Wednesday, 27 December 2017

वाकड रोड “पोस्टरमुक्‍त’

पिंपरी – अनधिकृत फ्लेक्‍सबाजी करुन परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या “पोस्टर’बाजांना भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी चांगलाच दणका दिला आहे. वाकड रोड परिसरातील बेकायदा पोस्टर स्वत: यंत्रणा राबवून मंगळवारी हटवण्यात आले. त्यामुळे अनधिकृत पोस्टर लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आधार एक आजोळ

अमित भिडे, झी मीडिया, मुंबई : एक अस्फुट हुंदका एका बाळाचा... आईच्या ओढीचा, आईच्या कुशीत विसावण्यासाठी फुटलेला... पण आईच त्याला सोडून निघून गेलेली... आई जग सोडून निघून गेली नाही तर आई त्याला या जगात जन्मतः एकट्याला सोडून गेलेली... कुठे तरी कचराकुंडीपाशी तो सापडतो... जगला काय मेला काय, त्याच्या आईला आपली झालेली चूक लपवण्यासाठी, निस्तरण्यासाठी त्याच्यासाठी कचराकुंडीच दिसते... 

ब्लॉग : आधार एक आजोळ

नाशिक फाटा ते मोशी “मेट्रो’ धावणार?

“डीपीआर’ तयार करा: आमदार लांडगे यांच्या सूचना
पिंपरी – पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी या मार्गावर मेट्रो सुरु करावी. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत.

...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले

राज्य कोणी ही करत असो, प्रत्येक शहरात एक शंकर आणि त्याचा नंदी असतो...! या नंदीला शंकराने आपल्या पेक्षा मोठे होऊ देऊ नये अशी सर्वांची इच्छा असते...! त्या इच्छेचा मान राखत हा काल्पनिक सोहळा...!)

ब्लॉग : ...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले

एकीकडे उत्पन्नवाढीचे सूत्र दुसरीकडे उधळपट्टीचा धडाका

गेल्या काही दिवसांपासून पालिका आयुक्तांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.

पवनाथडी जत्रेची ‘उत्सवी’ उधळपट्टी

हजारोंच्या संख्येने गर्दी होणाऱ्या पवनाथडीत ‘हवशे-नवशे-गवशे’ सगळे झाडून सहभागी होतात.

रॉबिनहूड आर्मीने दिले ८०० बेघरांना कपडे

ही 'रोटीबँक' अनेक बेघर नागरिकांची भूक भागवत आहे.

‘सब-वे’ ठरणार रहदारीचा ‘नीट-वे’

पिंपरी - महापालिकेने पुणे-मुंबई रस्त्यावरील दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) प्रवेशद्वारासमोर भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सेवा रस्त्याने वाहतूक वळवली असून, ती सुरळीतपणे सुरू आहे. येत्या दहा महिन्यांत म्हणजे सप्टेंबर २०१८ पर्यंत ‘सब-वे’चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा होणार आहे.

विकास कामांचे “थर्ड पार्टी टेक्‍निकल ऑडिट’

पिंपरी – विकासकामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी त्यांचे “थर्ड पार्टी टेक्‍निकल ऑडिट’ (त्रयस्थ तांत्रिक लेखा तपासणी) करणे राज्य सरकारने आठ वर्षापूर्वी बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

प्रस्तावित रिंग रोडच्या केवळ दहा टक्‍के जागेचा ताबा?

चिंचवड – सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या प्रस्तावित एचसीएमटीआर रिंग रोडबाबत घर संघर्ष समितीने एक मोठा दावा केला आहे. समितीने पालिकेसोबत केलेल्या पत्र व्यवहारात खुलासा झाला आहे की, या जवळपास 26 किलो मीटरच्या प्रस्तावित रोड पैकी केवळ 2254.84 मीटर म्हणजे केवळ अडीच किलो मीटरचा रस्ताच पालिकेच्या ताब्यात आहे, असा खुलासा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगर रचना उपसंचालकांच्या पत्राद्वारे झाला असल्याचा दावा समितीने केला आहे.

