Sunday, 24 June 2018

पीएमपीला रोज दोन लाखांचा फटका

– सीएनजीच्या दरात तीन रुपयांनी वाढ

पिंपरी – सतत वाढणाऱ्या इंधनाच्या दराने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पीएमपीएमएलला आता दिवसाला दोन लाखांचा फटका बसणार आहे. 16 जून पासून सीएनजी गॅसच्या दरात तीन रुपयानी वाढ झाल्याने पीएमपीएमएलला हे नुकसान सहन करावे लागणार आहे.

स्वच्छ भारतच्या सर्व्हेक्षणात पिंपरी चिंचवडचा ४३ वा क्रमांक

पिंपरी (Pclive7.com):- काही वर्षापूर्वी स्वच्छ शहर म्हणून राज्यात प्रथम आणि देशात ९ वा क्रमांक पिंपरी चिंचवडने पटकवला होता. गेल्यावर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत पिंपरी चिंचवड ९ व्या क्रमांकावरून थेट ७२ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यात आता सुधारणा होत यंदाच्या वर्षी शहराने ७२ वरून ४३ व्या क्रमांकावर मजल मारली आहे. वर्षभरात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबविलेल्या उपक्रमांमुळे ही सुधारणा झाली आहे.

स्वच्छ भारतच्या सर्व्हेक्षणात पिंपरी चिंचवडचा ४३ वा क्रमांक

जुलैअखेर 'डीपीआर'

'महामेट्रो'तर्फे दोन्ही पालिकांना सादर होणार; खर्चाचा अंदाज कळणार

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रजपर्यंतच्या विस्तारासह नाशिक फाटा ते चाकण दरम्यानच्या मार्गासाठीच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला तो पुढील महिनाअखेरीस सादर केला जाणार आहे. मेट्रोच्या विस्तारासाठीचा सुमारे २४ किलोमीटरचा हा अहवाल सादर झाल्यानंतर त्याची आखणी (अलाइनमेंट) आणि खर्च किती असेल, हे स्पष्ट होणार आहे.

PCMC spent Rs 4.98 crore on stalled BRTS route last year

Corporator demands answers, but civic body officials say amount spent for annual maintenance work

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has been spending agenerous amount received from the state and central governments on the Nigdi-Dapodi Bus Rapid Transit System (BRTS), which has been non-functional since 2012, owing to safety concerns.

“इंद्रायणी’त खळखळले फेसळ पाणी

आळंदी- पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीतून आळंदीत तीर्थक्षेत्रामधून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीत रासायन मिश्रीत पाण्याणी सोडल्याने आज (रविवारी) नदी पात्रातील पाण्यावर पांढरा शुभ्र फेस निर्माण झाला होता. हे वृत्त वाऱ्यासारखे आळंदीत पसरल्याने जो-तो इंद्रायणी बंधाऱ्याकडे धाव घेत होता. व हा प्रकार कशामुळे झाला असवा याबाबत तर्क-वितर्क करीत होता.

PCMC okays parking policy, NCP & Sena oppose move

PIMPRI CHINCHWAD: The BJP ruled Pimpri Chinchwad Municipal Corporation approved the pay-and-park policy for Pimpri Chinchwad during the general body meeting on Friday. The NCP, however, opposed the move.

पिंपरी चिंचवडमध्ये मंत्रीपदाची उत्सुकता शिगेला असताना राज्यस्तरीय लेखा समितीच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.सचिन पटवर्धन यांची फेरनिवड

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला गेल्या वर्षभरापासून मंत्रीपदाचे वेध लागलेत. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळेल अशी चिन्हे निर्माण झालीत. दरम्यान या दोघांपैकी मंत्रीपद कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला असताना राज्यस्तरीय लेखा समितीच्या अध्यक्षपदी शहरातील अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. हे पद राज्यमंत्री दर्जाचे असून याला विशेष महत्व देखील आहे. पटवर्धन यांच्या या निवडीमुळे आता शहराच्या पदरात आणखी काही मिळू शकेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Retail shops on strike to protest plastic ban

Over 15,000 retail shops, including sweet outlets, bakeries, as well as garment, electrical and grocery stores, in Pune district will go on an indefinite strike from Monday in protest against the plastic ban.

