Wednesday, 4 July 2018

PCMC, AMC to face criminal charges for releasing untreated industrial effluents into Pune’s rivers

The decision to file complaints against PCMC and AMC was taken during a meeting held on Sunday, chaired by Ramdas Kadam, Maharashtra environment minister.

Also, PCMC has failed to repair vandalised drainage chambers carrying untreated sewage water towards the sewage treatment plant near Mula river in Sangvi.

‘सीओईपी’च्या शैक्षणिक विस्ताराचा मार्ग मोकळा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी (Pclive7.com):- कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या संस्थेच्या शैक्षणिक विस्तारासाठी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील तब्बल २७ एकर जागा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी नवलकिशोर राव यांनी घेतला आहे. त्यामुळे ‘उद्योगनगरीत’ ‘सीओईपी’सारख्या शासकीय दर्जेदार शिक्षण संस्थेची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

'सीओईपी'च्या शैक्षणिक विस्ताराचा मार्ग मोकळा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

तळवडे डिअर पार्कसाठी जिल्हाधिकारी सकारात्मक

बर्‍याच वर्षांपासून रखडला आहे प्रकल्प : अनेकदा झाला पाठपुरावाआमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत झाली बैठक
पिंपरी-चिंचवड : मागील अनेक वर्षापासून तळवडे येथील डिअर सफारी पार्क चे रखडले आहे. यासाठी स्थानिक आमदार ते नगरसेवक पाठपुरावा करत आहेत. मात्र आतापर्यंत विविध विषयावरून हा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प लवकरात-लवकर मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा नगरसेवकांनी पाठपुरावा केला आहे. नुकतेच 13 जून रोजी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राम किशोर नवल, आयुक्त श्रावण हार्डीकर, यांच्यासोबत अनेक अधिकारी उपस्थित होते. हा प्रकल्प लवकर होण्यासाठी अधिकारी सकारात्मक असल्याचे आ.लांडगे यांनी सांगितले.

दापोडीतील विकसित करण्यात येणाऱ्या उद्यानाच्या कामाचेआमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमीपूजन

निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील दापोडी येथे बुद्ध विहाराशेजारील मोकळ्या जागेमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) करण्यात आले.

पिंपरी चिंचवड रस्ता गेला अतिक्रमणे आणि खड्ड्यात

पुणे - अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारच असतो. पालिकेचा पाणीपुरवठा आणि विद्युत विभाग एकटे दत्तात्रय सोनटक्केच सांभाळत आहे. पिंपरीचिंचवड महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्यासाठी जादाचे कर्मचारी अद्याप उपलब्ध झाले नाहीत. शहरात बहुतांश ठिकाणची अतिक्रमणे आहे तशीच आहेत. तर प्रदक्षिणा रस्त्यावर अद्याप खड्डे आहेत. तर काही ठिकाणी साईडपट्ट्यांची कामे उरकली नाहीत. वास्तविक सव्वा कोटीहून अधिकचा निधी यात्रा निधी म्हणून शासन देते. मात्र पालिका कागदावरच कामे दाखवून निधी लाटायचे काम करत असते.

“जागते रहो’ रात्र गस्तमुळे घरफाेड्या कमी

निगडी – गेल्या सोळा वर्षांपासून दर उन्हाळ्यात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने “जागते रहो’ हा रात्र गस्त उपक्रम राबवला जातो. यावर्षीच्या उपक्रमाची सोमवारी सांगता करण्यात आली. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरफोड्या रोखण्यासाठी समितीच्या वतीने रात्री 11.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत सदरचा उपक्रम राबविला गेला.7 मे ते 30 जून च्या काळामध्ये निगडी प्राधिकरण, चिंचवड परिसरामध्ये स्वयंसेवकांनी हा उपक्रम यशस्वी रित्या राबवला

मुळा-मुठेतून जलप्रवास?

नद्यांच्या संवर्धनासाठी पालिका घालणार केंद्राला साकडे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचा विकास आणि संवर्धन प्रकल्पासाठी केंद्र सरकारला साकडे घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार मुळा-मुठा नदीतून जलप्रवास करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना योजनेच्या सल्लागाराला करण्यात आल्या आहेत. नद्यांमधील काही टप्प्यांमध्ये प्रवास करणे शक्य असेल तर, तसाही प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात खबरदारी घेण्याच्या आ. जगताप यांच्या महावितरण अधिकार्यांना सूचना

 गुरव, ३ जुलै – पावसाळ्यात विजेसंबंधीच्या दुर्घटना टाळण्यासाठी व वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी  आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी (३ जुलै ) महावितरण विभागाच्या अधिका-यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. जगताप यांच्या कार्यालयात सकाळी ही बैठक घेण्यात आली.

