The Pune Metro all set to be become the first major infrastructure project in Maharashtra to incorporate Rainwater Harvesting (RWH) systems in its stations and along its route.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 5 November 2018
सर्वाधिक विनातिकीट मुली, महिला!
शहरातील सार्वजनिक बसद्वारे प्रवास करणार्यांमध्ये सर्वाधिक फुकट्या महिला आणि मुली असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली. दरदिवशी जवळपास 30 ते 35 महिला आणि मुली विनातिकीट प्रवास करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
रा.स्व.संघातर्फे शहरात 5 ठिकाणी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन
एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रकाशपर्व साजरे करण्याकरिता शहरातील विविध भागात पाच ठिकाणी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत “तमसो मा ज्योतिर्गमय” हा संदेश देणाऱ्या दीपावली सणाचे विशेष महत्व आहे.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान
एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई पर्व दुसरे यातील पाचवा आठवडा केजुबाई घाट थेरगांव येथे पार पडला. आज (रविवारी) पाच ट्रक भरून जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली. मागील वर्षी पहिल्या पर्वात सलग 215 दिवस केलेल्या कामाचा सुयोग्य परिणाम पवना नदीवर दिसत आहे. त्यामुळे आजवर नदीपात्रावर जलपर्णी आलेली नाही.
महिंद्राच्या 403 कामगारांसाठी दिवाळी धमाका
भोसरी : लॉजिस्टिक उद्योगक्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढीचा ऐतिहासिक करार महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. आणि स्वाभीमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात करण्यात आला. कामगारांना आगामी साडेतीन वर्षांसाठी दहा हजार रुपयांची पगारवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे, संघटनेच्या प्रयत्नांमुळे तब्बल 403 कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे सल्लागार आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवडकरांची यंदा स्वरमयी दिवाळी
पिंपरी : पिंपरी-चिंचवडवासियांची दिवाळी यंदाची फराळ आणि खरेदीबरोबरच अधिकाधिक स्वरमयी करण्यासाठी विविध संस्थांनी दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्यावतीने सुगम संगीत, भक्ती संगीत व भाव गीतांच्या स्वर गंधार या सुरेल कार्यक्रम दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. सोमवार दि. 5 नोव्हेंबरला सकाळी साडे पाचवाजता शिवतेजनगर श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आयोजन केले आहे.
'हायपरलूप'साठी आणखी एक पाऊल
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने हाती घेण्यात आलेल्या पुणे- मुंबई दरम्यानच्या "हायपरलूप' प्रकल्पास राज्य सरकारने "सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प' म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर शासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी व्यवहार सल्लागार यांची नियुक्ती करण्यासही पीएमआरडीएला मान्यता दिली आहे. यामुळे आतापर्यंत केवळ चर्चेत असलेला हायपरलूप प्रकल्प राबविण्यासाठीचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.
फटाक्यांची वेळ पाळा; तुरुंगाची वारी टाळा !
पुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर सणासुदीच्या काळात तुरुंगामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्व यंत्रणा सोमवारपासून (ता. 5) सक्रिय होणार आहेत.
दिवाळी बाजारपेठेत प्लास्टिक बंदीला हरताळ
पिंपरी – पर्यावरण प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. मात्र लागू केलेल्या प्लास्टिक बंदीला पिंपरी-चिंचवड येथील व्यापाऱ्यांनी हरताळ फासला आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमधील खरेदीच्या लगबगीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा साठा पुन्हा बाहेर ठेवला आहे. एवढेच नव्हे तर रांगोळी स्टिकरपासून ते आकाश कंदिलापर्यंत सारे काही प्लास्टिकचे साहित्य असल्याचे पहायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा फुसका बार
पिंपरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ना त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत खमकी भूमिका घेतली ना शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत ठोस भूमिका मांडली. त्यांच्या भुमिकेमुळे पिंपरी-चिंचवडकरांच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांचा ऐन दिवाळीतील दौरा मात्र फुसका बार ठरला आहे.
5 पोलिस अधिकार्यांची गुन्हे शाखेत बदली
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस उपनिरीक्षकांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी रात्री काढले आहेत. प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीनुसार पोलिस अधिकार्यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
कामगारांच्या प्रश्नांसाठी मी स्वत: रस्त्यावर उतरणार : शरद पवार
रहाटणी : कामगारांच्या विविध मागण्यांसाठी दि. ८ व ९ जानेवारीला कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये कामगारांच्या प्रश्नांसाठी मी स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
रहाटणी येथील कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने रहाटणी येथील थोपटे लौन्स येथे कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कामगार परिषदेचे उदघाटन किमान वेतन सल्लागार मंडळांचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते
जगताप, लांडगेंपेक्षा राष्ट्रवादीकडे भारी उमेदवार!
पिंपरी (Pclive7.com):- सत्तेसाठी राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले उद्या आमची सत्ता आल्यावर कुठून कुठे उड्या मारतील? हे सगळा महाराष्ट्र पाहणार आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच संधी देण्यात येईल. आमच्याकडे जगताप आणि लांडगेंपेक्षा ताकदीचे उमेदवार आहेत, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
महेशदादांनी दंड थोपटले.. आखाड्यात उतरलो तर एकालाही सोडणार नाय!
