Sunday, 9 December 2018

भारतातील सर्वात मोठे २६ वे ‘किसान कृषि प्रदर्शन’ मोशीत!

पिंपरी (दि. ६ डिसें) :- भारतातील सर्वात मोठे ‘किसान कृषि प्रदर्शन’ १२ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान मोशी येथे भरविण्यात येणार आहे. बुधवार (दि.१२ ) रोजी सकाळी नऊ वाजता शेतक-यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.

भारतातील सर्वात मोठे २६ वे 'किसान कृषि प्रदर्शन' मोशीत! 

होर्डिंगसह झाडांवरील जाहिरातींवर निर्बंध

आकाशचिन्ह व परवाना विभागाने जाहिरात होर्डिंगसंदर्भात नवे धोरण तयार केले आहे. त्यास विधी समितीने मंजुरी देऊन सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे. सभेच्या अंतिम मंजुरीनंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. या धोरणात जाहिरात होर्डिंगसह झाडांवरील जाहिरातवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या धोरणामध्ये जाहिरात होर्डिंगचे बांधकाम व लोखंडी फ्रेमचा दर्जा व मजबुतीकरण (संरक्षण स्थिरता प्रमाणपत्र) तपासला जाणार आहे. शहरात कोणत्या जागेवर होर्डिंग लावता येणार आणि नाही.  या संदर्भात निश्‍चिती केली आहे. पालिकेच्या जागेतील होर्डिंग निविदा काढून भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत.

लोहमार्ग टाकण्यास लवकरच सुरवात

पिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्‍टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू होईल. दोन किलोमीटर अंतरात व्हायाडक्‍टचे काम झाल्यामुळे मेट्रोच्या लोहमार्ग टाकण्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होईल. 

अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

महापालिकेतर्फे सुरू असलेले अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सीलिंगचे काम तसेच व्हरांड्यातील सुशोभीकरणाची कामे, बाहेरून रंगरंगोटीची कामे वेगात सुरू आहेत. जानेवारीमध्ये हे रंगमंदिर नागरिकांसाठी खुले होणार आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

चिखलीत लवकरच नवीन रुग्णालय

पिंपरी - चिखलीतील पाच एकर जागेत यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संबंधित रुग्णालयासाठी तीन एकर जागा ताब्यात आली आहे. उर्वरित दोन एकर जागा ताब्यात आल्यानंतर त्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल. कासारवाडीला महिनाभरात नवीन दवाखाना सुरू होणार आहे

PCMC to evaluate school students on pre-set parameters

A squad of retired teachers will look over progress; schools have to meet objectives by December 2018.

PCMC app to lodge complaints

Pimpri Chinchwad: The civic body has introduced a mobile application for grievance redressal as a part of the System of Assisting Residents And Touris.

In Hinjewadi, 127 bikers penalised in a single day

In what was described as the largest ever campaign against illegal parking in the Hinjewadi IT park area, police on Tuesday fined owners of at least 1.

स्मार्ट सिटीच्या फायबर केबल नेटवर्कीगच्या निविदेत ‘रिंग’ : समाजवादी पार्टींचा आरोप

स्मार्ट सिटी अंतर्गंत असणार्‍या 255 कोटी रुपयांच्या फायबल केबल नेटवर्कीग प्रकल्पाच्या पहिल्याच निविदेमध्ये ‘रिंग’ झाल्याचा संशय आहे. हे काम एल अँण्ड टी  कंपनीला देण्याचा प्रयत्न होत आहे. सदर कंपनीला काम देण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून दबाब येत आहे, असा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. सदर निविदा रद्दची मागणी पक्षाने केली आहे.

महिलांमध्ये आत्मविश्वास, सबलीकरण व विकास घडवणे हेच पालिकेचे अंतिम ध्येय – महापौर राहुल जाधव

पिंपरी (दि. ७ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शुक्रवार (दि. ७ ) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अटलबिहारी वाजपेयी योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीनकरिता अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजने अंतर्गत एका मुलींवर कुटुंब नियोजनद्वारे शस्त्रक्रीया करणा-या महिलांना २५ हजार रुपये, दोन मुलींवर कुटुंब नियोजनद्वारे शस्त्रक्रीया करणा-या महिलांना दहा हजार देण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ४२ लाभार्थी महिलांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.

स्वत: अवैध बांधकाम करणाऱ्या महापालिकेला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा नैतिक अधिकार नाही – दत्ता साने

पिंपरी (दि. ७ डिसें.) :-  विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली रिव्हर रेसिडेंन्सी परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली आहे. यावेळी रिव्हर रेसिडेंन्सी, ऐश्वर्यम, स्वराज, स्पारा, क्रिस्टल व क्‍लॉलेस्स या सोसायटीमधील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सांडपाणी पुन:प्रक्रिया धोरणाला ‘विधी’ समितीची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण व भेडसावणारा पाणीप्रश्न यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या जलनि:सारण (ड्रेनेज) विभागाकडून सांडपाणी पुन:चक्रीकरण व पुर्नवापर धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 400 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या सांडपाणी पुर्नवापराच्या धोरणाला विधी समितीने आज (शुक्रवारी)मान्यता दिली. विधी समितीच्या आज झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाने सांडपाणी पुर्नवापराबाबत तयार […]

PCMC set to rent out space for courts

Pimpri Chinchwad: The civic body has decided to provide space, on rent, for additional courts in Pimpri, thus meeting the long-pending demand of the P.

