Wednesday, 17 May 2017

Green-thumbed worker is PCMC’s pick to beautify Kasarwadi sewage plant

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) water treatment plant at Nigdi has a sprawling five-acre fruit orchard in its backyard — complete with 70 mango trees, 96 jamun trees, 80 jackfruit trees, 60 almond trees, several banyan trees and scores of medicinal plants — thanks to the untiring efforts of its pump operator, Vasudev Shirsat, for almost two decades.

“पारदर्शक’तेचा बुरखा फाटणार?

– पंतप्रधान, मुख्यमंत्र्याकडे तक्रार: 68 संस्थांचे ठेकेदार धरले वेठीस 
– भ्रष्टाचार मुक्‍त कारभाराला हरताळ
पिंपरी,  (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागातील रस्ते, गटार साफ सफाई, स्मशानभूमी सुरक्षा रक्षक आणि स्मशानभूमीच्या नवीन कामांच्या विषयांना मुदतवाढ न देता, ते विषय कित्येक दिवस तहकूब ठेवले आहेत. त्या कामाच्या रकमेनुसार 1.50 टक्के “कमिशन’ची मागणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने केल्याची ठेकेदारांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्टाचार मुक्‍त व पारदर्शक कारभाराला हरताळ फासला जात आहे. काही ठेकेदार या पदाधिकाऱ्याविरोधात मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडे दाद मागणार आहेत.

Under BJP-led PCMC, farmers shell out Rs 1000 per day to sell their mangoes

Under the blazing hot summer sun, mango farmers from Konkan, located 300 kilometres away, have landed in Pimpri-Chinchwad with dozens of the luscious yellow fruit. Local residents are arriving in droves to take their pick at the stalls, set up in the ...

पालिका शाळेतील साहित्य वेळेत मिळावे

पिंपरी - पालिका शाळेतील शिक्षण साहित्य वेळेत मिळावे, अन्यथा महापालिका आवारातच शाळा भरवून अभिनव पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेने मंगळवारी (ता. 16) दिला. संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले. 

अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड

निगडी - पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. गोंधळाची परिस्थिती नियोजन नसल्याने निर्माण झाली होती. गैरसोय आणि ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांनी अर्ज दाखल करण्याचे काम काही वेळ बंद पाडले.

‘एचए’ जमीन लिलाव प्रक्रिया सुरू

पिंपरी - हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स लिमिटेड या कंपनीच्या सुमारे ८७.७० एकर अतिरिक्‍त जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही जमीन फक्‍त सरकारी उपक्रमांनाच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने ही जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एमएसटीसी लिमिटेड या सरकारी कंपनीची नियुक्‍ती केली आहे. येत्या ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. कंपनीला या जमिनीच्या विक्रीमधून एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम मिळणार आहे. 

एच. ए.च्या भूखंड विक्रीला “ग्रीन सिग्नल’ !

केंद्र सरकारचा निर्णय : अन्य चार कंपन्यांच्या भूखंडांचीही विक्री 
पिंपरी,  (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने पिंपरीतील हिंदुस्तान ऍण्टिबायोटिक्‍स लिमिटेड (एच.ए.) सह बेंगॉल केमिकल ऍण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (बी.सी.पी.एल.), इंडियन ड्रग्ज्‌ ऍण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (आय.डी.पी.एल.) आणि राजस्थान ड्रग्ज ऍण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (आर.डी.पी.एल.) या चार औषधनिर्माण सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त जमिनींची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अतिरिक्त जमीन केवळ शासकीय संस्थांनाच खरेदी करता येणार आहे.

तळवडेतील विद्युत वाहिनीच्या भुमिगतीकरणाची चौकशी करा

पिंपरी,  (प्रतिनिधी) – भोसरी विभागिय कार्यालयाअंतर्गत तळवडे-सहयोगनगर येथे उच्च व लघुदाब वाहिनीचे भुमिगतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी जमिनीत फक्त अर्धा ते एक फुट खोलीवर केबल टाकल्याने केबल खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी या कामाची चौकशी करावी आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ताथवडेतील शाळा महापालिकेकडे वर्ग करा

– शिवसेनेची मागणी 
पिंपरी, (प्रतिनिधी) – ताथवडेतील जिल्हा परिषद शाळा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

भाजपचे नगरसेवक आता पक्षविस्तारक

पिंपरी - भाजपचे 77 नगरसेवक आणि पदाधिकारी आता पक्षविस्तारक म्हणून काम करणार आहेत. पक्षाचे काम आणि सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून त्यांना हे काम करावे लागणार आहे. बूथनिहाय पक्षबांधणीसाठी शहर भाजपतर्फे आठवडाभरात ही मोहीम हाती घेण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी मंगळवारी दिली. 

‘स्वीकृत’ नावात कदापि बदल नाही

पिंपरी -  महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाने यापूर्वी दिलेलीच नावे कायम राहतील, त्यात कुठलाही बदल कदापि होणार नाही, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी (ता. १६) ‘सकाळ’ला दिली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्ष कार्यालयातील फलकावर काळे फासणारे आणि पुतळे जाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत, असेही साबळे यांनी सांगितले.

“किंग मेकर’साठी भाजपात संघर्ष

पदाधिकारी अस्वस्थ : कार्यकर्त्यांच्या उद्रेकाने पक्ष बदनाम 
अमोल शित्रे 
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर विजयी 77 नगरसेवकांच्या संख्या बळावर महापालिकेत सत्ता स्थापन केली. ही सत्ता आणण्यात खासदार, आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांचे योगदान आहे. मात्र, आता खरा “किंग मेकर’ कोण हे दाखवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर झाला असून मोठ्या प्रमाणावर दुफळी माजली आहे. त्याचे पडसाद स्वीकृत सदस्य निवडीनंतर उमटले. हा वाद चव्हाट्यावर आल्याने शहर भाजपची बदनामी झाली आहे.

शहरबात पिंपरी-चिंचवड : हेवेदावे, नव्या-जुन्यांचा संघर्ष पुन्हा चव्हाटय़ावर

चुकीच्या उमेदवारांच्या शिफारशी केल्याचा कांगावा करत भाजपचे खासदार अमर साबळे आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांचे पुतळे पक्ष कार्यालयासमोरच जाळण्यात आले आणि या नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासण्यात ...