Wednesday, 14 May 2014

निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी

विजयोत्सवावर पोलिसांची करडी नजर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमदेवार व कार्यकर्त्यांकडून काढण्यात येणा-या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. मतदानानंतर आचारसंहिता शिथिल झाली आहे. परंतु, मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना मिरवणुका काढता येणार नाहीत. विजयोत्सवावर पोलिसांनी करडी नजर असणार आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेने खबरदारी घेतली आहे.

महापालिका रुग्णालयात केसपेपर मिळणार मोफत

महापालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत केसपेपर देण्याचा निर्णय आज (मंगळवारी) स्थायी समिती सभेत घेण्यात आला.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीच्या  अध्यक्षस्थानी महेश लांडगे होते. या सभेत महापालिका परिसरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 70 लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.  त्याचबरोबर राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत केसपेपर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर वैद्यकीय उपचार योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशनकार्डधारक नागरिकांकडूनही केसपेपरसाठी शुल्क आकारले जाणार नाही.

निगडी येथे शनिवारपासून जयहिंद लोकजागर व्याख्यानमाला

जयहिंद मित्र मंडळ व जय बजरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक शाळू यांच्या स्मरणार्थ 17 ते 21 मे दरम्यान जयहिंद लोकजागर व्याख्यानमालेचे आयोजन निगडी येथे करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदासाठी होमहवन

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढत चालली आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारांपासून ते लोकसभा निवडणूक लढविण-या उमेदवारांपर्यंत सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. देशात 'नमो' फॅक्टर चालणार की ' रागा' फॅक्टर चालणार हे चित्र तर निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी शहरात होमहवन करण्यास सुरूवात झाली आहे.