Monday, 26 February 2018

पिंपरी-चिंचवड अस्मितेसाठी शहराचे दोन आमदार उठवणार आवाज!

देवेंद्रचा पुन्हा भरणार दरबार! 22 लाख लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवडला आता तरी न्याय मिळणार का? मेट्रो फेज 1 ला निगडी पासून मंजुरी मिळणार का?

Pune’s first transit hub to be set up at Balewadi

As per the proposal, the transit hub will be developed on an 11-acre plot of land in Balewadi, along the Mumbai-Pune Expressway, opposite the Shree Shiv Chhatrapati Sports Complex near the National Institute of Construction Management and Research.

"हायपरलूप'च्या कामाला गती

पुणे  - पुणे ते मुंबई या मार्गावर तयार होणाऱ्या देशातील पहिल्या हायपरलूप प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यास येत्या मार्चपासून सुरवात होईल. "व्हर्जिन हायपरलूप वन' या कंपनीतर्फे ऑगस्टपर्यंत याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. 

'मेट्रो सुरक्षित आणि जागतिक दर्जाची'

प्रश्‍न (ब्रिगेडियर प्रसाद जोशी) - मेट्रो मार्गांचे काम पूर्ण कधी होईल? किती प्रवाशांना त्याचा फायदा होईल आणि प्रवासी भाडे काय असेल? 
दीक्षित -
 पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन्ही मार्गांचे काम 2020-21 पर्यंत पूर्ण होईल. तत्पूर्वी दोन्ही मार्गांवर चाचणी होईल. पिंपरी-स्वारगेट मार्गावर दररोज साडेतीन लाख, तर वनाज-रामवाडी मार्गावर दोन लाख प्रवासी याचा लाभ घेऊ शकतील. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर 10 ते 50 रुपये भाडे मेट्रोचे असू शकते. 

मेट्रोचे 20 टक्‍के काम पूर्ण

पिंपरी – पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील 20 टक्के काम पूर्ण झाले असून, पुण्यात मेट्रोचे काम सुरु नसताना पिंपरी-चिंचवड शहराने या कामात चांगली आघाडी घेतली आहे. या कामांतर्गत 88 पिलरचे फाउंडेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक सुनील म्हस्के यांनी शुक्रवारी (दि.23) पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी अंदाजपत्रकावर आज महापालिकेत चर्चा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी आज, सोमवारी (२६ फेब्रुवारी) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे. 

स्थायी समितीची शेवटची सभा ‘रेकॉर्डब्रेक’ होणार; ५५० कोटींचे विषय मंजुरीसाठी!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समिती भ्रष्टाचाराच्या आरोपाने वर्षभर चांगलीच चर्चेत राहिली आहे. या स्थायीची शेवटची सभा बुधवारी दि.२८ रोजी होणार आहे. या सभेच्या अजेंड्यावर सुमारे ५५० कोटी रुपयांचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आलेत. यात प्रामुख्याने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पंतप्रधान आवास योजना, रस्ते विकसित करणे, रस्ते डांबरीकरण असे विषय आहेत. त्यामुळे कोटी-कोटी उड्डाणे घेणारी ही स्थायी समिती शेवटची सभा ‘रेकॉर्डब्रेक’ होणार असल्याची चर्चा आहे.

पिंपरीत भाजपला घेरण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष एकत्र; पालिका आयुक्त रडारवर

पिंपरी पालिकेच्या राजकारणात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला घेरण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले आहेत

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे निधन

पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेचे जिल्हा प्रमुख  बाबासाहेब धुमाळ यांचे आज दि.२५ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

अबब! रस्ता दुरुस्तीसाठी सव्वीस कोटी

पिंपरी – भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्ल्यातील रस्ते खर्चासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत. पिंपळे गुरव येथील दापोडी पुल ते तुळजाभवानी तसेच सृष्टी चौकापर्यंत 18 मीटर रस्त्याची दुरूस्ती करून अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 18 कोटी 26 लाख 26 हजार एवढा खर्च केला जाणार आहे. तर, काटे पुरम ते मनपा शाळेपर्यंतच्या रस्त्यासाठी आठ कोटींचा खर्च होत आहे. दोन्ही रस्त्यांसाठी 26 कोटी खर्चाला मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आल्याने भुवया उंचावल्या आहेत.

जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई अभियानाचे 114 दिवस पूर्ण

पिंपरी – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई – उगम ते संगम’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. अभियानाचा आज (रविवारी) 114 वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट क्लब येथे पार पडला. अभियानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रावेत नगरचे 65 स्वयंसेवक, दि बाईकरनी ग्रुप पॅन लेवल इंडिया च्या पुणे विभागाच्या 15 बाईकरनीस् यांनी सहभाग नोंदवला. स्वयंसेवक व बाईकरनीस् यांनी तीन तास श्रमदान केले. आज पाच ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली. आजवर एकूण 675 ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली आहे.

