Thursday, 30 May 2013

पिंपरी महापालिकेच्या १३०० शिक्षकांचे होणार ‘ब्रेन वॉश’

पिंपरी महापालिकेच्या १३०० शिक्षकांचे होणार ‘ब्रेन वॉश’: कामचुकारपणा, पाटय़ा टाकण्याची प्रवृत्ती, दर्जाहीन शिक्षण अशा आरोपांमुळे सतत टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या पिंपरी महापालिकेतील शाळांमधील शिक्षकांचे आता ‘ब्रेन वॉश’ करण्यात येणार आहे.

प्राधिकरणाच्या सुनावणीत औद्योगिक ...

प्राधिकरणाच्या सुनावणीत औद्योगिक ...:
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सार्वजनिक व निमसार्वजनिक उपयोगाच्या नावाखाली निवासी जागेचे आरक्षण बदलून आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्याचा घाट घातला आहे. प्राधिकरणबाधितांचा साडेबारा टक्के भू परताव्याचा प्रश्न प्रलंबित ठेवून उभारण्यात येणा-या या प्रकल्पाला प्राधिकरणाने आज (बुधवारी) घेतलेल्या सुनावणीस विरोध दर्शविण्यात आला.

HSC results: Helpline set up for students

HSC results: Helpline set up for students: The Pune division of Maharashtra state board of secondary and higher secondary education has set up a helpline to address problems that students may encounter while accessing the higher secondary certificate (HSC – Class XII) exam result, which will be announced online on Thursday.

HSC results: Helpline set up for students

HSC results: Helpline set up for students: The Pune division of Maharashtra state board of secondary and higher secondary education has set up a helpline to address problems that students may encounter while accessing the higher secondary certificate (HSC – Class XII) exam result, which will be announced online on Thursday.

Shiv Sena opposes changes in land use in Moshi

Shiv Sena opposes changes in land use in Moshi: The Shiv Sena unit in Pimpri Chinchwad on Wednesday opposed the changes the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) intends to make in the land reservations on the 240-acre area for construction of the proposed international exhibition and convention centre in Moshi.

महापालिकेची दापोडी, फुगेवाडीमध्ये ...

महापालिकेची दापोडी, फुगेवाडीमध्ये ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सलग दुस-या दिवशी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. त्यात दापोडी येथील दोन मजली अनधिकृत इमारत आणि फुगेवाडी येथे बस स्थानकासाठी आरक्षित जागेत बांधकामावर आज (बुधवारी) हातोडा टाकण्यात आला.

भोसरीतून पाणी मीटरची होतेय चोरी !

भोसरीतून पाणी मीटरची होतेय चोरी !:
भोसरी चक्रपाणी वसाहतीमधून एकाच दिवशी एका कॉलनीतून अनेकांचे मीटर चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील काही दिवसांपासून या परीसरातून पाणी मीटरची चोरी होत असून याप्रकरणी पहिल्यांदा पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

टीडीआर वाटप फेरबदलाचा सुधारीत ...

टीडीआर वाटप फेरबदलाचा सुधारीत ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1995 नंतर ताब्यात घेतलेल्या आरक्षित जागांच्या मोबदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) वाटप प्रकियेत फेरबदल करण्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले.

पोस्टाने पाठवा ५० हजारांपर्यंतच्या वस्तू

पोस्टाने पाठवा ५० हजारांपर्यंतच्या वस्तू: पोस्ट म्हणजे केवळ पत्रांचा ढिगारा हे चित्र आता बदलणार असून, पोस्टाच्या माध्यमातून तब्बल ५० हजार रुपये किमतीपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक साधने, ​पुस्तके, कपडे आदी वस्तू पाठवता येणार आहेत. त्यासाठी पोस्टाने ‘स्पीड पोस्ट-सीओडी (कॅश ऑन डिलि​व्हरी)’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

औद्योगिक प्रदर्शन केंद्राला विरोध

औद्योगिक प्रदर्शन केंद्राला विरोध: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून निवासी जागेचा वापर मोशी येथील औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी केला जाणे, ही नागरिकांची फसवणूक आहे, असे सांगत शिवसेनेने हे केंद्र उभारण्यासाठी विरोध दर्शविला आहे.

संसदेत राजगुरुंचे तैलचित्र लावा

संसदेत राजगुरुंचे तैलचित्र लावा: पिंपरी : संसद भवनात शहीद भगतसिंग यांच्या बरोबरीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे तैलचित्र लावण्याची मागणी शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा सचिवालयाकडे केलेली आहे.

संसद भवनाच्या कमिटी रुम नं. ६३ मध्ये शहीद भगतसिंग व बी. के. दत्त यांची तैलचित्रे लावण्यात आली आहे. परंतु, स्वातंत्र्यासाठी शहीद भगतसिंगच्या बरोबरीने आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्मा राजगुरू शिवराम हरी व सुखदेव थापर यांची तैलचित्रे अद्याप लावण्यात आलेली नाहीत. ही बाब लक्षात घेऊन खासदार आढळराव पाटील यांनी अवर सचिव अरुण कुमार यांना पत्र पाठवून हुतात्मा राजगुरू व सुखदेव यांची तैलचित्र लावण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आणले होते.

