Saturday, 25 August 2012

पिंपरी-चिंचवडमध्ये 'विधानसभेच्या वारी'चा उत्साह

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32671&To=9
पिंपरी-चिंचवडमध्ये 'विधानसभेच्या वारी'चा उत्साह
पिंपरी, 24 ऑगस्ट
एबीपी-माझाची 'वारी विधानसभेची' आज पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाली. विधानसभेच्या वारक-यांचा अर्थातच शहरातील राजकीय मंडळींचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात शहरातील तसेच मावळातील आमदारांच्या गेल्या अडीच वर्षांतील कामाचा लेखा-जोखा मांडण्यात आला. विधानसभेच्या या वारीमागे नेत्यांच्या मोटारींची लांब लचक बारी लागली होती.

शहरातील बांगलादेशींची शोधमोहीम

शहरातील बांगलादेशींची शोधमोहीम: बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांची माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन पुणे- शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी गुरुवारी केले.

हॉटेलच्या चवीला महागाईचा तडका

हॉटेलच्या चवीला महागाईचा तडका: हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये १५ ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशनने शुक्रवारी घेतला. ही दरवाढ येत्या एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

११वी, १२ वी साठी पर्यावरण विषय सक्तीचा

११वी, १२ वी साठी पर्यावरण विषय सक्तीचा: पर्यावरणाविषयी जाणीवीचे ‍वाढते महत्त्व लक्षात घेत, महाराष्ट्र राष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून अकरावी आणि बारावीसाठी पर्यावरण शिक्षण हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. दोन्ही वर्षांमध्ये प्रत्येकी पन्नास गुणांसाठी हा विषय ठेवण्यात आल्याचे मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे.

मल्टिप्लेक्सला ८० कोटींचा ‘दणका’

मल्टिप्लेक्सला ८० कोटींचा ‘दणका’: करमाफी असताना शहरातील मल्टिप्लेक्स मालकांनी प्रेक्षकांकडून करमणूक कर व सेवाकरापोटी सुमारे ८० कोटी रुपये बेकायदा आकारल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवडला बंद पाईपलाईनद्वारे पाणी दिल्यास गावांची सिंचनक्षमता घटेल!

पिंपरी-चिंचवडला बंद ...:
जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचा अहवाल
प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराला बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरविले तर नदीतून वाहणारे पाणी आटेल. त्यामुळे परिसरातील गावांमधील सिंचनक्षमतासुद्धा घटेल, असा निष्कर्ष जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या अभ्यासगटातर्फे काढण्यात आला आहे.
Read more...

अनधिकृत बांधकामप्रकरणी िपपरीत ...

अनधिकृत बांधकामप्रकरणी िपपरीत ...:
आझम पानसरे यांच्या सहभागामुळे राष्ट्रवादीची पंचाईत
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या कारवाईविरोधात शिवसेनेच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या मोर्चाचे पुढे सर्वपक्षीय महामोर्चात रूपांतर झाले. या विषयावरून गेल्या काही दिवसांत वेगवेगळय़ा मुद्यांवर राजकारण रंगले असतानाच विरोधी पक्षाच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे व काही नगरसेवक मोर्चात सहभागी झाले आणि सत्तारूढ राष्ट्रवादीची चांगलीच पंचाईत झाली.
Read more...

पुण्यनगरीत पुन्हा धावणार ‘डबल डेकर’

पुण्यनगरीत पुन्हा धावणार ‘डबल डेकर’: पुणे। दि. २३ (प्रतिनिधी)

पुण्यातील प्रवासाचे खास आकर्षण असणारी ‘‘डबल डेकर’’ बस पुन्हा धावणार आहे. नव्याने विकसित झालेल्या उपनगरांमधील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ५0 डबल डेकर बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी दिला असल्याने काळाच्या पडद्याआड गेलेल्या डबल डेकरच्या सफरीचा आनंद पुणेकारांना पुन्हा एकदा घेता येणार आहे.