ऐन पावसाळ्यातही पाणी प्रश्न?; काळभोरनगरमध्ये झाले चर्चासत्र!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांना पाणी तसा नवीन नाही. परंतू ऐन पावसाळ्यात शहरवासियांना पाणी प्रश्नांला सामोरे जावे लागत आहे. आज काळभोरनगर परिसरातील या प्रश्नावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

[Video] प्राणी संग्रहालयातील प्राण्याची तस्करी थांबवा ! मंगला कदम माजी महापौर

प्राणी संग्रहालयातील प्राण्याची तस्करी थांबवा ! मंगला कदम माजी महापौर

शहरबात पिंपरी : पुढचं पाठ, मागचं सपाट!

वाढत्या नागरिकीकरणामुळे नव्या समस्या

अखेर दापोडी-बोपोडी पुल वाहतुकीसाठी झाला खुला!

बोपोडी सिग्नल चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरीस पुलास बांधला आहे पूल
पालकमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लोकार्पण
पिंपरी-चिंचवड : बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरीस पुलास बांधण्यात आलेला पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणारा पुल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आहे. यामुळे दापोडीतील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले.

रोलर स्केटींगमध्ये पिंपळे सौदागर येथील खेळाडु चमकले

नवी सांगवी (पुणे) : एशियन रोलर स्पोर्टस एक्स्पर्टन्स कौन्सिल कमिटी (एआरएसइसीसी ) द्वारा इंडियाज फास्टेस्ट स्केटर (आयएफएस) या स्पर्धा कासारसाई येथे नुकत्याच पार पडल्या. एकूण अठ्ठावीस लाख रोख रकमेच्या या स्पर्धेत त्यात पिंपळे सौदागर येथील ड्रीम झी स्केटिंग अँकेडमीचे विद्यार्थी तेजर रैना, हदान गावडे, धीर चौहान, ओवी पवार, सारथी सिनारे, आयुष चौहान, ईशान आतिश पवार या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली व त्यांनी प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे रोख बक्षिस पटकाविले.

पर्यावरणासाठी महिलांनी शिवल्या कापडी पिशव्या

पिंपळे-गुरव – प्लास्टिक कॅरी बॅग बंदीला पर्याय म्हणून बालाजी महिला प्रतिष्ठानने सांगवी येथे मारुती मंदिरात दोन दिवस कापडी पिशव्या बनवणे मोफत प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षणात महिलांनी उस्फूर्त भाग घेतला. उद्‌घाटन नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बालाजी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनुश्री ढोरे, प्रशिक्षिका शोभा चव्हाण, अपर्णा सोनवणे, पुष्पा गोसावी उपस्थित होते. घरातील वापरात नसणाऱ्या रंगीबेरंगी बेडशीट, साड्या, टॉप, पॅन्ट व शर्ट पीस आदी कापडांपासून साध्या व सोप्या पद्धतीने कापडी पिशव्या बनवण्यात महिला मग्न झाल्या होत्या. कात्री, टेप, सुई दोऱ्याने हात शिलाई करून तयार झालेली सुंदर कापडी पिशवी पाहून महिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत होता. भाजी बॅग, समोसा बॅग, वन साईड बॅग, डमरू बॅग, शॉपी बॅग आदी पिशव्या बनवण्याचे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. “प्लॅस्टिक बंदीवर करू या मात.. टाकाऊ पासून टिकाऊ पिशव्या बनवून निसर्गाला देवू या साथ.’ असा संदेश यावेळी देण्यात आला.

तरुणांनी केले रक्‍तदानाचे शतक

वाकड – विठ्ठल सोशल फाउंडेशन व उत्कल समाज, पुणे यांच्या विद्यमाने वाकड येथे आयोजित रक्‍तदान शिबिरात तब्बल शंभर तरुणांनी रक्‍तदान केले. रक्‍तदात्यांना कापडी पिशवी, गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

बांधकाम क्षेत्राला जीएसटीकडून अपेक्षा

पिंपरी/वाकड – गेल्या काही वर्षांपासून मंदीच्या चक्रात अडकलेल्या बांधकाम क्षेत्राला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. घरांच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याच्या बाहेर गेल्यामुळे बांधकाम व्यावसायिक हतबल झाले आहेत. एक वर्षांपूर्वी सरकारने कर प्रणालीत ऐतिहासिक बदल घडवून आणले आणि जीएसटी लागू केला. जीएसटीमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये सर्वात अधिक वापरल्या जाणाऱ्या सिमेंटवर 28 टक्‍के जीएसटी लावण्यात आला. जीएसटीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर करांच्या दरात काही बदल होण्याची अपेक्षा आहे. सिमेंटचा जीएसटी दर 28 वरून 18 टक्‍क्‍यांवर आणण्याचा सरकार विचार करीत असल्याचीही चर्चा आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.