Saturday, 7 October 2017

स्थानिक नेतृत्व #पिंपरीचिंचवडफर्स्ट असा विचार कधी करणार?

When will govt/local leadership start thinking for#PimpriChinchwadFirst? When can we come out of Pune's shadow? When can city with 22+ lac population get dues it supposed to get as a seperate city? आपले सरकार/स्थानिक नेतृत्व #पिंपरीचिंचवडफर्स्टअसा विचार कधी करणार? आपण पुण्याच्या छायेतून बाहेर कधी पडणार? 22 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्याच्या या शहराला वेगळे शहर म्हणून ज्या गोष्टी मिळणे क्रमप्राप्त आहे त्या कधी मिळणार?

प्रशासकीय कार्यालयांना मुहूर्त कधी?

विविध कामांसाठी पुण्यात खेटा : तगडा महसूल देवूनही उपेक्षा कायम
सूरज व्यास 
पिंपरी – दोन दशकांपूर्वी लाखों रुपये करातून उत्त्पन्न देणारे पिंपरी-चिंचवड शहर या दोन दशकांत प्रचंड वेगाने विकसित झाले. आज हे शहर सरकारी तिजोरीमध्ये हजारो कोटी रुपये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून देत आहे. परंतु, या उद्योग नगरीच्या नशिबी मात्र उपेक्षाच आहे. एवढा महसूल देऊनही शेजारी असलेल्या पुणे शहरावर विसंबून ठेवण्यात आले आहे. उद्योग आणि व्यवसायांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी प्रशासकीय कार्यालये पिंपरी-चिंचवड शहरात नाहीत. यासाठी व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांना पुण्यात जावे लागते.

पुण्यातील संस्थांना प्राधिकरणात भूखंड

पुणे - पिंपरी- चिंचवड परिसरातील सुमारे लाखभर विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात ये-जा करीत असल्यामुळे, पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांच्या शाळा निगडी- प्राधिकरणात सुरू करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासासाठीचा वेळ वाचेल, तसेच शहरातील शैक्षणिक सुविधा वाढतील. या संस्थांना जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी चर्चा केली. 

आयुक्‍त हर्डीकर यांची “रेडझोन’ची पाहणी

चौफेर न्यूज   पिंपरी महापालिका प्रभाग क्रमांक 16 असलेल्या किवळे – विकासनगर भागातील वाहतूक समस्या, विकास आराखड्यातील रस्त्यांची रखडलेली कामे तसेच प्रलंबित प्रश्‍नांचा आढावा महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी प्रभागाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान घेतला.

भाजपचा महावितरण अभियंत्यांना घेराव

दत्तवाडी परिसरात वीजेचा लपंडाव ; वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
पिंपरी – आकुर्डी दत्तवाडी परिसरातील वीज वारंवार खंडीत होत आहे. याचा नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अभियंत्याला गुरुवारी (दि. 5) घेराव घालून दत्तवाडी भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

‘ग’ क्षेत्रीय कार्यालय होतयं प्रशस्त आणी सोयीस्कर

 सर्वसाधारण सभेत ठोस निर्णय; अधिकारी लागले कामाला 
 
शहरातील नागरीकांना मुलभूत सुखसुविधा व्यवस्थीत पुरवता याव्यात तसेच प्रशासकिय कारभारा मधे सुटसुटीतपणा येण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने विविध क्षेत्रीय कार्यालयाची स्थापणा केली.  नव्याने अनुक्रमे ग, घ, या क्षेत्रीय कार्यालयाची निर्मीती झाल्याने या कार्यालयांची संख्या आता आठ झाली आहे.  नव्याने तयार झालेल्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाला थेरगाव गावठान मधील महानगर पालीकेच्या यशवंतराव चव्हाण शाळेच्या ईमारतीमधे जागा देण्यात आली असून पहिली मासीक सर्व साधारण सभा नुकतीच पार पडली. सभापती अभिषेक बारणे यांनी पहिल्याच सभेत तत्परतेने काही ठोस निर्णय घेवून आपल्या कामाची चुनूक दखवून दिली. त्यामुळे प्रशासकीयअधिकारीआता कामाला लागले आहेत. चारही प्रभागातील नागरिकांसाठी हे क्षेत्रीय कार्यालय प्रशस्त आणी सोयस्कर होईल असे तरी चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

