Monday, 14 April 2014

Citizens in PCMC area frame agenda

The PCCF, a group of NGOs, is working on development issues concerning the city.The forum has prepared an 11-point agenda and plans to seek opinion from all the candidates, said Bilwa Deo Bhavsar, a member of the forum.

Pimpri Chinchwad Citizens' Forum releases People's Manifesto

Pimpri: After getting feedback from citizens, the Pimpri Chinchwad Citizens' Forum (PCCF) has published the People's Manifesto.

आकुर्डीच्या शुभश्री सोसायटीत मतदार जनजागृती

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी निवडणूक आयोग व उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आकुर्डी येथील शुभश्री रेसिडेन्शियल सोसायटीत आज, रविवार, 13 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते.

लोकसभेतील विधेयकांवर जनमत घेणार; भापकर यांचा 'संकल्पनामा

लोकसभेतील प्रस्तावित विधेयकांवर जनमत आजमाविणार, मालमत्ता दरवर्षी जाहीर करणार, स्थानिक प्रश्नांवर जनतेला निर्णय घेता यावा यासाठी 'स्वराज'चा कायदा मांडणार, जनतेला विचारुन खासदार निधीचा वापर आदी संकल्प मावळ लोकसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार मारुती भापकर यांनी केले आहेत.

स्पर्धा भरवायच्या कशा?

पिंपरी : महापालिकेने मैदाने, हॉल, स्टेडिअम, स्केटिंग रिंक, जलतरण तलाव, व्यायामशाळा, कृत्रिम प्रस्तरारोहण भिंत आदी क्रीडा सुविधांमध्ये भरमसाट वाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य वर्गातील खेळाडूंना सराव करणे, तसेच स्पर्धा आयोजन करणे अधिक कठीण झाले आहे. स्पर्धांची संख्या घटल्याने खेळाडू निर्मितीस लगाम बसण्याची शक्यता असल्याची भीती शहरातील विविध क्रीडा संघटनांनी व्यक्त केली. सरावावर र्मयादा येणार के. ए. कांबळे (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड जलतरण संघटना) : जलतरणाकडे अनेकांचा कल वाढत आहे. मोठय़ा प्रमाणात एकदम दरवाढ केल्याने सरावास र्मयादा पडणार असल्याने खेळाडू तयार करणे अवघड होणार आहे. यासंदर्भात चर्चा करुन पालिकेस निवेदन देण्यात येणार आहे. 

आमदार जगतापांना विविध संस्थाचा जाहीर पाठींबा

मावळ लोकसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे, मनसे व स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी पुरस्कृत उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळ लोकसभा मतदार संघातील विविध स्तरातील संस्थांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

अजितदादा व त्यांच्या बगलबच्च्यांनी वर्षांनुवर्षे पिंपरी पालिका लुटली - भापकर

पिंपरी पालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे टाकून पोती भरून पैसे बारामतीला नेले जातात. दुष्काळी जनतेला उद्देशून अजितदादांनी केलेले ते विधान मुजोरपणाचे होते, तो मुजोरपणा ठेचून काढण्याची वेळ आली आहे.

मुंडे आले.. अन् खाणाखुणा करून गेले

पिंपरी : आपण ज्यांचे विचार ऐकण्याची आतुरतेने वाट पाहात आहात, ते भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे थोड्याच वेळात दाखल होत आहेत, असे प्रत्येक वक्ता मनोगतात सांगत होता. काही वेळात, काही मिनिटांत असे सांगत लोकांना जागीच खिळवून ठेवण्यात आले. 

अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा : ठाकरे

पिंपरी : अनधिकृत बांधकामांबाबत माझी भूमिका स्पष्ट आणि सरळ आहे. ज्या बिल्डरांनी अनधिकृत बांधकामे करून ज्या नागरिकांना फसविल त्या लोकांना संरक्षण द्यावे. मात्र, अन्य अनधिकृत बांधकामे कोणत्याही परिस्थितीत जमीनदोस्त करायलाच हवीत, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

स्थानिकांना रोजगार देण्याची राज्यकर्त्यांचीच इच्छा नाही राज ठाकरे

चाकण प्रमाणेच महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात गेलं तर एकच ऐकायला मिळतं, कारखाने आले. मात्र त्यात परप्रांतीय घुसलेत.  स्थानिक भूमिपुत्रांना नोक-यांमध्ये प्राधान्य मिळत नाही, राज्यकर्त्यांची तशी इच्छा नाही, राज्यकर्त्यांचाच कुणावरही वचक राहिलेला नाही. त्यामुळे  लोकसभा निवडणुकीत तुम्ही साथ द्यालच पण त्यानंतर येणा-या विधानसभा निवडणुकांमध्येही साथ द्या, राज्याची संपूर्ण ताकद एकदा देऊन बघा,  राज्य माझ्या हातात दिले तर सगळ्यांना वठणीवरच आणतो असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

जैन महासंघाच्यावतीने अहिंसा पुरस्काराचे वितरण

पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्यावतीने महावीर जयंतीनिमित्त आयोजित अहिंसा साप्ताहात शनिवारी, 12 एप्रिल रोजी अहिंसा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

रुपीनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात

तळवडे : रुपीनगर परिसरातील पश्‍चिमेच्या बाजूस लागून असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत बेकायदेशीरपणे टाकण्यात येत असलेल्या कचर्‍यामुळे रुपीनगर-वासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रुपीनगरच्या पश्‍चिमेस लागून देहूरोड कॅन्टोन्मेंटची हजारो एकर जमीन आहे. या जमिनीला संरक्षक भिंत नाही, त्यामुळे बाहेरील नागरिकांच्या या ठिकाणी राजरोसपणे वावर आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील जागेत एका खासगी एजन्सीद्वारे देहूरोड कॅन्टोन्मेंटचा कचरा आणून टाकण्यात येत आहे. याशिवाय दुसर्‍या एका ठेकेदाराद्वारे हॉटेलमधील टाकाऊ अन्न टाकण्यात येत आहे.