Thursday, 25 January 2018

रस्ते कामात भ्रष्टाचार, खोटारडे कोण ? भाजपला शिवसेनेचा सवाल 

पिंपरी ः भाजपच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सव्वाचारशे कोटी रुपयांच्या रस्तेकामात नव्वद कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या खासदारांनी नुकताच केला. त्यावर शिवसेनेचे खासदार खोटे बोलत असल्याचे महापौर नितीन काळजे काल म्हणाले. दरम्यान, या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजपच्याच खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समोर आले. त्यामुळे कोण खोटारडे अशी विचारणा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केली.

[Video] प्रेरणा बँकेचे स्वच्छता अभियान!

प्रेरणा बँकेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त थेरगाव,डांगेचौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानाचे उदघाटन पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

[Video] पिंपरी चिंचवड । पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट

निगडीपर्यंत मेट्रोसाठी नागरिकांनी सुरु केली मिस्ड कॉल मोहीम 08030636448

२६ जानेवारीला फडकणार सर्वात उंच राष्ट्रध्वज; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महापौरांचे आवाहन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक १०७ मिटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी १० वाजता भक्तीशक्ती येथे होणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

PCMC to provide 6k litres free water

Pimpri Chinchwad: The standing committee has approved a resolution to give free drinking water up to 6,000 litres per connection from April 1, 2018, chairperson Seema Savale said.

“पीसीएमसी’करांना पिण्याचे पाणी “मोफत’

पिंपरी – “उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी सत्ताधारी भाजपाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. शहरातील नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला महिन्याला सहा हजार लीटर पिण्याचे पाणी मोफत देण्यात येणार आहे. याचा जवळपास एक लाख कुटुबियांना फायदा होईल. त्यासाठी केवळ 200 रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल. दि. 1 एप्रिल 2018 पासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.

जिल्हा रुग्णालयातील “एआरटी’मध्ये कचऱ्याचा ढिग

पिंपरी – जिल्हा रुग्णालयात “एआरटी’ सेंटरमध्ये कचऱ्याचा ढीग लागला आहे. त्याचा त्रास येणाऱ्या रुग्णांना होत आहे. त्याबाबत नागरिकांनी तक्रार केली आहे, तरी देखील रुग्णालयीन प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ते रुग्णांच्या जिवावर बेतत आहे.

अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवा!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामावरील कारवाई तात्काळ थांबवावी. राज्य शासनाने घेतलेल्या बांधकाम नियमितीकरणाच्या निर्णयाला मूर्त स्वरुप येईपर्यंत कारवाई बंद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.