Thursday, 26 April 2018

इंद्रायणी नदीला जैव कचर्‍याचे ग्रहण!

तळेगाव : मावळसह देहू-आळंदीतील वारकर्‍यांची लोकमाता मानल्या जाणार्‍या इंद्रायणी नदीला जैविक कचर्‍याचे ग्रहण लागले आहे. मावळातील आंबी पुलाजवळ इंद्रायणीच्या मुख्य प्रवाहात धोकादायक जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत असल्याने पंचक्रोशीत रोगराईची भीती आहे.

[Video] कशी आहे नवीन पोलिस आयुक्तालयाची इमारत!


आयुक्‍तालयासाठी जागा निश्‍चित?

पिंपरी - पोलिस आयुक्‍तालय सुरू करण्यासाठी तात्पुरती जागा निश्‍चित झाली आहे. चिंचवड येथील प्रेमलोक पार्क परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा या महापालिकेच्या इमारतीची मागणी पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिका माहिती तंत्रज्ञान अधिकाऱ्याच्या बडतर्फीची मागणी

चौफेर न्यूज  पिंपरी चिंचवड महापालिकेचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया हॅक करून संबंधित ठेकादाराला मदत केल्याने त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश वाघेरे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची ऑनलाईन सेवा ४ दिवस बंद

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेची संगणक प्रणाली नव्याने कार्यान्वित करण्यात येणार आहे. या तांत्रिक कारणामुळे शनिवार दि.२८ एप्रिल ते मंगळवार दि.१ मे या चार दिवसाच्या कालावधीत सर्व्हर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या संगणक प्रणालीशी निगडीत असलेली ऑनलाईन सेवा ४ दिवस बंद असणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी पत्रकान्वये दिली आहे.

पिंपरी चिंचवड़ की ‘उन’ बेटियों के लिये नहीं जली एक भी ‘मोमबत्ती’

कठुआ, उन्नाव, ऐटा, रोहतक, ग्वालियर एक के बाद एक लगातार सामने आ रहे बलात्कार के मामलों से पूरे देश में आक्रोश व्याप्त है। बलात्कारियों को फांसी की सजा दिलाने के लिए केंद्र सरकार ने कानून में हालिया सुधार लाया है। वहीं बुधवार को नाबालिग के यौन उत्पीड़न के मामले में स्वघोषित संत आसाराम को उम्रकैद की सजा सुनाई गई। एक तरफ जहां इस मामले में पीड़िता को इंसाफ मिला, जैसी प्रतिक्रिया व्यक्त की जा रही है, वहीं दूसरी ओर पुणे के पिंपरी चिंचवड़ शहर में अपहरण के बाद बलात्कार कर दो मासूमों को आज छह साल बाद भी इंसाफ का इंतजार है। इन मासूमों के गुनहगार आज भी पुणे पुलिस, जिसकी क्राइम ब्रांच मामूली चोर को पाताल से ढूंढ निकालने में माहिर है, की गिरफ्त से दूर है। ये मासूम तो इतनी अभागी साबित रही कि, उनके लिए कहीं एक ‘मोमबत्ती’ तक नहीं जल सकी है। पिंपरी चिंचवड़ की इन ‘निर्भया’, ‘आसिफा’ को कब न्याय मिलेगा? यह सवाल आज भी अनसुलझा ही है।

[Video] पिंपरीत होणार 60 हजार टाटा मोटर्स अल्ट्रा ट्रकचे उत्पादन

पिंपरीत होणार 60 हजार टाटा मोटर्स अल्ट्रा ट्रकचे उत्पादन कमर्शियल व्हेईकल बिझनेस यूनिटचे अध्यक्ष गिरीश वाघ यांची माहिती; टाटा मोटर्सने देशभर सादर केली ट्रकची नेक्स-जेन अल्ट्रा श्रेणी एमपीसी न्यूज - टाटा मोटर्सने देशभरात आपली नवीन ट्रकची नेक्स्ट जनरेशन अल्ट्रा श्रेणी सादर केली

PCMC holds BRTS trial runs on highway

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation conducted trial runs of bus services on the bus rapid transit system on Pune-Mumbai highway on Tuesday and Wednesday.

PCMC residents wage lone battle against hyacinth on Pavana river

Pune The Rotary Club of Walhekarwadi, a non-profit organisation, has cleared 1257 tonnes of hyacinth from the Pavana river in the last 171 days without the help of any civic body.

