to protest against local body tax (LBT) on Monday.

चाकण, राजगुरूनगर गजबजले!

चाकण, राजगुरूनगर गजबजले!: - व्यापार्‍यांच्या बंदमुळे पुणे, पिंपरीच्या ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
राजगुरूनगर। दि. १३ (वार्ताहर)

एलबीटीमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ग्राहक किराणा-भुसारसारख्या अत्यावश्यक मालाच्या खरेदीसाठी राजगुरुनगरपर्यंत येऊ लागले आहेत. एलबीटीविरोधात आंदोलनामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमधील दुकाने बंद असल्याने ग्राहक चाकण-राजगुरुनगरपर्यंत येऊ लागले आहेत. कापड, भांडी किंवा इतर नित्योपयोगी वस्तूंच्या खरेदीकरिता ग्राहक संप मिटण्याची वाट पाहत आहेत.; पण किराणा भुसार मालाची- ज्यामध्ये गहू-ज्वारीसारखी धान्ये, डाळी, तेल-मीठ, मसाले, साबण इत्यादी गोष्टी येतात- त्यासाठी लोक आता चाकणला आणि त्यापुढे राजगुरुनगरलाही येऊ लागले आहेत. राजगुरुनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने आणि अनेक उपविभागीय कार्यालये येथे असल्याने पुण्याहून गावात रोजच्या रोज येणार्‍या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. बँका, एलआयसी विमा कंपन्या इत्यादी आस्थापनांमध्येही पुणे-चिंचवड परिसरातून येणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे. ते जाताना राजगुरुनगरमधून किराणा माल घेऊन जात आहेत. याचबरोबर, ज्यांच्याकडे लग्नकार्य आहे, असेही लोक इकडे येत आहेत, असे संदेश भनसाळी या किराणा व्यापार्‍याने सांगितले.


दागिन्यांसह मोटारीची चोरी

दागिन्यांसह मोटारीची चोरी: पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)

घरफोडी करणारे, वाहन चोरी करणारे, भुरट्या चोर्‍या करणारे असे चोरट्यांचे वर्गीकरण पोलिसांकडून केले जात असले तरी काही चोरटे अशा सगळ्याच चोर्‍यांमध्ये कुशल असतात. घरफोडी करण्यासाठी कडी कोयंडा तोडणार्‍या एका चोरट्याने तेथील ऐवज चोरतानाच कपाटातून मोटारीची चावीही चोरली. याच चावीच्या मदतीने त्याने दागिन्यांबरोबरच मोटारही चोरून नेली. निगडीतील प्राधिकरणात हा प्रकार घडला.

महेश त्रिंबकराव सोमनाथे (४१, रा. साई घरौंदा अपार्टमेंट, प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी सव्वा चार ते सायंकाळी सव्वा पाच दरम्यान त्यांचे घर बंद होते. चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील साडे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, तसेच मोटारीची चावीही चोरली. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली मोटार क्र. एमएच १४ डीए ७२९२ चोरून नेली. साडे तीन लाखांचा ऐवज चोरल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

महापालिका कर्मचार्‍यांच्या सात तक्रारी दाखल

महापालिका कर्मचार्‍यांच्या सात तक्रारी दाखल: पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)

लोकशाही दिनाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांच्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी कर्मचारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्य प्रशासकीय इमारतीत आज झालेल्या कार्यक्रमास सहायक आयुक्त आशा दुर्गुडे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.

क प्रभागाशी संबंधित ३ तर, क्रीडा विभाग, दूरसंचार विभाग, अ प्रभाग विद्युत आणि विद्युत मुख्य कार्यालयाशी संबंधित प्रत्येकी एक तक्रारी आज प्राप्त झाल्या. कर्मचार्‍यांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहआयुक्त पी. एच. झुरे यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय कर्मचारी तक्रारी निवारण समितीची स्थापना झाली आहे. सदस्य म्हणून सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे, आशा दुर्गुडे, विशेष अधिकारी सुभाष माछरे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांचा समावेश असून, सचिव म्हणून इंदलकर काम पाहत आहेत. महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात तक्रारी स्वीकारल्या जातात.

थर्मोकोल प्रकल्प फाईल बेपत्ता

थर्मोकोल प्रकल्प फाईल बेपत्ता: पिंपरी । दि. १३ (प्रतिनिधी)

थर्मोकोलवर प्रक्रिया करण्यासाठीच्या प्रकल्पाची फाईल महापालिकेला १0 वर्षांपूर्वी सादर केली होती. महापालिकेच्या विविध विभागांत चौकशी करूनही या फाईलचा ठावठिकाणा लागत नाही. याबाबत प्रशासनाच्या या बेजबाबदारपणावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे करण्यात आली आहे.

फुकटात उपलब्ध कच्चा माल व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महिलांना करण्यायोग्य असा पुनर्निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची योजना तयार केली, पण त्यात काही भांडवली गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अनुभवी व्यक्तीच्या शोधात थोडा वेळा गेला. राजकारणी नेतृत्वास आर्थिक उलाढालीची कल्पना आली, तेव्हा या प्रकल्पाची सुरुवात नागरवस्ती विभागातर्फे महिला उद्योग नावाने करण्यात आली. त्यासाठी महिला गटाच्या नावे योजना, सरकारी कर्ज, महापालिका अनुदान, खास सवलती, प्रशासनाची सहानुभूती व राजकीय पाठबळ होते, असे पर्यावरण विषयक काम करणारे विकास पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

मॉलच्या ग्राहकांत दुपटीने वाढ


मॉलच्या ग्राहकांत दुपटीने वाढ

from Esakal 

पिंपरी -&nbsp 'एलबीटी'विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या "बंद'मुळे घाऊक तसेच किरकोळ दुकानेही बंद राहिल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी मॉलला पसंती दिली आहे.

भूखंड विक्री करताना मागासवर्गीयांसाठी आरक्षण


भूखंड विक्री करताना मागासवर्गीयांसाठी आरक्षण

from Esakal 

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने निवासी सदनिका आणि भूखंड विक्री करताना मागासवर्गीयांसाठी आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पवार यांनी सोमवारी दिली.

1,500 hectares under DAD Red Zone

1,500 hectares under DAD Red Zone: Talawade, Chikhali, Mamurdi, Kiwale, Dehu areas hit; no word on over 8,000 new constructions.

आयुक्त -अधिकार्‍यांचा पत्रव्यवहार आता ’ई-मेल’ द्वारे !

आयुक्त -अधिकार्‍यांचा पत्रव्यवहार आता ’ई-मेल’ द्वारे !
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

व्यापा-यांचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

व्यापा-यांचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

मुस्लिम कार्यकर्त्याने लावून दिला 226 हिंदु भगिनींचा विवाह

मुस्लिम कार्यकर्त्याने लावून दिला 226 हिंदु भगिनींचा विवाह
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com

International Nurses Day celebrated at YCMH

International Nurses Day celebrated at YCMH: PUNE: The Yashwantrao Chavan Memorial Hospital (YCMH) celebrated 'International Nurses Day' on Sunday, with around 250 nurses from Pimpri-Chinchwad participating in various programmes.