रसायनांमुळे इंद्रायणी नदी तांबडी

चिखली - तळवडे परिसरातील काही कंपन्यांमधून इंद्रायणी नदीत रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा रंग तांबडा झाला असून, देहूपासून आळंदीपर्यंत पाण्यावर रसायनांचा तवंग पसरला आहे. 

स्कूल बस नियमावलीला केराची टोपली

पिंपरी - शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने अपघातांच्या कारणाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकारने विद्यार्थी वाहतुकीबाबत नियमावली लागू केली आहे. नियमावलीमध्ये शाळा प्रशासन, बसचा ठेकेदार व प्रशासनाच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या आहेत. मात्र, अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासाची जबाबदारी घ्यायला अद्यापही तयार नाहीत. तर बहुतांश शाळेमध्ये समित्या असल्या तरी, त्या केवळ कागदावरच आहेत. त्यामुळे वाहतूकदार, शाळा प्रशासन व पालक यांच्यात योग्य समन्वय राखणे गरजेचे आहे. 

Roof for homeless, seized cars & dump yard under Wakad flyover

PUNE: A small, grim world exists below the buzzing Wakad flyover which takes traffic across the Katraj-Dehu Road bypass to glitzy Hinjewadi, the IT park hub.

PCMC illegally removes 3 pups from Gahunje society

Kunal Iconia resident allegedly called the stray dog squad and had the puppies removed without a formal complaint, claiming they were littering the society premises; animal activists are up in arms

Scrap penalty on illegal buildings, says Shiv Sena

PIMPRI CHINCHWAD: Th e Shiv Sena has dug its heels in on the issue of unauthorized constructions.

Tax illegal connections, says Barne, amid opposition to water tariff hike

PIMPRI CHINCHWAD: Maval MP Shrirang Barne has called for imposing tax on illegal water connections amid growing opposition to doubling of water tax in Pimpri Chinchwad.

पाणीपट्टी दरात निम्म्याने कपात

पिंपरी - महापालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टीवाढीच्या दरात निम्म्यापेक्षा जास्त कपात करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. त्यामुळे पाणीपट्टीवाढ ही अन्य प्रमुख शहरांच्या दराच्या आसपास येईल. 

रहाटणीतील गणेश बँकेला आग; कागदपत्रे जळून खाक

पिंपरी : रहाटणी येथील गणेश बँकेला लागलेल्या आगीत कागदपत्रे जळून खाक झाली. ही घटना शनिवारी (ता.२४) पहाटे पाचच्या सुमारास घडली.

पिंपरीत कांदा उतरला, टोमॅटो स्थिर

पिंपरी -पिंपरी उपबाजारात रविवारी फळभाज्यांची व पालेभाज्यांची एकूण आवक व भाव किंचित घटले. कांद्याची आवक 19 क्विंटलने वाढून, भाव 150 रुपयांनी घटले. भेंडीची आवक पाच क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले.

सोलो तबला वादनाने जिंकली रसिकांची मने

निगडी – ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात आयोजित दोन दिवसीय संगीत संमेलनाची सांगता पं. रामदास पळसुले यांचे सोलो तबला वादनाने झाली. त्यांनी त्रिताला मधले पेशकर, कायदे, रेले, चक्रदार, तुकडे, मुखडे, गती सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

प्रलंबीत प्रश्‍नाबाबत डोळ्यात धूळफेक

पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्ती कर, रिंग रोड, निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प आदी प्रश्‍नांकडे सत्ताधारी भाजप सरकार सोयीस्कर डोळेझाक करीत आहे. शहरातील प्रश्‍न न सोडवता केवळ नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करुन आश्‍वासन देण्यापलिकडे काहीच करीत नसल्याचा आरोप चिंचवड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदेश नवले यांनी केला आहे.

बांधकाम मजुरांना ओळखपत्रांचे वाटप

पिंपरी – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा बांधकाम मजुरांना लाभ मिळावा, याकरिता कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने बांधकाम मजुरांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

आधार लिंक केलेल्या रेशनकार्डधारकांनाच मिळणार धान्य

चौफेर न्यूज – मुंबई उच्च न्यायालयाने आधारकार्ड रेशन कार्डला जोडणे अनिवार्यच असल्याचे म्हटले असून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच १ मार्चपासून स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार असल्याने आता आधारकार्ड रेशन कार्डशी जोडावे लागणार आहे.