उपचाराअभावी नवजात मुलीचा मृत्यू

उपचाराअभावी नवजात मुलीचा मृत्यू: रहाटणी। दि. २३ (वार्ताहर)

जन्माला आलेले बाळ मुलगी आहे, हे समजताच निर्दयी माता-पित्यांनी डॉक्टरला उपचार करण्यास प्रतिबंध केला. उपचाराला उशीर झाल्याने नवजात मुलीचा १६ ऑगस्टला मृत्यू झाला. याप्रकरणी बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी काळेवाडीतील अँपेक्स रुग्णालयाच्या डॉक्टरसह, माता-पित्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हलगर्जीपणा केला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आशिष चव्हाण, शीतल चव्हाण अशी त्या माता-पित्यांची तसेच डॉ. दत्तात्रय गोपाळ घरे असे डॉक्टरचे नाव आहे. ज्ञानदेव चाईल्ड लाइन पुणे संस्थेच्या संचालिका डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

तर प्रथम महापौरांवर कारवाई करा !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32666&To=5
तर प्रथम महापौरांवर कारवाई करा !
पिंपरी, 24 ऑगस्ट
बेकायदा बांधकामांवरील कारवाईला विरोध करणा-या नगरसेवकांवर कारवाई होणार असेल तर महापालिका सभेत पीठासनावरुन बांधकामांवरील कारवाई थांबविण्याचे आदेश देणा-या महापौरांवर प्रथम कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) केली. कारवाई विरोधातील मोर्चाला जनसामान्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून डोके फिरलेले सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधकांवर 'स्टंटबाजी'चा आरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सांगवी येथे 'पाडापाडी' कारवाईला सुरूवात

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32654&To=10
सांगवी येथे 'पाडापाडी' कारवाईला सुरूवात
सांगवी, 24 ऑगस्ट
सांगवीतील काटे पुरम चौकातील व्यावसायिक वापराच्या अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आज सकाळी (शुक्रवारी) कारवाई सुरु करण्यात आली. पोलीस बंदोबस्तामध्ये शांततेत ही कारवाई सुरु आहे.

महापालिका कर्मचा-यांसाठी 'तक्रार निवारण दिन'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32658&To=9
महापालिका कर्मचा-यांसाठी 'तक्रार निवारण दिन'
पिंपरी, 24 ऑगस्ट
नागरिकांसाठी आयोजित केल्या जाणा-या लोकशाही दिनाच्या धर्तीवर महापालिकेतील कर्मचा-यांसाठी तक्रार निवारण दिन सुरु करण्याचा अनोखा उपक्रम आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केला आहे. या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी सह आयुक्त अमृत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.

महापालिका क्रीडांगणाचे 'बुकींग'साठी आता 'जस्ट क्लिक' !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32655&To=6

महापालिका क्रीडांगणाचे 'बुकींग'साठी आता 'जस्ट क्लिक' !
पिंपरी, 24 ऑगस्ट
नागरिकांच्या सोईसाठी ई-गव्हर्नन्स अंतर्गत विविध ई-सुविधा उपलब्ध करुन देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता क्रीडांगणाच्या 'बुकींग'साठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यामुळे क्रीडा विभागाकडे खेटा न मारता आपल्या कार्यालयातून, घर बसल्या महापालिकेच्या क्रीडांगणांची नोंदणी करता येणार आहे.

पिंपरी चिंचवडमधील 'हॉटेलिंग' महागले !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32653&To=7
पिंपरी चिंचवडमधील 'हॉटेलिंग' महागले !
पिंपरी, 24 ऑगस्ट
पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल्समधील अन्नपदार्थांच्या किमतीत सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. 24) हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला. इंधन, फळे, भाज्या, धान्य तसेच इतर पदार्थांचे भावही वाढले आहेत त्यामुळे ही भाववाढ करण्यात आल्याचे हॉटेल अ‍ॅसोसिएशनच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे.

आकुर्डीत मर्सिडिस बेंझ मोटारीची रिक्षाला धडक, दोन जखमी

आकुर्डीत मर्सिडिस बेंझ मोटारीची रिक्षाला धडक, दोन जखमी

आकुर्डी येथील फोर्स मोटर्स कंपनीसमोर ग्रेड सेपरेटरमध्ये आज रात्री दहाच्या सुमारास एका मर्सिडिस बेंझ मोटारीने जोरदार धडक दिल्यामुळे रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात रिक्षातील दोघे जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

http://mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32644&To=1