पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या बहुचर्चित बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये आज (बुधवारी) बसची चाचणी घेतली जाणार आहे. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही चाचणी होणार आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच दरम्यान ही चाचणी घेतली जाणार आहे. यावेळी याचिकाकर्ता, पीएमपीएमएल व पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 25 July 2018
‘मेट्रो’ला जोडणार पाच रेल्वे स्टेशन
खडकी, कासारवाडीतील जागांचा प्रस्ताव येत्या तीन महिन्यांत होणार अंतिम
शहरातील पाच रेल्वे स्टेशन पुणे मेट्रो प्रकल्पाशी जोडण्यात येणार असून, या ठिकाणी प्रवाशांची ये-जा सुलभ होण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. खडकी आणि कासारवाडी या दोन ठिकाणी मेट्रोला आवश्यक जागांचा प्रस्ताव पुढील तीन महिन्यांत अंतिम केला जाणार आहे.
शहरातील पाच रेल्वे स्टेशन पुणे मेट्रो प्रकल्पाशी जोडण्यात येणार असून, या ठिकाणी प्रवाशांची ये-जा सुलभ होण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. खडकी आणि कासारवाडी या दोन ठिकाणी मेट्रोला आवश्यक जागांचा प्रस्ताव पुढील तीन महिन्यांत अंतिम केला जाणार आहे.
मेट्रोच्या कामासाठी कासारवाडी येथे वाहतूक व्यवस्थेत बदल
पिंपरी – पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी सब-वे जवळ महामेट्रोचे काम दि. 29 मे पासून सुरु होणार आहे. या कामामुळे वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. कासारवाडी सब-वे जवळ महामेट्रोच्या कामामुळे कासारवाडी, सांगवी, पिंपळे-गुरवकडे जाणारी दुचाकी, चार चाकी वाहने व पीएमपीएल बसेस यांनी सेवा रस्त्याचा वापर करावा. इतर सर्व वाहनांनी सॅंडविक कंपनीजवळील मर्ज इन होऊन ग्रेड सेपरेटर रस्त्याचा वापर करावा. तसेच रहदारीस अडथळा होऊ नये म्हणून पुणे-मुंबई महामार्गावरील सॅंडविक कंपनी ते सांगवी, पिंपळे-गुरवकडे जाणारा नाशिक फाटा येथील अप-रॅम्पपर्यंत सेवा रस्त्यावर नागरिकांनी वाहने पार्क करु नयेत व मेट्रोच्या कामास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केले आहे.
पाचशे ई-बसच्या निविदा सात दिवसांत
पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ५०० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावावर स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत दोन्ही महापालिका आणि पीएमपीमध्ये मंगळवारी एकमत झाले. दोन ऑगस्ट दरम्यान याबाबतच्या निविदा मागविण्यात येणार असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २५ बस दोन्ही शहरांत धावतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
कचऱ्याचा प्रश्न आता सुटणार
पिंपरी - शहरातील वाढती लोकसंख्या, नवीन प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयांची बदललेली रचना यांचा विचार करून कचरा संकलनासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर महापालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी ठेकेदार नियुक्त करून वाहने व कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कचरा संकलन व वाहतुकीचा प्रश्न आता सुटणार आहे.
झाडे विद्रुपिकरणाविरोधातील सामाजिक संस्थांना महापालिकेचे पाठबळ
वाल्हेकरवाडी (पुणे) : अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सामाजिक संस्था मागील चार महिने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील झाडांवरील खिळे आणि तारा काढत आहेत.याची दखल घेऊन सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी जाहीर नोटीस काढून झाडांवर जाहिरात करणाऱ्यांवर महाराष्ट्र विरूपण प्रतिबंध अधिनियम 1995 अन्वये गुन्हा दाखल करण्याची समज दिली आहे.जाहिरातदारांना तीन दिवसामध्ये जाहिराती काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे.
महापौरपद भोसरी की चिंचवडला?
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महापौर व उपमहापौर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तत्काळ त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर आता कोणाला संधी मिळणार याचीच उत्कंठा आहे. महापौरपदासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि दुसऱ्या बाजूने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच आहे. शुक्रवारी (ता. 27) मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत त्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापौर, उपमहापौरांचा अचानक राजीनामा
पिंपरी-पिंपरी-चिंचवडचे भाजपाचे पहिले महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे मंगळवार दुपारी अचानक राजीनामा दिला. तत्पूर्वी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून दोन नेत्यांच्या शहकाटशहच्या राजकारणामुळे महापौर राजीनामा देण्यार असल्याची चर्चा होती तिला आज पूर्णविराम मिळाला. मात्र यामुळे आता महापौरपदासाठी नव्या इच्छुकांची रस्सीखेच होणार आहे.
