ईपीएफ हा साधारणपणे पगाराच्या 12% कापला जातो. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही समान हिस्सा देतात. त्यावर काही इंटरेस्ट दिला जातो. अशा स्बरूपात कर्मचार्यांचा पीएफ अकाऊंटमध्ये भविष्यनिधी तयार होतो.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 17 January 2018
पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' कामगार संघटनेची स्थापना
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' ही देशातली पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात आलीय. फोरम फॉर आयची एम्लाईज या नावाने या संघटनेची पुणे कामगार आयुक्तांकडे रिसतर नोंदणीही करण्यात आलीय. आय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी ही संघटना यापुढे काम करेल. असं या संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी स्पष्ट केलंय.
पवना नदीनंतर आता इंद्रायणीही होणार जलपर्णीमुक्त
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रानजाई प्रतिष्ठान व आळंदी नगरपरिषद यांचा संयुक्त उपक्रम
निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील नदी स्वच्छतेचा वसा रोटरी कल्बच्या सदस्यांनी घेतला आहे. पवनामाईच्या स्वच्छता अभियानाप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांनीही इंद्रायणी जलपर्णीमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार सोमवारी (दि.15) आळंदी येथे सायंकाळी पाचच्या सुमारास इंद्रायणी घाटावर नदीची आरती करुन इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली.
पिंपळे गुरवमधील निळ्या पुररेषेतील बांधकामांची पाडापाडी
पिंपळे गुरव येथील निळ्या पुररेषेतील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने मंगळवारी (दि.१६) पाडापाडी कारवाई केली. त्यामध्ये एक पाच मजली अनधिकृत इमारतीवर देखील बुलडोझर फिरविण्यात आला.
पिंपळे सौदागरकरांची होणार कोंडीतून सुटका
सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर आणि गोविंद-यशदा चौकात भुयारी मार्ग बांधण्यास ‘स्थायी’ची मंजुरी
पिंपरी - वाहतूक समस्येने हैराण झालेल्या पिंपळे सौदागरकरांसाठी आनंदवार्ता आहे. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर व गोविंद-यशदा चौकात भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली असून, लवकर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
पिंपरी - वाहतूक समस्येने हैराण झालेल्या पिंपळे सौदागरकरांसाठी आनंदवार्ता आहे. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुदर्शननगर चौकात ग्रेड सेपरेटर व गोविंद-यशदा चौकात भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली असून, लवकर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
पाच वर्षांत ३५ हजार परवडणारी घरे
पिंपरी - सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा, प्राधिकरण व महापालिका या तिन्ही संस्थांनी योजना तयार केल्या असून, पुढील पाच वर्षांत सुमारे ३० ते ३५ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. मात्र महापालिकेने केलेल्या ‘डिमांड सर्व्हे’मध्ये शहराला ६० हजार परवडणाऱ्या घरांची आवश्यकता आहे. त्या संदर्भातील नियोजन पालिकेने सुरू केले आहे.
शहरबात पिंपरी : नियोजनाअभावी फट्फजिती
चिंचवड येथे गेल्या चार वर्षांपासून विस्तारित महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
अनधिकृत फ्लेक्स, अतिक्रमणांवर धडक कारवाई करा: पदाधिका-यांच्या सूचना
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजी व रस्त्यांवरील हातगाड्या, पथारीवाल्यांच्या अतिक्रमणांबाबत पिंपरी महापालिकेच्या सत्ताधारी पदाधिका-यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक घेतली. महापालिका प्रशासनाला धारेवर धरत अनधिकृत फलक व अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू करा, अशा सूचना पदाधिका-यांनी केल्या आहेत.
भटक्या कुत्र्यांसमोर प्रशासन हतबल
- नागरीक त्रस्त ः थेरगाव वाकड परिसरात चार महिन्यांपासून कुत्र्यांचा त्रास
वाकड, (वार्ताहर) – मागील चार महिन्यांपासून थेरगाव, दत्तनगर, वाकड, डांगे चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हैदोस सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी या परिसरात बाहेरुन भटकी कुत्री आणून सोडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. तेव्हा प्रशासनाने ही कुत्री पकडण्यात येतील व जर कोणी आणून सोडली असतील तर चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु चार महिन्यांमध्ये प्रशासनाला कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे. प्रशासनाच्या हतबलतेने नागरिकांचा त्रास अधिकच वाढला आहे. पूर्वी केवळ रात्रीच त्रास देणारी ही कुत्री आता दिवसा देखील परिसरामध्ये दहशत पसरवू लागली आहेत.
‘एचसीएमटीआर’बाबत कायदेशीर आधार नाही?
चिंचवड – गेल्या कित्येक महिन्यांपासून हजारो नागरिकांवर टांगती तलवार बनलेल्या एचसीएमटीआर रिंगरोडला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावा घर बचाव संघर्ष समितीने केला आहे. समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भात माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीनुसार एचसीएमटीआरला कोणताही कायेदशीर आधार नसताना प्रशासन नागरिकांची दिशाभूल करत आहे.
दीडशे दिवसानंतर रिंगरोड सर्वपक्षीय अवलोकन समिती गुलदस्त्यात
शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तिकर आणि रिंगरोड प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय अवलोकन समिती स्थापन करण्यात आली. मात्र, त्यानंतर दीडशे दिवस उलटले, तरी कोणतही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सर्वांना सर्वपक्षीय समितीचा विसर पडला असल्याचे घर बचाव संघर्ष समितीने म्हटले आहे.
घरपोच आधार सेवेचा उलटा प्रवास!
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ात ९३.०७ टक्के आधार नोंदणी झाली आहे.
पीएमपीच्या बडतर्फ चालकांचे पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना साकडे
मुंढे आल्यापासून काम मिळणे बंद झाले. उलट त्यांनीच गैरहजेरीचा ठपका ठेवला
आरटीई प्रवेशाचे अर्ज मोबाईल ऍपद्वारेही भरता येणार
24 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात: प्रवेशाची एकच संधी
पुणे,दि.16 – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणारे 25 टक्के आरक्षित प्रवेशाची प्रक्रिया यंदा नेमकी कशी असेल याबाबतची नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी यंदा ऍप विकासित करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून 24 जानेवारीपासून पालकांना प्रवेशाचे अर्ज भरता येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी घेतली सामुहिक स्वच्छतेची शपथ
निगडी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता संस्कार वाढण्यासाठी स्वच्छ भारत अंतर्गत सामूहिक स्वच्छता शपथ घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत शिवभूमी विद्यालयात शनिवार दि.13 रोजी सुमारे 3100 विद्यार्थ्यांनी स्वच्छता शपथ घेतली. या कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण संवर्धन समिती (इसिए)च्या वतीने करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत 3100 विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत अभियानाबाबत माहिती देण्यात आली व स्वच्छता शपथ वाचन करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)