दापोडी परिसरातील अपु-या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज (गुरुवारी) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. डोक्यावर रिकामे हंडे घेऊन महिलांनी पुणे-मुंबई महामार्ग सुमारे अर्धातास रोखून धरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 19 December 2013
शिवणयंत्रावरुन महिला व बालकल्याण समितीत अध्यक्ष विरुध्द सदस्य
महापालिकेकडून केल्या जाणा-या शिवणयंत्राच्या वाटपावरुन महिला व बालकल्याण समिती सदस्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. जुन्या पध्दतीच्या शिवणयंत्रांचे वाटप करण्यासाठी समिती सभापती शुभांगी लोंढे आग्रही आहेत. तर नव्याको-या चायनामेड यंत्रासाठी इतर सदस्यांनी
दिवसभरात शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ
दुचाकीस्वार चोरट्यांनी आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहरात धुमाकूळ घातला. पाच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि एका पुरुषाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. त्यामुळे दिवसभरातील काही तासात शहरातून सुमारे पंधरा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटून नेले. या घटनांनंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली. मात्र, सोनसाखळी हिसकावून चोरट्यांनी पोबारा केल्यावर
थेरगाव बोटक्लब येथे कायाकिंग स्पर्धेचे उद्घाटन
पिंपरी -चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय शालेय कायाकिंग व कनोइंग स्पर्धेचे उद्घाटन थेरगाव येथील बोटक्लब याठिकाणी झाले.
पर्यावरण संवर्धन समितीच्या कार्यकारणीसाठी हवेत नवे चेहरे
पर्यावरण संवर्धन समितीची आगामी 2014 या वर्षाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. निरपेक्ष भावनेने काम करू इच्छिणा-या व्यक्तींनी या कार्यकारिणीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पर्यवरण संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
PCMC takes a different route
One of the major reasons has been lack of awareness regarding technique and implementation, and it is this that the Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) intends to avoid. Having observed the PMC's errors, and the success of the BRT project in ...
|
PCMC sets up 'special system'' to take up complaints, suggestions of corporators
They feared losing importance after civic body started SARATHI helpline for residents.
दुमजली उड्डाणपुलाला प्रतीक्षा नामकरण अन् उद्घाटनाची! - हिंजवडी-चाकण मार्ग होणार ‘सुपरफास्ट’
कासारवाडी-नाशिकफाटा येथील राज्यातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाला प्रतीक्षा आहे, ती नामकरणाची आणि उद्घाटनाची.
‘ATM’ सुरक्षेसाठी डेडलाइन
‘एटीएम’ केंद्रांच्या काचांवर लावण्यात आलेल्या जाहिराती तत्काळ काढून टाकण्याचा आदेश राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी सर्व बँकांना दिला आहे. ‘एटीएम’मध्ये लावण्यात आलेले ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे सुस्थितीत असल्याची खात्री करावी; अन्यथा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ते बदलून घ्यावेत, असेही बजावण्यात आले आहे.
लढा… हिंजवडीच्या वाहतूक कोंडीविरोधात
हिंजवडी येथे राजीव गांधी इन्फोटेक पार्क सुरू होऊन पुण्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला, हे कुणीही नाकारू शकणार नाही. येथील उद्योगांमुळे देशाच्या निर्यातीत १०० अब्ज डॉलरची वाढ झाली.
आयटीपार्कसाठी सक्तीने भूसंपादन
पुणे : राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान उद्यान (हिंजवडी आयटी पार्क) साठी टप्पा तीन अंतर्गत माण व भोईरवाडी येथील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. परंतु, शेतकर्यांनी या भूसंपादनाला तीव्र विरोध केल्याने दर निश्चितीबाबत जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेली बैठक फिस्कटली. यामुळे आता शासनाच्या नियमानुसार टप्पा तीनसाठी सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे विशेष भूसंपादन अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले.
संगणकीय चुकांमुळे गोंधळ
पिंपरी : महापालिकेने ‘घरकुल’ प्रकल्पातील १२ इमारती आणि ५0४ लाभार्थींची संगणकीय सोडत काढली. संगणकीय प्रणालीत सात मजल्याच्या इमारतींऐवजी सहा मजल्याच्या इमारती अशी माहिती दिली असल्याने सोडतीत गडबड झाली. कार्यक्रमावेळी काढण्यात आलेल्या सुरुवातीच्या चार सोडत चुकीच्या निघाल्या. वेळीच चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा सोडत काढण्यात आली.
महापालिकेने उभारलेल्या इमारती सात मजल्यांच्या आहेत. एका मजल्यावर ६ सदनिका यानुसार पात्र लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन संगणकीय प्रणालीद्वारे सोडत काढली. प्रत्यक्षात इमारती सात मजल्याच्या परंतु संगणकीय प्रणालीत सहा मजल्याच्या अशी नोंद असल्याने चुकीच्या पद्धतीने सोडत निघाली. वेळीच ही चूक लक्षात घेऊन महापालिका संगणकीय प्रणालीत बदल केले. फेरसोडत काढली. कार्यक्रमास महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, ब प्रभाग अध्यक्षा यमुना पवार, आशा सुपे, साधना जाधव, अनंत कोर्हाळे, दिलीप गावडे, रामदास तांबे, निळकंठ पोमण आदी उपस्थित होते.