The Rotary Club of Walhekarwadi, a non profit organisation has cleared 1257 tonnes of hyacinth from last 171 days without any help of civic body with an aim to clear Pavana river in Pune, India, on Tuesday, April 24, 2018. (HT PHOTO)

River development programme: Gujarat firm which brought Sabarmati to life to 'reshape' Pavana, Indrayani

PCMC plans to implement the river development programme for Pavana and Indrayani rivers in Pimpri-Chinchwad on the lines of the Sabarmati river development programme in Gujarat. The civic body has allotted a tender to HCP Design Planning And Management firm, which has the experience of making the Sabarmati river development project report.

The river development project will help revive the Pavana river in Chinchwad, which is currently suffocating due to untreated sewage problems and the hyacinth menace.

पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविणार; स्थायी समितीची मान्यता

नद्यांची प्रदुषण विळख्यातून होणार सुटका
निर्भीडसत्ता न्यूज –
अतिप्रदुषित नद्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी नदीचा समावेश आहे. या नद्यांच्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्यामुळे नदी सुधार प्रकल्पांच्या माध्यमातून पवना आणि इंद्रायणी नद्यांची प्रदुषणाच्या  विळख्यातून सुटका करण्यास भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला आहे. त्या प्रकल्पाचा आराखडा अहमदाबाद शहरातील नद्यांच्या धर्तीवर   हा सुधार प्रकल्प राबविणार आहे. याकरिता तांत्रिक सल्लागार नेमणूकीला मंजूरी दिली. तसेच शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी 184  कोटी रुपयाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मंजूरी देण्यात आली,अशी माहिती स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि स्थायी समिती सदस्य विलास मडेगिरी यांनी दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

Over 300 Sindhi families get free hand on land use

Nearly 40,000 members of 300-400 Sindhi families living in the Pimpri Camp area for generations are finally free to redevelop, sell or mortgage their land with the state government according the plots the freehold status.

MahaRERA to map registered real estate projects through GIS tech

PUNE: Citizens who plan to invest in real estate can get the exact location of Real Estate Regulatory Authority (RERA) registered projects on the website in about two months.

सलग चार दिवस बँका बंद

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या सलग तीन दिवशी बँका बंद राहणार आहेत. तसेच 1 मे रोजीही महाराष्ट्र दिन असल्याने बँका बंद असणार आहेत. यामुळे ग्राहकांची ऐन लग्नसराईमध्ये तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना याआधीच  26 व 27 एप्रिल रोजी कामे करण्यासाठी बँकेकडे धाव घ्यावी लागणार आहे.

दापोडी-निगडी ‘बीआरटी’ ‘ट्रायल रन’ पूर्ण

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे तक्रारदार अ‍ॅड. हिम्मतराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये दापोडी ते निगडी या 12.50 किलोमीटर अंतराच्या दुहेरी बीआरटीएस मार्गाची ‘ट्रायल रन’ बुधवारी (दि.25) पुर्ण करण्यात आली. या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमपीएलचे अधिकारीही उपस्थित होते. या संदर्भात ‘दापोडी- निगडी ‘बीआरटी’ मार्गावर तक्रारदारासोबत ‘ट्रायल रन’ घ्या, उच्च न्यायालयाचा पालिकेस आदेश’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने सोमवारी (दि.23) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार पालिकेने कार्यवाही केली आहे.

प्रलंबित महसुली दावे लागणार मार्गी

महसूल विभागातील प्रलंबित दावे मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने नवीन अतिरिक्‍त आयुक्‍तांचे पद निर्माण केले आहे. या पदामुळे  महसुली दावे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. पहिल्यांदाच महसूलमध्ये हे पद निर्माण करण्यात आले आहे. पुणे विभागातील या पदावर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संधी मिळाली आहे.

बसच्या फेर्‍यांअभावी प्रवासी त्रस्त

पिंपरी-चिंचवड  शहरात पीएमपीएमएल बसेसच्या फेर्‍यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबरोबरच अपुर्‍या मेटेंनन्समुळे जुन्या बसेस खराब झाल्याने पीएमपीएमएल प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याबाबत शहरातील नागरिकांमधून संतप्‍त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या जात आहेत.पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे 1 हजार 460 बसेस रस्त्यावर धावत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात  764 परिवहन बसेस आहेत. त्यामधील 611 बसेस सध्या धावत आहेत. यामध्ये 80 टक्के बसेस चांगल्या अवस्थेत आहेत, तर 20 टक्केबसेस सध्या खराब अवस्थेत आहेत. पुणे परिवहन मंडळाच्या 1 हजार 200 बसेसपैकी 250 बसेस आणि भाडे कराराच्या 653 पैकी 200 बसेस ची दुरवस्था झाली आहे. एका बसचे आयुर्मान 12 वर्षांपर्यंत असून आठ लाख चाळीस हजार किलो मीटरपर्यंत बस धावते. पीएमपीएमएलच्या बसेस अपुर्‍या मेंटन्समुळे रस्त्यावरच बंद पडत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. 1200 बसेसपैकी 25 टक्केबसेस वाईट अवस्थेत आहेत. 