PCMC collects Rs 80,000 as penalty from 16 shops

The civic body collected Rs 80,000 as fine while implementing the plastic and thermocol ban on Saturday.

#PlasticBan पिंपरीत ९० हजारांच्या प्‍लॅस्‍टिक पिशव्या जप्‍त

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारपासून  (ता. २३) महापालिकेच्या वतीने १८ दुकानदारांवर कारवाई करून ९० हजार रुपये किमतीच्या १७४ किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या, वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

आता फ्लेक्सबंदीही शक्य

हायकोर्टाने निर्वाणीचा इशारा देऊन अनधिकृत फ्लेक्सवर बंदी घालण्याची अंमलबजावणी करण्यास सांगितल्यावरही राज्य सरकारला जे जमले नाही, ते प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे शक्य होणार आहे. फ्लेक्सची छपाई करण्यासाठी वापरण्यात येणारे मटेरिअल हे बंदी असलेल्या प्लास्टिकपासून तयार करण्यात येत असल्याने फ्लेक्स, होर्डिंग्जवरही आपसूक गदा येणार आहे. प्लास्टिकचे मटेरिअल वापरल्यास फ्लेक्स प्रिंटिंग करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका थेट कारवाई करणार आहे. त्यामुळे यापुढे दादा, भाऊंच्या शुभेच्छांचे फ्लेक्स चौका-चौकात, रस्त्यांच्या कडेला, विजेच्या खांबांवर कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड मनपातर्फे प्लास्टिक बंदीची कारवाई; ५२ जणांविरोधात कारवाई

पिंपरी- राज्य सरकारने आजपासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. शहरातील दुकाने, हॉटेलसह इतर आस्थापनावर धडक मोहीम राबवून आत्तापर्यंत ५२ जणांविरोधात कारवाई करत २ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

पालिका सर्वसाधारण सभेत चर्चेचा सर्वाधिक भर चिंचवड मतदारसंघावर

पालिका सर्वसाधारण सभेत चर्चेचा सर्वाधिक भर चिंचवड मतदारसंघावर

ईनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या पुढाकारातून इंगळूनमधील १०० एकर जमिनीला मिळाले पाणी

आंदर मावळातील परिटेवाडी इंगळून या गावातील शेतक-यांना ईनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडमुळे मोठा आधार मिळाला आहे. येथील १०० एकर जमिनीला वर्षभर पाणीपुरवठा करणारा प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच ईनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजपुरकर यांच्या हस्ते पार पडला.

[Video] खराळवाडी,गांधीनगर परिसरातील नागरिकांचा आयुक्त बंगल्यावर मोर्चा


झाडांच्या लोखंडी जाळ्या काढण्याच्या कामाला सुरूवात

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी प्रभागातील रस्त्यावरील झाडांच्या लोखंडी जाळ्या काढण्याच्या कामास महापालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडुन सुरूवात करण्यात आली आहे. गेली चार पाच वर्षापुर्वी रोप व झाडांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या झाडे मोठी झाल्याने परिसरातील अनेक झाडे लोखंडी जाळ्यात अडकली होती. काही झाडात या लोखंडी जाळ्या झाडांनी सामावुन घेतल्याचे चित्र परिसरातुन दिसत होते.पर्यावरण प्रेमी नागरीकांकडुन याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सकाळ मधुन याबाबत सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर सकाळ मधुन या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला होता.

