Wednesday, 22 August 2018

राहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास

राहण्यायोग्य शहराच्या सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा क्रमांक तब्बल 69 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. मात्र, शेजारच्या पुणे शहराने या सर्वेक्षणात क्रमांक एकचे स्थान मिळविले आहे. शहर पिछाडीवर पडण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे, असा खुलासा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.21) केला.

राहण्यायोग्य शहर सर्वेक्षणातील पिछाडीचा शोध सुरू; आयुक्त हर्डीकर करताहेत सखोल अभ्यास

राजकीय गुंडांच्या मुसक्या आवळा


रेल्वे प्लॅटफॉर्मवर नव्या सुधारणा

पिंपरी – वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वेकडून डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. प्रवाशांना रेल्वेत चढ-उतार करणे सुलभ व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर ते लोणावळादरम्यानच्या सर्व स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये या कामाला सुरवात होणार असून, पुढील दीड वर्षात ते पूर्ण करण्यात येणार आहे. सुटीच्या कालावधीत या गाड्यांना मोठी गर्दी असते.

[Video] रोज ५५ रुपयांची बचत करा आणि १० लाखांचा विमा मिळवा, पोस्ट ऑफिसची ही नवीन ऑफर तुम्हाला कळली का?


रोग एक, उपाय भलताच; पिंपरी महानगरपालिकेचा अजब कारभार

पिंपरीः पिंपरी-चिंचवडमधील त्यातही भोसरीत पालिकेच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर भाजप सत्ताधारी महापालिकेने कारवाई केली नाही, तर त्याविरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळरावदादा-पाटील यांनी दिला आहे.

शहरबात : नद्यांची झाली गटारे जबाबदार कोण?

नद्यांचे प्रदूषण हे पिंपरी-चिंचवडचे जुने दुखणे आहे.

वर्षभरात प्राधिकरणाने 350 अतिक्रमणे हटवली

पिंपरी – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करून या वर्षात 350 अतिक्रमण हटवण्यात आली आहेत. प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून 32 हजार स्क्‍वेअर फूट क्षेत्र ताब्यात घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वर्षा पवार यांनी दिली.

रस्ता एक किलोमीटर; खड्डे २६

वाल्हेकरवाडी - रावेत-वाल्हेकरवाडी मुख्य रस्त्याची पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली. अवघ्या एक किलोमीटरमध्ये तब्बल २६ खड्डे पडले आहेत. अशा खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे जात असून, लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

पिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे

पिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र शहरातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळाले. श्रावण महिन्याला सुरवात झाल्यापासून अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी पडत होत्या. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

खोदा, बुजवा आणि पुन्हा खोदा!

सांगवी – पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे विद्यमान नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे अद्यापही सुरूच आहेत. विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली रस्ते खोदाई अद्याप जैसे थे आहे. ही कामे पूर्ण करायची सोडून पिंपळे गुरवमधील महत्त्वाच्या सर्वच रस्त्यांवर अजूनही खोदाई सुरूच आहे. जे खड्डे बुजवले होते, ते पुन्हा खोदण्यात आले आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये पिंपळे-गुरव परिसरातील रस्ते सात ते आठ वेळा खोदण्यात, बुजवण्यात आणि पुन्हा खोदण्यात आले आहेत.

देहू रस्त्यावरील खड्ड्यांची महापौरांकडून पाहणी: तात्काळ बुजविण्याच्या सूचना

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत देहूच्या प्रवेशाव्दारापर्यंतच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याची पाहणी महापौर राहूव जाधव यांनी मंगळवारी (दि.२१) केली. तसेच, महापालिका अधिका-यांना या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या.

निगडीतील बीआरटी टर्मिनलचे शुक्रवारी उद्घाटन: आयुक्त हर्डीकरांची माहिती

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीएलच्या वतीने दापोडी ते निगडी बीआरटीएस मार्ग अखेर शुक्रवारी (दि.24) सुरू करण्यात येणार आहे. तसेच, निगडी येथील बस टर्मिनसचे उद्घाटनही करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.21) दिली.

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे, रस्ते, पूल पाण्याखाली जाऊ शकतात. अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले असून नागरिकांनी या केंद्राशी संपर्क साधावा असे, आवाहनही त्यांनी केले.

केरळ पूरग्रस्तांसाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचा मदतीचा ओघ

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली असून पूरग्रस्तांसाठी देशभरांतून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

सहा महिन्यांपासून चिखली अग्निशमन केंद्र रखडले…

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : स्थापत्य-अग्निशमन विभागाची टोलवाटोलवी
चिखलीतील वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या भागात अग्निशमन उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. मागील सहा महिन्यांपासून अधिकाऱ्यांकडून आठवडा, पंधरा दिवसात केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या स्थापत्य व अग्निशमन विभागाच्या नियोजनाअभावी हे केंद्र रखडले आहे. तर, परिसरातील लोकप्रतिनिधींकडून उपकेंद्र सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत आहे..

पिंपरी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई

निगडी दापोडी बीआरटी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पिंपरीतील खराळवाडीत, तसेच वडमुखवा़डी, मोशीत अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण अपूर्णच

प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला स्वारस्य नाही

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चार वर्षापूर्वी हाती घेतलेल्या फेरीवाल्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण होत असून, ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर

पुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली "टेनंट' ही सुविधा महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. दुसरीकडे ऑफलाइन नोंदणी करावी, अशी मागणी करणाऱ्या नागरिकांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

उद्योगांपुढे खंडित विजेचा प्रश्‍न - महेश लांडगे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली आहे. 

चिंचवड ते रायगड सायकल वारी

वाकड – पिंपरी-चिंचवड शहरातील उच्च शिक्षित तरूण-तरुणींनी चिंचवड ते रायगड 135 किलो मीटर सायकल रॅली काढली. हंटर्स ट्रेकिंग अँड सोशल क्‍लबकडून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये क्‍लबच्या विविध वयोगटांतील 50 तरुण-तरुणींनी स्वत:हून सहभाग नोंदवला होता. सकाळी पाच वाजता थेरगावमधील डांगे चौक येथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रणाम करून रॅलीला सुरुवात झाली. हिंजवडी, माण, पिरंगुट, पौड, ताम्हिणी घाट, निजामपूर मार्गे मुसळधार पावसात अवघड, चढ-उतार पार करत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत रॅली रायगडावर पोहचली. रायगडच्या पायथ्यास राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळी नममस्तक होऊन सायंकाळच्या वेळेस रॅलीची सांगता करण्यात आली.

महा-वितरणच्या गलथान कारभाराने नागरिक त्रस्त

चिंचवड – सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने नागरिक त्रासले आहेत. व्यवस्थित सेवा न देणाऱ्या महा-वितरणाने मात्र भरमसाठ बिले नागरिकांच्या माथी मारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून महा-वितरणाच्या बिलांमध्ये गडबड होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः चिंचवड परिसरात ही समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याने नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

‘आधार’साठी आता चेहरा ठरणार महत्त्वाचा

चौफेर न्यूज – आधार कार्डची अंमलबजावणी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता व्यक्तीची ओळख प्रमाणित करण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे. याची सुरूवात सिम कार्ड खरेदी प्रक्रियेपासून सुरू केली जाणार आहे. यासाठी प्राधिकरण सर्व मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने १५ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू करणार आहे.