वाहनांची तोडफोड शहराला लागलेली कीड

पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्थेचे गुन्हेगारांनी अक्षरशः धिंडवडे उडवले आहेत. पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात सर्रासपणे वाहनांची तोडफोड सुरू आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना जामिनावर सुटलेले गुन्हेगार रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून दहशत माजवत आहेत. मागील वर्षभरात शहरात अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या असून, हे सत्र आजही तसेच सुरू आहे. शहरातील पोलिस यंत्रणा शहराला लागलेली तोडफोडीची कीड काढणार का, असा प्रश्‍न उपस्थित झालेला आहे.

प्रकाश आमटे यांच्या हस्ते उन्नती फाऊंडेशनचे शुक्रवारी उद्‌घाटन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे उद्‌घाटन शुक्रवार दि.२७ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती संचालक विजय भिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. 

विवाहातून पर्यावरणविषयक जनजागृती

मोशीत राहणारे अनिल घाडगे हे पालिकेत सुरक्षा कर्मचारी असून इंद्रायणी सेवा संघ या संस्थेमार्फत ते पर्यावरण क्षेत्रातही काम करतात.

पिंपरी प्राधिकरणातील २०० हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण

भूखंडांवर झालेल्या अतिक्रमणाशिवाय प्राधिकरणाच्या ताब्यातील भूखंडांचा गैरवापरही अनेक ठिकाणी होत आहे.

HC tells PCMC to check authenticity of low-cost home beneficiaries

PIMPRI CHINCHWAD: The high court has directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation to conduct an inquiry to check if ineligible people were allotted flats built for economically weaker sections in the Chikhli housing scheme.

घरकुल आधी, की मुलांचे शाळाप्रवेश

पिंपरी  - दहा टक्के स्वहिस्सा भरून घरकूल मिळतेय. पण लग्नसराईचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचे शुल्क भरण्याचा कालावधी, यामुळे नेमके कशाला प्राधान्य द्यायचे, याचा पेच अनेक लाभार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. 

वरातीमागून महामेट्रोचे घोडे!

मेट्रो मार्गापासून वीस मीटर अंतरावर बांधकाम करण्यासाठी महामेट्रोचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घ्यावी लागणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. ही परवानगी नागरिकांनी थेट महामेट्रोकडून घ्यायची नाही, तर महापालिकेच्या माध्यमातून घ्यायची आहे. बांधकाम आराखड्याचे प्रकरण महापालिकेकडे सादर करायचे आणि त्यानंतर ते महामेट्रोकडे जाणार. तेथून त्याची छाननी झाल्यावर ते पुन्हा महापालिकेकडे येणार असून, काही त्रुटी असल्यास त्यांची पूर्तता संबंधितांना करावी लागणार आहे. ती झाल्यावर संबंधितांना ‘एनओसी’ मिळणार आहे. हा प्राणायम करताना पुन्हा टोलवाटोलवी अन्‌ दिरंगाईचा अनुभव येऊ नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

डॉ. रॉय यांना सक्‍तीची रजा

पिंपरी – महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी अन्य एका बाबीत प्रशासनाचीदेखील फसवणूक केली आहे. त्यामुळे डॉ. रॉय यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना स्थायी समितीने आयुक्तांना दिल्या आहेत.

चिंचवडला गुरूवारी श्रम-उद्योग परिषद

पिंपरी – महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पद्मश्री नारायण सुर्वे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि. 26) श्रम-उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेश तलावातील गाळ काढण्याची मागणी

निगडी – निगडी प्राधिकरण येथे असणाऱ्या गणेश तलावाची दूरवस्था या उन्हाळ्यात समोर आली आहे. बऱ्याच वर्षानंतर या तलावाच्या तळाचा गाळ दिसू लागला आहे. प्रचंड प्रमाणात गाळ साचल्यामुळे त्या तलावातून झाडांना देण्यात येणाऱ्या पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे तेथे साठलेल्या गाळाचा उपसा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी आयुक्तांकडे केली आहे.

आता गुगल करणार नोकरी शोधण्यात मदत !

चौफेर न्यूज – गुगलने नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी एक खास सेवा सुरू केली असून गुगलने ही सेवा सर्वप्रथम गेल्या वर्षी अमेरिकेत सुरू केली होती. गुगलच्या नव्या फीचरचे नाव गुगल फॉर जॉब्स असे असून नोकरीच्या शोधात असणा-यांचे काम याद्वारे सोपे व्हावे हा गुगलचा प्रयत्न आहे.