‘ऋणातून मुक्ततेसाठी देवाचे स्मरण करावे’

‘ऋणातून मुक्ततेसाठी देवाचे स्मरण करावे’: पिंपरी : माता-पित्याचे ऋण आयुष्यभर स्मरणात ठेवायचे असतात, ऋणातून मुक्त होण्यासाठी देवाचे स्मरण करावे, असे विचार ह.भ.प. चांगुनेमहाराज यांनी कीर्तनातून मांडले.

दत्तनगर, चिंचवड येथील दत्तमंदिर प्रांगणात चांगुनेमहाराज यांची कीर्तनसेवा मंगळवारी झाली. त्यांनी ‘गोविंद गोविंद मना लागलीया छंद। मग गोविंद ते काया। भेद नाही देवा तया। आनंदले मन। प्रेमे पाझरती लोचन। तुका म्हणे आळी। जिवे नुरेचि वेगळी।।’ या संत तुकोबांच्या अभंगावरील निरुपण केले. ते म्हणाले,‘‘गोविंद म्हणजे ज्ञानेंद्रिये अन् कर्मेंद्रिये एकत्रित करून गोविंदाचे म्हणजे भगवंताचे नामस्मरण करणे. कासव हे आपले सर्व इंद्रिये एकत्र करते म्हणून आपल्या सर्व मंदिरांच्या बाहेर कासवाचे शिल्प असते. त्याचप्रमाणे आपली इंद्रिये एकवटून भगवंताच्या ठायी मन वळवले, तर आपला देह गोविंदस्वरूप होतो आणि देवात व आपल्यात भेद राहात नाही.

बोरकर यांना ‘कोकणगौरव’

बोरकर यांना ‘कोकणगौरव’: पिंपरी : हुतात्मा बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कोकण गौरव, उद्योगरत्न पुरस्कार चिंचवडगाव येथील सरला बोरकर यांना प्रदान करण्यात आला.

गोखले सभागृह (पनवेल) येथे नगराध्यक्षा चारुशिला घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एस. एस. सुराडकर, डॉ. रोहिदास वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष सुनील फडतरे व अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

स्पृहा जोशीसोबत गप्पांची संधी

स्पृहा जोशीसोबत गप्पांची संधी: - सेंट्रल मॉलमध्ये आज आनंदमेळा
पिंपरी : ‘लोकमत’ आणि हेल्दी व्हॅसलिन हेल्दी व्हाइटच्या वतीने लोकमत सखी मंच आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच महिलांसाठी येत्या शनिवारी (दि.१) आनंदमेळावा आयोजित केला आहे. तसेच रविवारी (दि.२) ‘उंच माझा झोका’ फेम स्पृहा जोशी सोबत गप्पा- टप्पा करण्याची संधी मिळणार आहे.


पुणे, पिंपरी-चिंचवडला 4 हजार बस हव्यात

पुणे, पिंपरी-चिंचवडला 4 हजार बस हव्यात

पुणे, पिंपरी-चिंचवडला 4 हजार बस हव्यातकेंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेचे प्रमुख आशिष मिश्रा यांचे मत 'पुणे पिंपरी-चिंचवड महापालिकांबरोबरच त्या लगतच्या क्षेत्रासह ओळखल्या जाणाऱ्या पुणे महानगराचीही सार्वजनिक वाहतुकीची गरज पीएमपीनेच पूर्ण करायची आहे.

अतिक्रमणांमुळे एमआयडीसीची 70 हेक्‍टर जमीन गायब

अतिक्रमणांमुळे एमआयडीसीची 70 हेक्‍टर जमीन गायब

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण या दोन्ही नियोजनकर्त्या संस्थांनी गेल्या वर्षभरात अनधिकृत बांधकामाविरोधात ठोस कारवाई केल्याने शहरातील अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणावर आळा बसला.

'अग्निशामक'ची वाट होणार मोकळी

'अग्निशामक'ची वाट होणार मोकळी

पिंपरी -&nbsp 'शहरातील अनावश्‍यक गतिरोधक काढण्यात येणार आहेत,'' अशी माहिती वाहतूक नियोजन कक्षाचे प्रमुख तथा सहायक आयुक्‍त सतीश कुलकर्णी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Home buyers Combine debuts in Hinjewadi

Home buyers Combine debuts in Hinjewadi - Indian Express:

Home buyers Combine debuts in Hinjewadi
Indian Express
Home buyers Combine (HBC), an initiative of collective of home buyers, announced their maiden housing project in Hinjewadi. Known for its group buying strategy, HBC acts as the facilitator hand-holding buyers through various decision making process at ...

आणखी 2455 अवैध बांधकामे होणार भुईसपाट

आणखी 2455 अवैध बांधकामे होणार भुईसपाट:
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार मार्च 2012 नंतर 2737 अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. त्यापैकी 282 बांधकामे महापालिकेने हटविली आहेत. उर्वरित 2455 बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी महापालिका ...

दुष्काळग्रस्तांसाठी महापालिका ...:
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहाय्यता निधीसाठी देणार आहेत