डांबरीकरण केलेल्या रस्त्याची पुन्हा खोदाई

पिंपरी – महापालिकेने दोन आठवड्यांपूर्वीच डांबरीकरण केलेला रस्ता खोदण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून नवीन केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे निर्माण होत असून त्याचा वाहन चालकांना व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वल्लभनगर आगारात “शिवशाही’ दाखल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड येथील वल्लभ नगर आगारातूनही एस. टी. महामंडळाच्या सात शिवशाही बस धावणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना शिवशाही बस सेवा मिळणार आहे. शिवाय या बसमध्ये लवकरच वाय-फाय सुविधा देखील दिली जाणार आहे. आगारात बसची संख्या कमी असल्याने शिवशाहीमुळे आगारावरील काही अंशी ताण कमी होणार आहे.

धूलिकणांचा अर्भकांवरही परिणाम

पुणे - जन्मत: येणारे व्यंग आणि प्रदूषण यांचा जवळचा संबंध असल्याचे धक्कादायक तथ्य नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. गर्भधारणापूर्व एक महिना आणि गर्भधारणेनंतर एक महिन्यात प्रदूषणाशी संबंध आल्यास जन्माला येणाऱ्या बाळां

स्वच्छ सर्वेक्षणाचा खेळखंडोबा?

पिंपरी – एकीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरात स्वच्छ सर्वेक्षणाची जोरदार तयारी सुुरु आहे, तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या जाहिरात एजन्सीने बस स्टॉप, सार्वजनिक ठिकाणी, विविध वृक्षांना खिळे ठोकून जाहिरातीचे लावल्या जात आहेत. तसेच मराठी चित्रपटाची भिंत्तीपत्रके (पोस्टर) अनेक भागात चिकटविली जात असून काही विद्युत खांबाला देखील पोस्टर लावण्यात आलेली आहेत. या अनधिकृत जाहिरातीमुळे शहराचे विद्रुपीकरण वाढले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

अस्वच्छतेने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण त्रस्त

पिंपरी – नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु रुग्णालयातील स्वच्छता गृहांची दूरवस्था, पिण्याच्या पाण्याचे कुलर अपुरे, रुग्णांचे बेडशीटची दुर्गंधी यासह अनेक गैरसोयीमुळे रुग्णांसह नातेवाईक त्रस्त झाले आहेत. याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी दुर्लक्ष केले आहे. सुमारे 300 बेडचे रुग्णालय आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज 800 ते 100 रुग्ण उपचारास घेण्यास येतात, मात्र रुग्णालयातील विविध विभागातील सोयी-सुविधांची वानवा, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, बेडवरील गादी, बेडशीटची दुर्गंधी अशा अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत.

कासारवाडीत इंग्रजी शाळेसाठी नवीन इमारत

पिंपरी – कासारवाडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंग्रजी शाळेसाठी इमारत बांधण्यासाठी नगरसेवक श्‍याम लांडे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले. येत्या मंगळवार दि. 26 ला स्थायी समिती सभेपुढे हा विषय मंजुरीसाठी ठेवणार आहे.

विविध योजनांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि गरजू महिलांना 10 जानेवारी 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक विलास मडिगेरी यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केलेली मागणीला यश आले आहे.

लाभार्थ्यांसाठी योजनांच्या अटी व शर्तीत बदल?

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र, मागासवर्गीय मुला-मुलींना मोफत सायकल आणि महिलांना स्वयंरोजगारातून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी मोफत ड्रायव्हींग प्रशिक्षण देणाऱ्या योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, शिवणयंत्र व मोफत सायकल वाटप योजनेत थेट अर्थसहाय्य दिले जात आहे. त्या योजनांच्या अटी व शर्थीमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळणे मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे योजनांच्या अटी व शर्तीत बदल करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समिती घेणार असून त्यात दुरुस्तीचा ठराव मांडण्यात येणार आहे.

महापालिकेकडून न्यायालयाचा अवमान?

पिंपरी – महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील दैनंदिन रस्ते व गटर्स साफसफाई कामांचा ठेका 68 स्वयंरोजगार व बेरोजगार संस्थांकडे दिला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल झाली असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू ठेवली असून हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेने केला आहे.