समितीवर विश्वास, प्रस्ताव मार्गी लावणार
पिंपरी : ताथवडे विकास आराखडा नियोजन समितीने नागरिकांच्या सूचना, हरकतींची दखल घेऊन जे बदल केले आहेत. ते नियमाच्या चौकटीत आहेत. सूचना, हरकती नोंदवण्यास मुदतवाढ दिली होती, त्या वेळी हरकती न नोंदविणारे आता आरोप करत आहेत. आक्षेप नोंदवत आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. समितीवर पूर्ण विश्वास असल्याने हा प्रस्ताव मार्गी लावला जाणार आहे, अशी भूमिका महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केली.
प्रिमियर कामगारांचा कुटुंबासह थाळीनाद
पिंपरी : प्रिमियर एम्प्लॉईज युनियनच्या वतीने कंपनीच्या गेटवर कामगारांनी कुटुंबासमवेत थाळीनाद आंदोलन केले.
आंदोलनामध्ये श्रमिक एकता महासंघाच्या वतीने अध्यक्ष किशोर ढोकले, कार्याध्यक्ष दिलीप पवार, जनरल सेक्रेटरी केशव घोळवे, नॅशनल ट्रेड युनियनचे राष्ट्रीय सहसेक्रेटरी संतोष रांजणे, सामाजिक कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मारुती भापकर, मानवी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे, विश्वकल्याण कामगार संघटनेचे सभासद तसेच कामगार आणि कामगारांचे कुटुंबीय उपस्थित होते.

संदेश काकडे ‘महाबली केसरी’
पिंपरी : कर्नाटक राज्यात झालेल्या कुस्ती स्पर्धेत खुल्या ७४ किलो वजनी गटात भोसरी येथील २१ वर्षीय संदेश काकडे ‘महाबली केसरी’चा मानकरी ठरला. किताब, २ किलो चांदीची गदा व २१ हजार रुपये हे इनाम जिंकले.
अल्पसंख्याक मूळ प्रवाहात येणे गरजेचे
पिंपरी : पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमातील पहिले १ ते ७ कलम हे शिक्षणाशी संदर्भीत आहे. त्याची अंमलबजावणी करून समाजाच्या उन्नतीसाठी व अल्पसंख्याकांना राष्ट्राच्या मूळ प्रवाहात आणण्याची गरज आहे. शिक्षणाच्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर टाकलेली आहे, असे शिक्षण मंडळ सभापती फजल शेख यांनी सांगितले.
सिक्कीमच्या कलावंतांनी जिंकले
पिंपरी : सिक्कीमच्या कलावंतांनी ईशान्येकडील बहारदार पारंपरिक नृत्य सादर करून बुधवारी पिंपरी-चिंचवडकर रसिकांचे मन जिंकले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अंकुशराव लांडगे नाटयगृह (भोसरी) येथे आयोजित सिक्कीम राज्य कला व सांस्कृतिक संचालनालयाच्या कलावंतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आज दुपारी महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास क प्रभाग अध्यक्षा सुरेखा गव्हाणे, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

Subscribe to:
Posts (Atom)