Saturday, 1 February 2014

PMPML needs efficient officers like Dr Pardeshi

Pune: The city chief of the Nationalist Congress Party (NCP), Vandana Chavan said that the cash-strapped Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) needs an officer like the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PMC) Commissioner, Dr Shrikar Pardeshi, for improvement of the transport utility.

विकासासाठी डॉ. परदेशी यांना साथ द्यावी

महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी हे कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करीत आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत काम करणा-या आयुक्तांच्या बदलीचा विषय बंद करून राष्ट्रवादीच्या सत्ताधा-यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी आयुक्तांना साथ द्यावी, असे आवाहन शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केले आहे.

आयुक्तांच्या बदलीस सांस्कृतिक क्षेत्रातून विरोध

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीला सांस्कृतिक क्षेत्रातूनही जोरदार विरोध होत आहे. डॉ. परदेशी यांच्यासारख्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली होऊ नये, असाच सूर उमटत आहे. 

निगडीमध्ये गुरुवारी अनुष्का स्त्री साहित्य कला संमेलनाचे आयोजन

अनुष्का स्त्री मचंच्या वतीने निगडी येथे गुरुवारी (दि. 06) अनुष्का स्त्री साहित्य कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय याठिकाणी सकाळी नऊ वाजता या संमेलनाचे उद्‌घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

प्रभाग समिती अध्यक्षपदाची 6 फेब्रुवारीला निवडणूक

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची फेररचना झाल्यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी महापालिकेला मुदतपूर्व निवडणूक घ्यावी लागणार आहे. येत्या 6 फेब्रुवारीला ही निवडणूक होत असून नव्याने स्थापन झालेल्या दोन प्रभागांमुळे आणखी दोन नगरसेवकांना प्रभागांचे अध्यक्ष होण्याची संधी मिळणार आहे.     

निगडी ते कन्याकुमारी रॅलीला सुरुवात

"इंधन वाचवा; देश वाचवा", "लेक वाचवा; देश वाचवा" असा संदेश देण्यासाठी शहरातील सायकलपटूंनी आयोजित केलेल्या निगडी ते कन्याकुमारी पर्यंत सायकल रॅलीला आज (शुक्रवारी) सुरुवात झाली. यानिमित्त त्यांचा आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी व स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अनधिकृत बांधकामाविषयी सोमवारी निर्णय- लक्ष्मण जगताप

अनधिकृत बांधकामप्रकरणी प्रस्तावावर सोमवारी निर्णय अपेक्षित आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

अनुदानापुरते बचतगट होऊ लागल्याने चांगली चळवळ बदनाम - मोहिनी लांडे

महिलांचे बचत गट ही चांगली चळवळ आहे. मात्र, काही ठिकाणी बचत गटांनी अनुदानाचे पैसे घेतले आणि गट बंद केल्याचे प्रकार घडले. त्यामुळे ही चळवळ बदनाम होऊ लागली, असे महापौर मोहिनी लांडे यांनी सांगवीत स्पष्ट केले.

नवीन मतदार नोंदणी आजपासून पुन्हा

पुणे - शहर व जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली.

"फेसबुक'वरील तक्रारीवरून वाहतूक पोलिस निलंबित

पुणे - वाहनचालकास मारहाण करून पैसे उकळणाऱ्या शहर वाहतूक शाखेतील एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

एच. ए. प्रश्‍नी खासदार सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट



पिंपरी - येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स कंपनीच्या विविध प्रलंबित विषयांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी कंपनीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बुधवारी (ता.