गृहप्रकल्प निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी
‘दिशा’च्या बैठकीत सुलभा उबाळे यांची मागणी
पिंपरी : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्यावतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी गरिबांसाठी घराची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील गृहप्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आक्षेप घेत दिशा समितीच्या सदस्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली. तसा ठरावदेखील शनिवारी झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत मंजूर करण्यात आला. आता हा ठराव भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. दिशा समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्या सुलभा उबाळे यांनी पिंपरी महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत रिंग, वाढीव दराने निविदा मंजुरी देण्यात येत असल्याकडे लक्ष्य वेधले. त्या म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण सेक्टर नंबर 12 मध्ये उभारत असलेल्या घरांसाठी आलेल्या निविदांच्या तुलनेत महापालिकेच्या प्रकल्पासाठी वाढीव दराने निविदा मंजूर करण्यात येत आहेत. त्यावर दिशा समितीचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करावी. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाकडे रितसर पत्र पाठविण्याचे आदेश दिले आहेत,
विद्यार्थी मोफत सायकल योजनेत अनुदानासाठी लाभार्थी प्रतिक्षेत
जुनी सांगवी - सर्वसामान्यांना दिल्या जाणाऱ्या शासनाच्या विविध योजना, समाजकल्याण, महापालिका स्तरावरील नागरवस्ती विकास विभागाच्या बहुतांश योजना विविध घटकातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, मोफत शिलाई मशिन वाटप, विद्यार्थी शिष्यवृत्ती आदी योजना आहेत. मात्र त्या गरजवंतांना सहजासहजी मिळत नाही. जीएसटीमुळे आधी खरेदी करा मग अनुदान घ्या, असा प्रशासनाचा होरा आहे.
भविष्यात पिंपरी-चिंचवडकरांना मूलभूत सुविधा मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी आमदार महेश लांडगे आग्रही
2031 सालची लोकसंख्या लक्षात घेत पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षण मिळण्याची मागणी
पिंपरी, 24 जुलै – पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विस्तारत आहे. वाढत्या व्यवसाय आणि नोक-यांच्या प्रमाणामुळे महाराष्ट्राच्या सर्व भागातून तसेच अन्य राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात लोक पिंपरी-चिंचवड शहराकडे आकर्षित होत आहेत. 2031 सालची शहराची लोकसंख्या लक्षात घेता शहराला सध्या होत असलेला पाणी पुरवठा कमी पडणार आहे. त्यामुळे आत्ताच पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.
इंजिनीअरिंग कॉलेजांवर टांगती तलवार?
राज्यातील खासगी इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रथम वर्ष इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कल अतिशय मंदावला असून, ग्रामीण भागातील कॉलेजांमध्ये प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत ५० ते १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे या कॉलेजांना कामकाज चालविणे अवघड होऊन पुढील वर्षी राज्यातील अशी इंजिनीअरिंग कॉलेज बंद पडणार आहेत. त्याचबरोबर अनेक कॉलेजांमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेन्टेशन आदी विद्याशाखा बंद कराव्या लागणार आहेत, अशी शक्यता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
#MissionAdmission 'पॉलिटेक्निक' ओस; "डीफार्म'साठी तिप्पट अर्ज
पुणे : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमापाठोपाठ विद्यार्थ्यांनी दहावीनंतरच्या तंत्र शिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाकडेही यंदा पाठ फिरविली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या 40 हजारांहून अधिक जागा रिक्त राहणार आहेत. दुसरीकडे औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी.फार्म) अभ्यासक्रमाला प्रवेश क्षमतेपेक्षा तिप्पट अर्ज आले आहेत.
…अन ते माझ्या कानात सांगतात आणि मी मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगतो – बापट
पिंपरी चिंचवड शहरातील त्रिकुट म्हणजे आमदार जगताप, लांडगे आणि भाई हे जिल्ह्याचा कारभार चिंचवडमधूनच चालवतात असा चिमटा काढत पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांच्यातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. शहर भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात की, पुणे जिल्ह्याचा कारभार पूर्वी चिंचवडमधून चालायचा, तो नंतर पुण्याकडे गेला. परंतु, आमचे लक्ष्मण काका असतील किंवा महेश दादा आणि भाई हे त्रिकूट आजही जिल्ह्याचा कारभार येथुनच चालवतात. फक्त ते माझ्या कानात सांगतात, आणि मी मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगतो. यावेळी पालकमंत्री बापट आपल्या मिश्कील शैलीत बोलत होते.
Subscribe to:
Posts (Atom)