पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड ते नाशिकफाटा मार्गावर राबविण्यात येत असलेल्या बीआरटीएस मार्गाला गती देण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी आज अधिका-यांना दिले. शहराचे सौंदर्यीकरण करून शहर स्वच्छ व हरित ठेवणेबाबत तसेच शिवार चौकाचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.
रस्ते पाहणी दौ-यांतर्गत आयुक्त जाधव यांनी 'क' व 'ड' क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मुख्य रस्त्यांची पाहणी केली. सहआयुक्त पांडुरंग झुरे, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता प्रमोद ओंभासे, क्षेत्रीय अधिकारी दत्तात्रय फुंदे, कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, सहायक आरोग्य अधिकारी विनोद बेडाळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.