सांगवीतील मार्ग बदलेली बस वहातूक पूर्ववत करा

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीत गेली तिन महिन्यांपासुन रस्त्याच्या कामासाठी पुणे व इतर ठिकाणी बस वहातुकीचा मार्ग बदललेला आहे. वसंतदादा पुतळा बसस्थानकावरून गजानन महाराज मंदिर, शितोळेनगर प्रमुख रस्त्यावरून जाणारी बस वहातुक गेली तीन महिन्यांपासून सांगवीच्या बाहेरच्या रस्त्याने केली जात आहे. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थी नागरीकांना मुख्य बसस्थानक अथवा दुसऱ्या टोकावरील बसथांब्यावर जावे लागत आहे.

ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे मागितल्यास कारवाई

पिंपरी – सध्या पावसाळा सुरु झाला असून, या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना वीजेसंदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातल्या त्यात रोहित्र बिघाडाने या समस्यांची तीव्रता अधिक वाढते. बिघडलेले रोहित्र बदलून देण्यासाठी ग्राहकांकडे पैशाची मागणी करणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

“अनफिट बस’चा वापर बंद करण्याची मागणी

पिंपरी – पीएमपीएमएलच्या “पासिंग’ विना धावणाऱ्या “अनफिट’ बसमुळे प्रवासी असुरक्षित आहेत. “अनफिट’ बसेसबाबत कारवाई करून या बसेसचा वापर बंद करावा, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर प्रमुख गणेश जाधव यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उद्योग समुहाने गुणवत्तेची चळवळ जबाबदारीने राबवावी!

पिंपरी – उद्योग समुहातील सर्व घटकांनी सामुहिकपणे गुणवत्तेची चळवळ जबाबदारीने राबविली पाहिजे. ग्राहकांच्या आवडी निवडीनुसार वेळोवेळी उद्योग समुहाने उत्पादनात बदल केला पाहिजे ते करीत असताना वस्तू निर्मितीच्या गुणवत्ते विषयी कोणतीही तडजोड करता कामा नये, असे प्रतिपादन मरकळ येथील क्‍लोराईड इंडस्ट्रीजचे प्रकल्प प्रमुख राजीब दत्ता यांनी केले.

पालकांनो विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका!

पिंपरी – महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारती नियोजित पोलीस आयुक्तलयासाठी भाड्याने दिली आहे. त्यामुळे ही शाळा दळवीनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. या शाळेच्या इमारतीत सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी जागेचा अट्टाहास न धरता दळवीनगर येथील शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणे गरजेचे आहे. दरम्यान, पालकांच्या सूचनांचा विचार केला जाईल. आणखीन आवश्‍यक त्या सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन दिल्या जातील. परंतु, पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये, असे आवाहन सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

मनपा विधी व क्रीडा समिती सदस्यांची निवड

पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीच्या आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीतील सत्ताधारी भाजपच्या प्रत्येकी एक सदस्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी शुक्रवारी झालेल्या महासभेत नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये विधी समिती सदस्यपदी सागर गवळी तर क्रीडा समिती सदस्यपदी कुंदन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

बोपखेलमध्ये चोविसतास पाणी योजना

दिघी- पिंपरी-चिंचवड महानगर पालिका अंतर्गत दिघी बोपखेल प्रभागात 24 तास पाणी योजना कामाचा शुभारंभ करण्यात आला.  या कार्यक्रमाला नगरसेवक लक्ष्मण उंडे, नगरसेविका हिराबाई गोवर्धन घुले, नगरसेवक निर्मलाताई गायकवाड, नगरसेवक विकास डोळस, माजी नगरसेवक दतात्रय गायकवाड, माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे, चेतन घुले, विठ्ठल घरे व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी माजी नगरसेवक भाऊसाहेब सुपे यांनी सांगितले की, या योजनेचा नागरिकांना फायदा होणार आहे. पूर्वी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. सकाळी एक ते दोन तास पाणी पुरवठा होत होता, त्यामुळे महिलांना त्रास होत होता. परंतु येणार्‍या काळात नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. हे काम सुरू असताना खोदकाम करताना नागरिकांना त्रास होईल परंतु पाण्याची समस्या मिटणार असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.