महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात निगडीपर्यंतच्या मेट्रोचा विचार केलेला नाही. तो करावा की न करावा, यावरून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 11 August 2017
शहर भाजपमध्ये दुफळी!
अमोल थोरात म्हणजे भाजप नव्हे : एकनाथ पवार यांचा टोला
पिंपरी – निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येणारा उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यापूर्वी त्याला पुणे महामेट्रो व्यवस्थापनाची परवानगी घेण्यात यावी, अशी सूचना भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाला केली होती. त्यावर अमोल थोरात म्हणजे भाजप नव्हे; किंवा महापालिका नव्हे, असा उपरोधित टोला भाजपचेच सत्तारुढ पक्षनेत्यांनी लगावला आहे. यामुळे भाजपमधील गटबाजीचे दर्शन घडले आहे.
गणेशोत्सव “डॉल्बी मुक्त’ व्हावा
पोलीस आयुक्तांचे आवाहन : गणेशोत्सव शांतता बैठक
पिंपरी – गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर “डॉल्बी मुक्त’ करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुरुवारी (दि. 10) केले. तसेच, कोणत्याही मंडळांनी वर्गणीबाबत जबरदस्ती करु नये, अन्यथा कारवाई अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
मुख्यमंत्र्यांच्या पिंपरी दौऱ्यात 'ऑनलाइन'चा पर्याय
पिंपरी पालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली, तेव्हापासून येथील विकासकामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार, बऱ्याच पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली खरी.
वाहतूक कोंडीतून सुटका : वाकडला ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल
पिंपरी : हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञाननगरीकडे जाणाºया रस्त्यावरील प्रवास सुकर व्हावा यासाठी वाकड कस्पटे चौक आणि महापालिका शाळा चौकापर्यंतचा रस्ता सिग्नलविरहित करण्यात येणार आहे. त्यासाठी या दोन्ही ... शहराच्या सीमेवर हिंजवडी आयटी पार्क विकसित झाला आहे. २२५ ...
ई-रिक्षांचे मार्ग निश्चित
ई-रिक्षा शहरात लवकरच धावणार, अशा गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. वाहतूक पोलिसांनी ई-रिक्षांसाठी शहरातील १४ मार्ग निश्चित केले असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ई-रिक्षांसाठीचे स्वतंत्र लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला लर्निंग लायसन्स काढून एका महिन्यांच्या अंतराने पक्के लायसन्स मिळणार आहे. त्यामुळे एका महिन्यानंतर ई-रिक्षा शहरात धावताना दिसतील.
Six years on, work on Nigdi water pipeline remains stalled
Pimpri Chinchwad: Political leadership as well as the civic administration in Pimpri Chinchwad have been unable to convince the state government to lift the stay on implementing the project to lay a water pipeline from Pavana dam to Nigdi in the past ...
Techie's pal reaches Dubai before he gets to Hinjewadi
Driving to Hinjewadi, barely 30km away, often takes longer. Bizarre but true. Techie Aniket Chorage (27), working in an IT company at Hinjewadi (Phase-3), experienced it on Tuesday evening when he went to drop a friend to the Lohegaon airport in his car.
[Video] नऊ वर्षांपासून पवना धरणाचे मजबुतीकरण रखडले
मजबुतीकरणास प्रकल्पग्रस्तांचा विरोध एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणा-या पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून रखडले आहे. मावळ परिसरातील शेतक-यांच्या विरोध असल्यामुळे मजबुतीकरणाचे काम रखडले आहे. धरण मजबुतीकरणाचे काम झाल्यास 1.48 टीएमसी साठा क्षमता वाढणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणाच्या मजबुतीकरणाचे काम 2004 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, 2008 मध्ये मावळातील शेतक-यांच्या आंदोलनानंतर ते काम थांबविण्यात आले आहे.