पिंपरी (Pclive7.com):- पाठीमागे “व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी” कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भाजपात सामावून घेतलं. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण “भाऊ” जगताप यांना मी सांगितलं होतं. मी जातीवंत पैलवान आहे. भोसरीतल्या मातीशी निगडीत माणूस आहे. एकदा तुम्ही पाठीवर थाप मारली, आणि मी आखाड्यात उतरलो, तर एकालासुध्दा सोडणार नाही. म्हणुनच, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा एकसुध्दा नगरसेवक निवडून येऊ दिला नाही. विरोधकांना याच मातीत पहिल्याच डावात चितपट केले, अशा शब्दांत भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे यांनी शिरूरचे खासदार आढळराव पाटील यांच्यावर निशाना साधला.
‘दिघीतील ‘त्या’ स्वच्छतागृहाची लिमका, गीनिज बुकमध्ये नोंद घ्या’
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दिघी येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून सहा महिने पूर्ण झाले. परंतु, अद्यापही दोन्ही स्वच्छतागृहावर स्त्री किंवा पुरुषासाठी कोणते स्वच्छतागृह असा उल्लेख केला नाही किंवा चित्र लावले नाही. त्यामुळे महापालिका काय पोस्टर बॉईज, पोस्टर गर्लचा शोध घेत आहे काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष वाळके यांनी केला आहे.
कस्पटे चौकाजवळ मुळा नदीवरील पुलासाठी निविदा प्रसिद्ध
एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने बालेवाडी ते वाकड, कस्पटे चौक दरम्यान सर्व्हे क्रमांक 46/47 जवळ मुळानदीवर पूल बांधण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. याठिकाणी पूल उभारण्यासंदर्भात प्रभाग क्रमांक 26, वाकड-पिंपळेनिलखचे भाजप नगरसेवक संदीप कस्पटे यांनी पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
‘पालकमंत्री फिरकत नाहीत, शहराला कोण वाली नाही, आयुक्त हतबल’
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष आहे. पालकमंत्री शहरात फिरकत नाहीत. पिंपरी-चिंचवडला कोणी वालीच राहीला नाही. तर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हतबल झाले आहेत, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी केला. तसेच लाल दिवा, महामंडळासाठी एकडून तिकडे उड्या मारणा-या बेडकांना भाजपने अद्यापही काहीच दिले नाही. केवळ गाजर दाखविले.
चार वर्षाचा हिशोब मागणा-यांनी 15 वर्षात काय केले – महेश लांडगे
एमपीसी न्यूज – गेल्या चार वर्षात मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांबाबात विधानसभेत वेळोवेळी आवाज उठविला. अनेक प्रश्न मार्गी लावले. पण 15 वर्षात काहीच काम न केलेले लोक मला गेल्या चार वर्षातील कामाचा हिशोब मागत आहेत. निवडणूक जवळ येऊ द्या. माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे.
बांधकाम क्षेत्राला पुण्यात 'अच्छे दिन'
पुणे : सरकारने नोटाबंदी, महारेरा आणि जीएसटी अशा एकापाठोपाठ घेतलेल्या निर्णयामुळे घर व जमीन खरेदी-विक्रीत चढ-उतार निर्माण झाला होता. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घर, जमीन खरेदीच्या दस्त नोंदणीत सातत्याने चांगली वाढ होत आहे. तसेच दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी-विक्री व्यवसायात तेजी आहे. या आर्थिक उलाढालीमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये आश्वासक चित्र निर्माण झाले असून बांधकाम क्षेत्रातील अनिश्चितता संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे.
मोदींचे समर्थकच मावळ, शिरूरचे खासदार: मुख्यमंत्री
पिंपरी : "मावळ व शिरूरमधून तेच खासदार जातील, जे मोदींना पाठिंबा देतील,'' अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या आधीच्या वक्त्यांनी मात्र, शिवसेनेचे खासदार असलेल्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढविण्याची मागणी केली होती.
“लालपरी’कडे पाठ अन् खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट
पिंपरी – आरक्षणाला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने वल्लभनगर आगाराने एस. टी. च्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर दुसरीकडे रात्रीच्या वेळी धावणाऱ्या खासगी बस सोईच्या ठरत असल्याने प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहेत. प्रवाशांची गैरसोय पाहून खासगी वाहनांकडून प्रवाशांची अव्वाच्या-सव्वा प्रवासी भाडे आकारुन लूट करण्यात येत आहे.
शिक्षण समितीकडून 96 शाळांची पाहणी
पिंपरी – महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीतर्फे सुरु केलेला “शाळा भेट’ हा उपक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. शहरातील महापालिकेच्या 105 शाळांपैकी 96 शाळांना या उपक्रमांतर्गत भेट देण्यात आलेल्या आहेत.
खोत, लोणकर यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी संदीप खोत आणि मनोज लोणकर यांना बढती देण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी महापालिका आस्थापनेवर प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 4 ऑक्टोबरला झालेल्या महापालिका पदोन्नती समितीच्या बैठकीत या बढत्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
मनस्वी मगरची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
चिंचवड- जुन्नर (वेल्हा) येथे पार पडलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत चिंचवड येथील पोद्दार स्कूलची खेळाडू मनस्वी मगर हिने उत्कृष्ट प्रदर्शन केले. या प्रदर्शनाच्या जोरावर मनस्वीचे हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत अहमदनगर, सोलापुर व पुणे विभागातून एकूण 200 मुले अणि मुलींनी सहभाग नोंदवला होता.
बेकायदेशीर फटाका स्टॉल्सवर कारवाईची मागणी
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विना परवाना बेकायदेशीर रित्या फटाका स्टॉल्स उभारण्यात आले आहेत, या स्टॉल्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय गणराज्य पार्टीच्या वतीने करण्यात आली.
पार्टीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये फटाका विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारण्यात आले आहेत.
पार्टीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये फटाका विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारण्यात आले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)