Mosquito menace in Pimpri Chinchwad municipal corporation river areas

People living in Sangvi and Dapodi areas along Pavana and Mula rivers are under serious threat of mosquito borne diseases, according to a latest survey ...

शिवणयंत्रासाठी 2330 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य

पिंपरी – महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मोफत शिलाईयंत्र वाटप योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिलाई मशिन खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. 2330 लाभार्थ्यांसाठी 1 कोटी 40 लाख रुपयांची तरतूद महापालिकेतर्फे करण्यात आली असून त्याला मान्यता देण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

वाराणसी निगमच्या शिष्टमंडळाची महापालिकेला भेट

पिंपरी चिंचवड ः उत्तरप्रदेश वाराणसीनगर निगम येथील अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. करसंकलन, आकाशचिन्ह परवाना, भूमि आणि जिंदगी, सारथी संगणक प्रणाली, पाणी पुरवठा व मलनिस्सारण या विभागास भेटी देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली.

विकास प्रकल्पावरील देखरेखीसाठी ‘केपीएमजी’ सल्लागार म्हणून नियुक्त

एका वर्षांसाठी पालिका अदा करणार 90 लाख ; स्थायी समितीची मंजुरी
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या जेएनएनयुआरएम, अमृत, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असलेल्या प्रकल्पावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी आता केपीएमजी अ‍ॅडव्हायजरी सर्व्हिसेस लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. या कामाच्या एका वर्षांकरीता पालिका तब्ब्ल 90 लाख 3 हजार रूपये खर्च करणार आहे. सदर कामासाठी पालिकेने सिटी ट्रान्सफार्मेशन ऑफीससाठी (सीटीओ) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खासगी कंपनीची अगोदरच नियुक्ती केली आहे. असे असतानाही त्याच कामांसाठी नव्याने खासगी  सल्लागार नेमून उधळपट्टीस चालना दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीवर होणार 50 लाखाची उधळपट्टी

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणा-या ‘स्वच्छ भारत अभियान 2019’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीवर पिंपरी-चिंचवड महापालिका लाखो रुपयांचा खर्च करणार आहे. या अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाशिक येथील हाय टेक इलेक्शन मल्टि सर्व्हीसेस अॅन्ड कंपनी आणि यशराज एंटरप्रायजेस या खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी एजन्सीला प्रत्येकी 22 लाख रुपये याप्रमाणे एकूण […]

संविधान भवनाच्या कामाला गती; प्राधिकरणाच्या पाच एकरावर साकारणार संविधान भवन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पाच एकरावर देशातील पहिले संविधान भवन साकारण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार असून दहा कोटीची तरतूद केली जाणार आहे. औद्योगिकनगरीत देशातील पहिले संविधान भवन साकरण्यास चालना मिळाली आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांनी भोसरीतील नगरसेवकांसह प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे […]

वाकड-पिंपळे निलखमधीले विविध विकासकामे प्रगतीपथावर

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांनी दिवाळीमध्ये वाकड-पिंपळे निलखच्या विकासकामांची घोषणा करून येथील नागरिकांना दिवाळी भेट दिलेली होती. ती विकासकामे प्रगतीपथावर असून या परिसरातील नागरिकांना लवकरच अनुभवायला मिळणार आहेत. यासंदर्भात सभापती ममता गायकवाड यांनी विकासकामांची माहिती देण्यासाठी प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.

‘उन्नती’ फाऊंडेशनकडून पालिका शाळेतील 1296 विद्यार्थ्यांचा मोफत अपघाती विमा

अपघाती विम्यात अपघात झाला तर 25 हजार रूपयापर्यंत रुग्णालयातील खर्च मिळणारसुमारे 38 कोटी 88 लाख रूपये एवढे मिळणार विमा संरक्षण
पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथील महापालिकेच्या आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील 1296 विद्यार्थी व प्रत्येकी एक पालकांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. उन्नती सोशल फाऊंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून सुमारे 38 कोटी 88 लाख रूपये एवढे विमा संरक्षण मिळणार आहे. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे यांनी अपघाती विमा पॉलिसी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांच्याकडे सुपूर्त केली.

पानगळीचे सौंदर्य ‘कॅनव्हासवर’

पिंपरी - झाडांवरून पडलेल्या पानगळीचे अस्तित्व ते काय...? पाचोळाच तो. पण, या पाचोळ्यातही दडलेलं सौंदर्य शोधण्याची एक कलात्मक दृष्टी असली तर त्यातूनही निसर्ग जिवंत होतो. बोलका होतो. पेन्सिल, रंग, ब्रश यांचा वापर न करता वाळलेली पाने, फुले यांच्यापासून पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ कवयित्री व चित्रकार अरुंधती तुळापूरकर यांनी अनोखी चित्रकृती साकारली आहे. 

“प्रोटोकॉल’वरुन विरोधी पक्षनेत्यांचा संताप!

पिंपरी – सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून विरोधी गटातील नगरसेवक अथवा पदाधिकाऱ्यांना सभा, समारंभ अथवा विविध विकासकामांच्या उद्‌घाटनांमध्ये डावलण्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवा नाही. मात्र, आता विरोधी पक्षनेता असलेल्या दत्ता साने यांनाही विकास कामांच्या उद्‌घाटनांमध्ये डावलले जात असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले आहे.

महापालिकेच्या दारातच अनधिकृत वाहनतळ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इमारतीबाहेर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केल्याने इतर वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे, महापालिकेसमोरील रस्त्यावर अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर अनधिकृतपणे लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.