कविता पाठविण्याचे पालिकेचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (दि.११) दुपारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कविसमेलांनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कविसंमेलनात पिंपरी चिंचवड शहरातील ज्या कवींना सहभाग घ्यावयाचा आहे. त्या कवींनी एक स्वरचित व स्वहस्तलिखित कविताच्या प्रतिसह आपला अर्ज माहिती व जनसंपर्क विभागात ९ ऑक्टोंबरपर्यंत सादर करावा. कविसंमेलनाच्या ठिकाणी ऐनवेळी आलेल्या कवींना कुठल्याही सबबीवर कविसंमेलनामध्ये सहभाग घेता येणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त कवींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

महापालिका व्हेंटिलेटरवर, सहा महिने उलटूनही नाही गती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तांतरानंतर पाणी, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन हे मूलभूत प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करू लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेसह विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने महापालिकेचा कारभार व्हेंटिलेटरवर ...

पिंपरी-चिंचवडचे सर्वच प्रश्न 'जैसे थे'

अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, रिंगरोड यासारखे पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास सर्वच महत्त्वाचे प्रश्न 'जैसे थे' आहेत. शहरात अघोषित भारनियमन सुरू आहे. कचरा व्यवस्थापनाचे नियोजन नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

भाजप, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सिंगापूरला रवाना

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सात नगरसेविका सिंगापूर दौ-यावर गेल्या आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षातील नगरसेवकांचा समावेश असून हा दौरा ठेकेदाराच्या पैशातून होत असल्याची चर्चा आहे.
महापौर नितीन काळजे स्पेन दौ-यावर जाणार आहेत. महापौर काळजे यांचा महानगरपालिका खर्चातून होणारा हा अधिकृत दौरा आहे. त्यांच्याआधीच महानगरपालिकेच्या सात नगरसेविकांनी संधी साधत सिंगापूर दौ-यासाठी रवाना झाल्या आहेत. या नगरसेविका आज (शुक्रवारी) रात्री या दौ-यासाठी गेल्याची माहिती समजली आहे.

राष्ट्रवादीचा आज ‘एल्गार’

पिंपरी - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप सत्तेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ७) पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: रस्त्यावर उतरणार असून, त्यासाठी पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दिवाळीसाठी एसटीच्या जादा गाड्या

पिंपरी – दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळाच्या पिंपरी चिंचवड आगारातर्फे 13 ऑक्‍टोबरपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता यातील बहुतांशी गाड्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून सुटणार आहेत.

सांगवी फाट्यावर अपघाताचा धोका

सांगवी – औंध येथून श्रीमंत महादजी शिंदे पुलावरुन पुढे आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द सुरु होते. या पुलावरुन येताना दोन्ही बाजूस संरक्षण खांब नसल्याने दरी सदृश्‍य खोल नदीपात्र आहे. त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्‍यता असून त्या ठिकाणी महापालिकेने संरक्षण कठडे उभारावे, अशी मागणी सांगवीच्या शिवशक्‍ती व्यायाम मंडळाने आयुक्‍त श्रावण हर्डीकर व ह क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

अवैध बांधकामप्रकरणी मुख्यमंत्र्यांना नोटीस

जनतेची फसवणूक केल्याचा आरोप : माजी नगरसेवक राजेंद्र जगताप न्यायालयात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत राज्य सरकारने काढलेला अध्यादेश, त्यानुसार होत नसलेली कारवाई यामुळे जनतेची फसवणूक होत असल्याचा आक्षेप घेत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.