[Video] गाळ काढल्यामुळे पवना धरणातील पाणी साठविण्याची क्षमता वाढली|
पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणातील गेल्या दोन वर्षांत 75 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे सात कोटी 60 लाख लीटर पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकासनिधीतून सलग दोन वर्ष गाळ काढण्यात आला.
पोलिसांकडून सौजन्याची ऐसीतैशी
‘नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे’, असा एक सुविचार पोलिस आयुक्तालयात नुकताच वाचनात आला. मात्र प्रत्यक्षात काही पोलिस ठाण्यात आणि चौकीत जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वाईट अनुभव येत आहे. अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढतच आहेत. ‘स्मार्ट पोलिसिंग’चा नारा देताना पोलिसांनीही आता नागरिकांसोबत अरे-तुरेची भाषा, दमदाटी आणि हेकेखोरपणा सोडून देण्याची गरज आहे.
‘सवाल आपल्या भावाच्या प्रतिष्ठेचा हाय!’
नवी सांगवी - महाविद्यालयीन तरुणांकरिता महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ‘सकाळ’च्या ‘यिन’ या उपक्रमांर्तगत आज बाबूरावजी घोलप महाविद्यालयात निवडणूक उत्साहात झाली. सकाळी अकरा वाजता ऑनलाइन मतदानाला सुरवात झाली. सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. असे असले तरी कोठेही गडबड,गोंधळ दिसत नव्हता.
रेशन दुकानदारांची होणार तपासणी
पुणे - शहरातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य देणे बंधनकारक असतानाही स्वस्त धान्य दुकानदारांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे करणाऱ्या दुकानदारांची तपासणी करण्याच्या सूचना अखेर अन्नधान्य वितरण विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार मातोश्री आंबेडकर वस्तीसह (ताडीवाला रोड) शहराच्या विविध भागांतील नागरिकांनी केलेल्या तक्रारींनुसार आता परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक दुकानदारांची तपासणी करणार आहेत.
यंदापासून पुन्हा गणेश फेस्टिव्हल - महापौर नितीन काळजे
पिंपरी - महापालिकेच्या माध्यमातून गणेशोत्सवात पूर्वी घेण्यात येत असलेला पिंपरी-चिंचवड महोत्सव आता गणेश फेस्टिव्हल या नावाने यंदापासून पुन्हा सुरू केला जाणार आहे. महापालिका स्थायी समिती सभेत याबाबत गुरुवारी चर्चा झाली. महापौर नितीन काळजे यांनी हा महोत्सव महापालिकेतर्फे घेण्यात येईल, अशी घोषणा गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.
चिंचवडमध्ये उद्यापासून ऑटो एक्स्पो
ऑटो क्लस्टर एक्झिबिशन हॉलमध्ये नव्या मोटारींचे दोन दिवसांचे प्रदर्शन
पिंपरी - स्वतःच्या मालकीची कार असावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने शनिवारपासून (ता.१२) ‘ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे. कार घेणे ही खूप अवघड गोष्ट आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. शिवाय वेगवेगळ्या गाड्यांच्या फिचर्समुळे बरेचजण कोणती कार घ्यावी, या संभ्रमात असतात. कार खरेदीबाबतचे गैरसमज आणि ग्राहकांच्या मनातील सर्व संभ्रम दूर करून त्यांना मनासारखी कार खरेदी करता यावी यासाठी ‘सकाळ’ने दोन दिवसांच्या ‘ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे.
सदस्यत्वाविषयी कळवणे हे सोसायटीचे कर्तव्य
आमच्या वडिलांनी २०११ मध्ये पिंपरी चिंचवड येथे स्वतःच्या नावे फ्लॅट खरेदी केला. त्यासाठी आम्ही गृहकर्ज़ पण घेतले. दुर्दैवाने अवघ्या दोन महिन्यांत त्यांचे निधन झाले. आता या घटनेला ५ पेक्षा जास्त वर्षे झाली. त्यांच्या पश्चात माझी ...
Subscribe to:
Posts (Atom)